MLA Randhir Savarkar sakal
अकोला

अकोला : कोल्हापुरी बंधाऱ्याचे काम तातडीने पूर्ण करा

आमदार रणधीर सावरकरांकडून अधिकाऱ्यांना सूचना

सकाळ वृत्तसेवा

अकोला : निंभोरा कोल्हापुरी बंधाऱ्याचे काम तातडीने पूर्ण करा तसेच शेतीच्या वाहितीसाठी ग्रामस्थांना रस्त्याचे बांधकाम करून देण्यासाठी आमदार रणधीर सावरकर यांनी निंभोरा येथील कोल्हापुरी बंधाऱ्याच्या भेटी दरम्यान अधिकाऱ्यांना सूचना केल्या.

निंभोरा येथील बंधाऱ्याच्या कामाचा आढावा घेण्यासाठी जिल्‍हा जलसंधारण अधिकारी गीते, उपविभागीय जलसंधारण अधिकारी वानरे, शासकीय कंत्राटदार तसेच स्‍थानिक ग्रामस्‍थांसमवेत ४ फेब्रुवारी २०२२ रोजी प्रत्‍यक्ष भेटी दरम्‍यान कामाच्‍या प्रगतीची पाहणी आमदार रणधीर सावरकर यांनी केली.

हा बंधारा खारपाणपट्ट्यात येत असल्‍याने तो पावसाळ्यात पुराच्या पाण्‍यात स्‍थिर राहावा याकरिता बंधाऱ्याच्‍या की वाल, वींग वाल आवश्‍यकते प्रमाणे वाढविण्‍यात याव्‍यात. बंधाऱ्यापासून गावाकडे असणारा तसेच पैल तिरावरील जाणारा रस्‍ता अशा आवश्‍यक असलेल्‍या किमान ५०० मीटर लांबीमध्‍ये रस्‍त्‍याचे बांधकाम करण्‍यात यावे. बंधाऱ्याचे उर्ध्वबाजूस १००० मीटर लांबीमध्‍ये रुंदीकरण व खोलीकरण करण्‍यात यावे तसेच बंधाऱ्याच्या खालील बाजूस किमान ३०० मीटर लांबीमध्‍ये रुंदीकरण व खोलीकरण करण्‍यात यावे.

उपरोक्त कामांच्या प्रस्तावाला शासन स्तरावरून तातडीने मान्यता घेऊन कामे पूर्ण करण्यात यावीत, असे निर्देश भेटी दरम्यान आमदार रणधीर सावरकर यांनी दिले. भेटीदरम्यान ज्येष्ठ समाजिक कार्यकर्ते महादेवराव भुईभार, जिल्हा परिषद सदस्य तुकाराम दाबेराव, उपसरपंच अतुल आवारे, ताथोड गुरुजी, राजेश भुईभार, भरत काळमेघ, विनय भटकर, गणेश काळमेघ, राजेश भुईभार, केशव ताठे, गजानन राजभाट, रमेश ताठे, मनोज गावंडे, प्रमोद भुईभार, शरद ताथोड, लव भटकर आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs SL, 2nd Test, 4th Day: श्रीलंकेला आघाडी घेण्यात यश, पण भारताची सामन्यावर मजबूत पकड; सूरियाबंदाराचं शतक हुकलं

B.Arch Admission Round 3 : बी. आर्किटेक्चर प्रवेश प्रक्रियेची तिसरी यादी जाहीर; ७५८ विद्यार्थ्यांना नवी संधी, ५३६ जणांचे ऑटो फ्रिज प्रवेश निश्चित

विदर्भासह मध्य भारतात पावसाचा अलर्ट; अतिमुसळधार पावसाचा इशारा

Sakal Impact | MPSC Drug Inspector Exam Scam: एमपीएससी औषध निरीक्षक भरतीत पेपरफुटीला दुजोरा; संपूर्ण प्रक्रिया रद्द, शुल्काविना फेरपरीक्षा जाहीर

Nepal Flood: नेपाळमध्ये पावसाविना पूर! २९१ विदेशी नागरिक बेपत्ता; १०५ भारतीयांचा समावेश, १६ जणांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT