अकोला

होणाऱ्या पती समोरच प्रेयसीला वाहनातून पळविले

सकाळ वृत्तसेवा

बाळापूर : बाळापूरच्या दिशेने निघालेल्या एका वाहनाला काही युवकांनी अडवत एका तरुणीला तिच्या होणाऱ्या पती समोरच वाहनातून ओढून पळवील्याची घटना बाळापूर पोलिसांच्या हद्दीतील कान्हेरी - शेळद दरम्यान राष्ट्रीय महामार्गावर घडली. या घटनेत आर्थिक फसवणूक झाल्याचा आरोप होत असून, या प्रकरणी बाळापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होण्याची प्रक्रिया सुरू होती. (In front of the future husband, he ran away from the vehicle)


प्राप्त माहितीनुसार इंदूर येथील लोकेन्द्र किरण हा युवक लग्नासाठी अकोला येथे आला होता. अकोल्यात नसरीन नामक या युवकाच्या माध्यमातून अकोल्यातील एका युवतीशी नातेसंबंध जुळले होते. आज, सोमवारी अकोल्यात कुंकवाचा कार्यक्रम आटोपून लोकेन्द्र किरण व त्याचे नातेवाईक सदर युवतीला इंदूर येथे लग्न करण्यासाठी घेऊन जात होते.

संध्याकाळी सहा वाजताच्या सुमारास एका वाहनातून त्या युवतीला घेऊन जात असताना राष्ट्रीय महामार्गावर कान्हेरी - शेळद दरम्यान पाठी मागून भरधाव येणारी कार आडवी लावून वाहन अडवले. सदर युवतीचा हात धरुन एका युवकाने तिला खाली उतरवत दुसऱ्या वाहनात बसवून अकोल्याकडे पोबारा केला.

दरम्यान, चालकालाही त्या युवकांनी मारहाण केली. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच लोकेन्द्र किरण याने बाळापूर पोलिसांशी संपर्क साधला असता वाहतूक पोलिस कर्मचारी गणेश वीर, पातोंड व पोलिस ताफा घटनास्थळी हजर झाला. त्यांनी इंदूर येथील वाहन पोलिस ठाण्यात घेऊन गेले. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

In front of the future husband, he ran away from the vehicle

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Karad News: मलकापुरात महामार्ग चार तास ठप्प! 'क्रेनसह उलटलेला कंटेनर केला बाजूला'; पाच किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा

Sanjay Kaka Patil : संजय काका पाटलांनी थेट रोहित पाटलांना एकत्र लढण्याचं दिल आवाहन, तासगावमध्ये नेमकं काय घडतयं

Whatsapp ला आलं 'सायबर कवच'! ऑन करताच हॅकर्सना बसणार दणका; Strict Account फीचरने फ्रॉड कॉल्सचा प्रॉब्लेम संपवणार, एकदा वापरुन बघाच

Latest Marathi Breaking News Live: दिवसाढवळ्या घरफोड्या, काडतूस, चांदीचे दागिने आणि रोकड चोरी करणारे दोन आरोपी अटकेत

IPL 2026 साठी कधी होणार खेळाडूंचा लिलाव, रिटेंशनची अंतिम तारीख काय? समोर आली महत्त्वाची अपडेट्स

SCROLL FOR NEXT