पतीचे अनैतिक संबंध, पत्नीने तीन वर्षांच्या मुलीसह विहिरीत घेतली उडी! File Photo
अकोला

पतीचे अनैतिक संबंध, पत्नीने तीन वर्षांच्या मुलीसह विहिरीत घेतली उडी!

पतीचे अनैतिक संबंध, पत्नीने तीन वर्षांच्या मुलीसह विहिरीत घेतली उडी!

सकाळ वृत्तसेवा

बुलडाणा : बुलडाणा (Buldhana) जिल्ह्यातील रायपूर (Raipur) येथील माळवंडी इथं एका विवाहित महिलेनं आपल्या 3 वर्षांच्या चिमुरडीसह विहिरीत उडी मारून आत्महत्या (suicide) केल्याची घटना घडली आहे. पतीचे अनैतिक संबंध आणि सासरच्याकडून होत असलेल्या जाचाला कंटाळून आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे. (Husbands immoral relationship, wife jumps into well with three-year-old daughter)

मिळालेल्या माहितीनुसार, रायपूर येथील माळवंडी येथील पल्लवी गणेश चव्हाण (वय 30) हिने मुलगी जान्हवी गणेश चव्हाण (वय 3) हिला घेऊन विहिरीत उडी मारून आपली जीवनयात्रा संपवली. मृत महिलेच्या वडिलांनी रायपूर पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली आहे.

यामध्ये पल्लवीचे पती गणेश चव्हाण याचे बाहेर अनैतिक संबंध होते. यावरून दोघांमध्ये वाद होत होता. त्यामुळे तो तिला मारहाण करायचा. तर पती सासू, सासरे व ननंद हे तिला माहेरावरून शेतीचा वाटा आण यासाठी त्रास द्यायचे. तिला मारहाण करून शारीरिक व मानसिक त्रास देत होते. त्यामुळे त्यांच्या त्रासाला कंटाळून पल्लवीने टोकाचे पाऊल उचलले. आपल्या 3 वर्षांची मुलगी जान्हवी चव्हाण हिच्यासह गावाजवळील विहिरीत उडी मारून आत्महत्या केली.

या प्रकरणी पोलिसांनी मृतक महिलेच्या वडिलांच्या तक्रारी वरून गुन्हे दाखल केले आहे. प्रेत पंचनामासाठी ताब्यात घेतले आहेत. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहे.

संपादन - विवेक मेतकर

Husband's immoral relationship, wife jumps into well with three-year-old daughter!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India Tour of England : भारतीय संघातून मोठी अपडेट्स; हार्दिक पांड्याची इंग्लंड दौऱ्यातून माघार, जसप्रीत बुमराह, विराट कोहली याचं काय?

कांबळे रडला नाही, नुसताच कन्हला; कविता व्हायरल, ठाकरेंची सभा गाजवणारा नितीन चंदनशिवे कोण?

Fifa World Cup 2026 : तोंडावर हात ठेवून बोलला, रेफरीने करेक्ट 'कार्यक्रम' केला; Miguel Almiron सोबत विचित्र घडलं... Video Viral

Telegram Ban नंतर ॲक्सेससाठी लोकांनी शोधल्या नव्या ट्रिक्स; रॉकेटच्या वेगाने वाढले VPN डाऊनलोड, 'या' पद्धतीने सुरुय गैरवापर

Latest Marathi Live Updates: नंदुरबार जिल्ह्यात वाळू वाहतूकदार संघटना आक्रमक

SCROLL FOR NEXT