It has come to light that a couple with a covid positive from Deulgaon went to Jalna for a CT scan on a two wheeler
It has come to light that a couple with a covid positive from Deulgaon went to Jalna for a CT scan on a two wheeler 
अकोला

केवढा हा हलगर्जीपणा ! कोरोना पॉझिटिव्ह दाम्पत्यं सीटी स्कॅनसाठी कोविड सेंटरमधून पोचले जालन्यात

सकाळ वृत्तसेवा

देऊळगावराजा (बुलढाणा) : जिल्ह्यातील कोविड सेंटरमधील एक- एक प्रकरणे समोर येत असून, देऊळगाव येथील कधी महिला वॉर्डातील दरवाजा ठोठावला जातो तर कधी मोताळा येथील कोरोना नमुना न घेता अहवाल पॉझिटिव्ह येतो. अशातच आता देऊळगाव राजा येथील गंभीर प्रकार समोर आला आहे. कोविड पॉझिटिव्ह असलेले दांपत्य चक्क दुचाकीवर सिटी स्कॅन करायला जालना येथे गेल्याचे समोर आले असून, यामुळे आता मात्र आरोग्य विभागाच्या कार्यप्रणालीवर प्रश्‍न निर्माण होत आहे.

देऊळगाव राजा येथील कोविड रुग्णालयात कोविड 19 चा उपचार घेणार्‍या दांपत्याने सिटीस्कॉन करण्यासाठी जालना येथे स्वतःच्या दुचाकीवर रविवार (ता.7) जावे लागल्याचा प्रकार घडला आहे. यामुळे प्रशासन किती संवेदनशील आहे हे या प्रकारावरून दिसत आहे. एकीकडे जगात कोरोना थैमान घातल्याच्या बातम्या रोजच पहावयास मिळत असून, जिल्ह्यात कडक निर्बंधही यासाठी लावण्यात आले आहे. देशासह राज्यात कोरोना रुग्ण वाढू नये याची खबरदारी म्हणून देशात आणि राज्यात टाळेबंदी केली जात आहे.

आताही जिल्ह्यात कोविड रुग्ण दिवसेंदिवस वाढत असल्याने जिल्हाधिकार्‍यांनी 16 मार्चपर्यंत टाळेबंदी वाढविला आहे. येथील कोविड रुग्णालयातून पती- पत्नी कोविड पॉझिटिव्ह असताना त्यांना सिटीस्कॉन करण्यासाठी शासकीय रुग्णवाहिका उपलब्ध न करू देता त्यांना सरळ दुचाकीवर जाऊ दिल्याने प्रशासन कोविड 19 बद्दल गंभीर आहे, हे दिसून येत आहे. 

पालकमंत्र्यांनी लक्ष घालण्याची गरज
 
जिल्ह्यात कोविड सेंटर आणि त्यासंदर्भातील रुग्ण यांच्या बाबत दररोज नवनवीन प्रकार समोर येत आहे. याबाबत पालकमंत्री तथा राज्याचे अन्न व औषध मंत्री डॉ.राजेंद्र शिंगणे यांनी लक्ष देण्याची गरज आहे. विशेष म्हणजे महिला वॉर्डाचे दार ठोठावले तसेच दुचाकीवर जाणे हा प्रकार त्यांच्या मतदार संघातील असून, अशी हलगर्जी होत असल्याने येथील आरोग्य प्रशासनावर लक्ष देण्याची गरज आहे. 

रेमडीसिव्हर इंजेक्शनचा तुटवडा
 
येथील कोवीड रुग्णालयात रेमडीसिव्हर इंजेक्शनचा तुटवडा असून रुग्णांना खासगी मेडीकलमधुन सदर इंजेक्शन खरेदी करण्याचे फर्मान सोडले जात आहे. कोविडच्या रुग्णांना नाहक आर्थिक ताण सहन करावा लागत असून गरीब रुग्णाचे मोठे हाल होत आहे. 

 खासगी कोविड सेंटरवर महिला कर्मचार्‍यांची कुंचबणा
 
खासगी कोविड सेंटरवर कर्तव्य बजविणार्‍या नर्स, डॉक्टर व पोलिस महिला आणि इतर कर्मचार्‍यांसह कोविड 19 प्रार्दुभाव असलेले आणि संशयित असणार्‍या रुग्णांना एकाच ठिकाणी असलेल्या शौचालयाचा वापर करावा लागतो. त्यामुळे कोरोना आजाराचा संसर्ग वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. महिला कर्मचार्‍यांसाठी स्वतंत्र व्यवस्था नसल्यामुळे त्यांची कुंचबणा होत आहे. 

108 रुग्णवाहिका ही केवळ रुग्ण पोचविण्याचे काम करत असल्याने ते रुग्ण परत घेऊन येण्याचे आम्हाला आदेश नसल्याचे रूग्णवाहिचे अधिकारी सांगत असल्याने तिचा वापर करता येत नाही. आमच्याकडे कोविडचे रुग्ण वाहण्यासाठी रुग्णवाहिका नाही. या प्रकाराबाबत निश्‍चित सांगता येणार नाही. 
- डॉ. दत्ता मान्टे, तालुका आरोग्य अधिकारी, देऊळगावराजा. 

 कोविड सेंटरमधून सदर रुग्णाला आमच्यावतीने पाठविण्यात आले नाही. ते स्वत: गेले असावेत. त्यामुळे निश्‍चित काही सांगता येणे कठीण आहे. 
- डॉ. आस्मा शाहीन, वैद्यकीय अधीक्षक, देऊळगावराजा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

S Jaishankar: "फक्त आरोप करता, पुरावे द्या...", कॅनडात 3 भारतीयांच्या अटकेला भारताचे चोख उत्तर!

Banmeet Narula: डार्क वेबद्वारे ड्रग्ज विकणारांना ईडीने उचलले; 130 कोटी रुपयांचे बिटकॉईन जप्त

तुम्‍ही सत्तेत असताना इथले उद्योग गुजरातला का गेले? नारायण राणेंच्या प्रचारसभेत राज ठाकरेंचा उद्धव यांना थेट सवाल

Latest Marathi News Live Update : "पंतप्रधान मोदी यांच्या हातात देश, सीमा आणि सैनिक सुरक्षित नाहीत," समाजवादी पक्षाचा हल्लाबोल

Elon Musk Scam : इलॉन मस्कने म्हटलं 'आय लव्ह यू', अन् तरुणीवर झाला कर्जाचा डोंगर.. काय आहे प्रकरण?

SCROLL FOR NEXT