kirit somaiya sakal
अकोला

Kirit Somaiya : 'महिलांनी मारले जोडे; शिवसैनिकांनी फासले काळे', किरीट सोमय्या कथित व्हिडिओवरून सेनेचे आंदोलन

किरीट सोमय्या कथित व्हिडिओ क्लिपवरून भाजप कार्यालयापुढे शिवसेनेचे आंदोलन

सकाळ डिजिटल टीम

अकोला : भाजप नेते माजी खासदार किरट सोमय्या यांच्या व्हायलर झालेल्या कथित व्हिडीओ क्लिपचे पडसाद मंगळवारी अकोल्यात उमटले. या कथित व्हिडीओ क्लिपमध्ये दाखविल्या प्रमाणे सोमय्या यांच्यावर अत्याचार केल्याचा आरोप करीत शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) महिला पदाधिकाऱ्यांनी सोमय्या यांच्या प्रतिमेला जोडे मारून आंदोलन केले.

त्यानंतर शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते गांधी रोडवरील भाजप कार्यालयावर धडकले व घोषणाबाजी करीत सोमय्याचा निषेध करण्यात आला आहे.

शिवसेनेचे संपर्क नेते खासदार अरविंद सावंत यांच्या आदेशाने संपर्कप्रमुख प्रकाश शिरवाडकर, संपर्क संघटिका वैशालीताई घोरपडे, आमदार तथा जिल्हाप्रमुख नितीन देशमुख, जिल्हा प्रमुख गोपाल दातकर यांच्या मार्गदर्शनात महिला जिल्हासंघटिका देवश्री किशोर ठाकरे यांच्या नेतृत्वात शिवसेना अकोला जिल्हा महिला आघाडीच्या वतीने मंगळवारी गौरक्षण रोडवर किरीट सोमय्या यांच्या निषेधार्थ आंदोलन करण्यात आले.

भाजप नेते सोमय्या यांचा जो अश्लील व्हिडिओ व्हायलर झाला आहे, त्याने देशात आणि जगात महाराष्ट्राची मान शरमेने खाली गेली. किरीट सोमय्या हा विकृत स्वभावाचा व्यक्ती असल्याचा आरोप करीत किरीट सोमय्याच्या या व्हिडिओमुळे तमाम महाराष्ट्रीयन माणसाची मान खाली गेल्याचे शिवसेनेच्या महिला पदाधिकाऱ्यांनी म्हटले आहे.

याचा निषेध करण्यासाठी व त्याच्यावर योग्य ती कारवाईच्या मागणीसाठी तुकाराम चौक येथे किरीट सोमय्या याच्या प्रतिमेस जोडे मारो आंदोलन करण्यात आले.

यावेळी महिला जिल्हा संघटीका देवश्री ठाकरे, उपजिल्हा संघटिका रेखाताई राऊत, निवासी उपजिल्हा प्रमुख अतुल पवनिकर, उपजिल्हाप्रमुख गजानन बोराळे, सुनिताताई श्रीवास, मंजुषाताई शेळके, राहुल कराळे, नगरसेवक मंगेश काळे, प्रमोद धर्माळे, रेखा देशमुख, नम्रता धर्माळे, अविनाश मोरे, संतोष मसने, संदीप पत्की, बंडू सवई, लताताई मोकाशी, रेखाताई सपकाळ, सीमा मेटांगे, आरण्यम मेटांगे व शिवसैनिक उपस्थित होते

या आंदोलनानंतर शहर प्रमुख राजेश मिश्रा यांच्या नेतृत्वात सायंकाळी पाच वाजता गांधी चौकातून शिवसैनिकांनी मोर्चा काढत खुले नाट्यगृहासमोर असलेल्या भाजप कार्यलयावर धडक दिली. भाजप कार्यालयापुढे घोषणाबाजी करून किरिट सोमय्या यांच्या प्रतिमेला जोडे मारत निषेद नोंदविला. या भाजपच्या निषेधाच्या घोषणाही शिवसैनिकांनी दिल्यात.

या आंदोलन राजेश मिश्रा, राहुल कराळे या दोन्ही शहर प्रमुखांसोबत माजी नगरसेवक गजानन चव्हाण, योगेश गिते, संतोष अनासने, नितीन ताकवाले यांच्यासह दुपारी आंदोलन करणारे सर्व पदाधिकारी सहभागी झाले होते.

बंदोबस्तासाठी अवघे दोन पोलिस

शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांसह मंगळवारी सायंकाळी भाजप कार्यालयावर धडक दिली. सुरुवातीला गांधी चौकात आंदोलन करण्यात येणार होते. मात्र, त्यानंतर शिवसैनिक भाजप कार्यालयाकडे गेले.

यावेळी भाजप कार्यालयापुढे बंदोबस्तासाठी अवघे दोन पोलिस कर्मचारी होते. परिस्थिती हाताबाहेर गेली असती तर नियंत्रण मिळविण्यासाठी पुरेशा पोलिस बंदोबस्त नसल्याने भाजपकडून नाराजी व्यक्त करण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pak Rapper Indian Flag : पाक रॅपरने शो मध्ये फडकवला 'तिरंगा'! पाकिस्तानात संतापाची लाट, व्हिडिओ व्हायरल, काय घडलं नेमकं?

WPL 2026 Date: मोठी बातमी! महिला प्रीमियर लीग २०२६ कधीपासून सुरू होणार? तारीख आली समोर

नॅशनल क्रश झाल्यानंतर दोन दिवसात गिरीजा ओकचे किती फॉलोवर्स वाढले? आकडा वाचून भुवया उंचावतील

१० वी पास...१० वर्षांचा प्रिटिंगचा अनुभव...YouTube बघून तयार केल्या बनावट नोटा अन्...; पठ्ठ्याची करामत वाचून व्हाल थक्क

Mumbai News: मुंबईला जागतिक दर्जाचे टनेल मत्स्यालय मिळणार! कुठे अन् कधी पूर्ण होणार? बीएमसीने संपूर्ण योजना सांगितली

SCROLL FOR NEXT