moong crop e sakal
अकोला

मुगावर ‘लिफ क्रिनकल’ विषाणुचा हल्ला, पीक उद्ध्वस्त होण्याची भीती

सकाळ वृत्तसेवा

अकोला : गेल्यावर्षी जिल्ह्यात मुगाचे अख्खे पीक (moong crop) उद्‍ध्वस्त करणाऱ्या लिफ क्रिनकल विषाणूने (crinkle virus on moong) यावर्षी सुद्धा मुगावर हल्ला चढवला असून, अकोला, अकोट, तेल्हारा तालुक्यात प्रादूर्भाव दिसून आला आहे. (lead crinkle virus attack on moong crop in akola)

कीटकशास्त्र विभाग (डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ) व कृषी विभागाच्या संयुक्तपणे तज्ज्ञांनी नुकतीच अकोला, अकोट व तेल्हारा तालुक्यातील मूग पिकाची प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी केळीवेळी, गणोरी, अपोती, आपातापा, घुसर, दहीहांडा, पाटीगाव, हिंगोणी, मानब्दा, दापोरा, पराळा, मंचणपूर, येवदा या भागामध्ये मूग पीक ३० ते ३५ दिवसाचे झाले आहे. मात्र, ८० ते ८५ टक्के मुगाचा पेरा निर्मल जातीचा असून, या पिकावर क्रिनकल व्हायरसचा प्रादूर्भाव तज्ज्ञांना आढळून आला आहे. याच भागामध्ये मागील वर्षीसुद्धा मूग पिकावर लिफ क्रिनकल विषाणूरोगाचा प्रादूर्भाव झाला होता आणि यावर्षी सुद्धा या विषाणुरोगाच्या प्रादूर्भावास सुरुवात झाल्याचे डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे किटकशास्त्र विभाग प्रमुख डॉ. डी.बी. उंदिरवाडे यांनी सांगितले आहे.

असा ओळखावा ‘लिफ क्रिनकल’चा प्रादूर्भाव -

लिफ क्रिनकल या विषाणूजन्य रोगामुळे झाडाच्या पानावर खोलगट व उभ्या भेगा दिसतात तसेच पानाची टोके खाली वाकतात व झाडे खुरटी, खुजी राहतात. झाडे शेंड्याकडून खाली वाळत येतात. पानाच्या शिरा काहीवेळा पिवळ्या पडतात. रोगग्रस्त झाडाला फुलोरा उशिरा येतो. या फुलोऱ्यास शेंगा लागत नाही.

रस शोषण करणाऱ्या किडींचे व्यवस्थापन गरजेचे -

लिफ क्रिनकल विषाणू रोगाचा प्रसार मुख्यतः रोगग्रस्त बियाण्याद्वारे होतो. एखाद्या भागात बियाण्याद्वारे या रोगाचा प्रादूर्भाव झाल्यास त्या भागात या रोगाचा दुय्यम प्रसार हा रस शोषण करणाऱ्या (मावा, पांढरी माशी व फुलकिडे) किडीमुळे होतो. त्यामुळे या रस शोषण करणाऱ्या किडीचे व्यवस्थापन करणे हे या विषाणूजन्य रोगाचा दुय्यम प्रसार टाळण्याच्या दृष्टीकोनातून देखील गरजेचे ठरते.

दुय्यम प्रसार थांबविण्यासाठी उपाययोजना -

शेत तण विरहित ठेवावे, ईश्‍वरी, कोटी चवळी या तणावर हा विषाणू जिवंत राहातो व तेथूनच किडीद्वारे पिकावर येतो. या तणाचा नाश करावा. पिकात जास्त नत्रखत देणे टाळावे. पांढऱ्या माशीचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी शेतात पेरणीनंतर १५ दिवसांनी पिवळे चिकट सापळे १५x३० सेमी आकाराचे हेक्टरी १६ पिकाच्या उंचीच्या एक फूट उंचीवर लावावे. मावा, पांढरी माशी व फुलकिडीचा प्रादुर्भाव दिसताच किंवा लीफ क्रिनकल विषाणू रोगाची सुरुवात दिसताच फिप्रोनील (५ टक्के एससी) २० मिली किंवा फ्लोनीकामाईड (५० टक्के डब्ल्यूजी) ३ ग्रॅम किंवा इमिडाक्लोप्रीड ( १७.८० टक्के एसएल) २.५ मिली किंवा थायोमिथ्याक्साम (२५ टक्के डब्ल्यूजी) ४ ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. गरज वाटल्यास १५ दिवसांनी दुसरी फवारणी करावी. फवारणी करताना किटकनाशके आलटून पालटून वापरावे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Solapur Municipal Results: साेलापूर जिल्ह्यातील नगरपालिकांमध्ये भाजप अपेक्षित यशापासून दूर; चार ठिकाणी विजय, उमेदवार निवडीत चुका नडल्या..

Mohan Bhagwat : भारत एक हिंदू राष्ट्र, हेच सत्य,संवैधानिक मंजुरीची आवश्यकता नाही; मोहन भागवत यांचे मोठे विधान

Latest Marathi News Live Update : 'जी राम जी'वर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केली स्वाक्षरी; विधेयकाचं कायद्यात झालं रुपांतर

Ajit Pawar: कोणी सुरुवात केली, तर दुसराही करू शकतो; पक्षप्रवेशाबाबत अजित पवारांचे सूचक वक्तव्य, दिल्लीतील वरिष्ठांशी बाेलेन नेमकं काय म्हणाले?

Satara District Municipality Results: सातारा जिल्ह्यात भाजप धुरंधर! दहापैकी सात पालिकांत सत्ता; राष्ट्रवादीला फटका, महाविकासचा धुव्‍वा..

SCROLL FOR NEXT