खडकपूर्णाचे
खडकपूर्णाचे  sakal
अकोला

खडकपूर्णाचे १९ वक्रद्वार दुसऱ्यांदा उघडले ; पाण्याचा विसर्ग

सकाळ वृत्तसेवा

देऊळगाव राजा (जि. बुलडाणा)  : जाफराबाद तालुक्यातील पूर्णा नदीवर विदर्भात उभारलेल्या खडकपूर्णा प्रकल्पात पाण्याची आवक वाढल्याने बुधवारी (ता. 22) सायंकाळी धरणाचे 19 दरवाजे 0. 30 मीटर उघडण्यात आले पूर्णा खडकपूर्णा नदी दुथडी भरून वाहत आहे

जाफराबाद तालुक्यातील जीवरेखा खेळणा,केळणा, धामणा या नद्या पावसामुळे खळखळून वाहत आहेत या सर्व नद्या पूर्णा नदीला मिळत असल्याने पूर्णा नदीचे पात्र दुथडी भरून वाहत आहे यामुळे खडक पूर्णा प्रकल्पाची जलाशय पाणीपातळी वाढली आहे सद्यस्थितीत खडकपूर्णा प्रकल्पत एकूण 89.73 टक्के जलसाठा झाला आहे.

जलाशयाची पाणीपातळी ५२० मीटर असून प्रकल्पात पाण्याची आवक सुरूच आहे. बुधवारी सकाळी धरणाचे सतरा दरवाजे उघडण्यात आले होत. यावेळी १८ हजार ५६४ क्यूसेस पाण्याचा विसर्ग  नदीपात्रात केला जात होता दरम्यान बुधवारी दिवसभर जाफराबाद ,भोकरदन, सिल्लोड तालुक्‍यासह पूर्णा नदीच्या वरील भागात पाऊस सुरूच असल्याने पाण्याची आवक वाढत होती परिणामी सायंकाळी धरणाचे संपूर्ण 19 दरवाजे उघडण्यात आले.

यामधून 20 हजार 750 क्यूसेस पाण्याचा विसर्ग होत आहे यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान प्रकल्प क्षेत्रात पाण्याचा वाढता प्रवाह पाहून प्रकल्पाचे दरवाजे कमी-जास्त प्रमाणात उघडण्यात येतील अशी माहिती पाटबंधारे विभागाचे अधिकारी एआर तिरमारे यांनी दैनिक सकाळ शी बोलताना दिली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dharashiv Loksabha election : ...म्हणून ओमराजे निंबाळकर शिंदेंसोबत गेले नाहीत; 'सकाळ'च्या खास मुलाखतीत केला खुलासा

T20 World Cup 2024: BCCI निवड समितीची जय शाह यांच्यासोबत अहमदाबादमध्ये बैठक! टीम इंडियाची घोषणा कधी? अपडेट्स आल्या समोर

Patanjali Products Ban: पतंजलीच्या 14 औषधांवर उत्तराखंडमध्ये बंदी! सुप्रीम कोर्टानं फटकारल्याचा परिणाम

Loksabha election 2024 : बेटों के सम्मान में, 'मर्द' उतरे मैदान मे! ना विजयाची चिंता ना प्रचाराची फिकीर; पुरुषांच्या हक्कासाठी निवडणुकीच्या मैदानात

Thomas Cup 2024: भारताचा पुरुष बॅडमिंटन संघ उपांत्यपूर्व फेरीत, इंग्लंडचा 5-0 ने उडवला धुव्वा

SCROLL FOR NEXT