Manora Nagar Panchayat Election  sakal
अकोला

मानोरा नगर पंचायत निवडणुकीत ३९ उमेदवाराचे डिपॉझिट जप्त!

शिवसेनेने आत्मचिंतन करण्याची गरज

सकाळ वृत्तसेवा

मानोरा : नुकत्याच जाहीर झालेल्या मानोरा नगर पंचायत निवडणूक निकालात सतरा सदस्यीय नगरपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणुकीत तब्बल ३९ उमेदवारांवर डिपॉझिट जप्त होण्याची नामुष्की ओढवली, यात शिवसेना १२, भाजप ८ तर वंचित बहुजन आघाडीच्या ७ उमेदवारांचा समावेश आहे.(Manora Nagar Panchayat Election)

मानोरा नगरपंचायतीत १७ जागांसाठी सर्वात जास्त ७७ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. त्यातील १७ विजयी उमेदवार वगळता २१ उमेदवारांचे डिपॉझिट वाचले तर ३९ उमेदवाराचे डिपॉझिट जप्त होण्याची नामुष्की ओढवली. यात सर्वाधिक शिवसेनेचे १२, भाजप ८, कांग्रेस ५, वंचित बहुजन आघाडी ७, कॉंग्रेसचे ५, बहुजन समाज पक्ष २, अपक्ष ५ अशा एकूण ३९ उमेदवारांवर डिपॉझिट जप्त होण्याची नामुष्की ओढवली आहे.

डिपॉझिट जप्त झालेले उमेदवार (कंसात मिळालेली मते)

मानोरा नगर पंचायत :

  • प्रभाग एक शेख फिरोजाबी मुस्ताक भाजप (१),प्रभाग क्र दोन सुमन शामराव चिस्तलकर कांग्रेस ( ५१) उषा चंद्रप्रकाश जाधव शिवसेना ( २४ ) शीलाताई भेलके अपक्ष (४९)

  • प्रभाग क्र. तीन : भावना गणेश मानधने शिवसेना (२४)

  • प्रभाग क्र चार : मंगला प्रकाश सुरजूसे भाजप (४४), वर्षा अविनाश राजूरकर वंचित बहुजन आघाडी (२)

  • प्रभाग क्र पाच : ज्ञानेश्वर गोतरकर भाजप (२९ ) मोहन भिकाजी तायडे शिवसेना (१७)

  • प्रभाग क्र. सहा : संतोष ओंकार पुरी शिवसेना (७)

  • प्रभाग क्र. सात : अमोल श्रीकृष्ण खुणे (९) दिलीप उत्तमराव चव्हाण कांग्रेस (१७), एजाज खा दौलत खा पठाण अपक्ष (४४) चैतन्य शंकरराव रायके भाजप (२४)

  • प्रभाग क्र आठ : छबुताई संदीपान इंगळे (२३), सारिका अनिल कंठाले शिवसेना (३५), शुभांगी प्रशांत भगत (२)

  • प्रभाग क्र नऊ : नितीन धनंजय लोखंडे वंचित बहुजन आघाडी (२२) दीपाली समाधान वाघमारे शिवसेना (२८ )

  • प्रभाग क्र. दहा : अंजार अहमद खा पटेल कांग्रेस (२५), गणेश अशोकराव तायडे भाजप (७)

  • प्रभाग क्र बारा : सुशीला राजू बावणे वंचित बहुजन (१९), नफिसाबानो आखतर शेख वंचित बहुजन (१२), वंदना विष्णू सोनोने शिवसेना (८)

  • प्रभाग क्र तेरा : शारदा गजानन जाधव शिवसेना (५), मंदा नंदू वानखेडे वंचित (४९), प्रभाग क्र चौदा रफिक आ हमीद वंचित बहुजन (१९) इरफान आखतर शेख बसपा ( २ ) युनूस नाजीम शेख भाजप ( २९ ) शिवशंकर भगवान सोनटक्के शिवसेना ( ४७ )

  • प्रभाग क्र पंधरा : गणेश विष्णू पुरी शिवसेना ( २५ ) रशीदखान हमीदखान कांग्रेस ( ५२ )

  • प्रभाग क्र सोळा : मंजुषा महेश निशाणे शिवसेना ( ६ ) प्रभाग क्र सतरा चांदबेग अहमद कांग्रेस (४८ )अक्षय संदीपान इंगळे वंचित बहुजन (०)अरुण लक्ष्मण कंठाले भाजप ( २ ) शेख मुख्तार अब्दुल सत्तार अपक्ष ( ३ )

  • सोळा प्रभागातून ३९ मतदाराने नोटाला मतदान केले.

शिवसेनेने १७ पैकी १६ उमेदवारी अर्ज दाखल केले होते. त्यापौकी प्रभाग क्र १ मध्ये पक्षाचा ए बी फ्रॉम दाखल झाल्यानंतर काही कारणास्तव उमेदवाराने अर्ज मागे घेतला. प्रभाग ११ मध्ये उमेदवाराचा अर्ज भरला गेला नाही. यामध्ये १२ उमेदवाराचे डिपॉझिट जप्त झाल्याने शिवसेनाच्या नेत्यांना आत्मचिंतन करायची वेळ आली आहे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ICC ODI World Cup 2027 India Fixture: रोहित शर्मा, विराट कोहलीचा शेवटचा वर्ल्ड कप! पण, भारताचे सामने किती वाजता सुरू होणार? कुठे Free पाहता येणार?

Pune Teamperature : ऑक्टोबरच्या सुरुवातीलाच उकाड्याचे चटके; तापमान सरासरीपेक्षा एक-दोन अंशांनी अधिक राहण्याचा अंदाज

Dapoli News : दाभोळजवळ शिकारीदरम्यान बंदुकीचा मिसफायर; एकाचा मृत्यू, एक जखमी

Pune News : पुणे महापालिका आयुक्तांचा यूटर्न; ५०० वॉर्डनच्या निविदेला स्थगिती

Ghansangavi Crime : जिरडगाव येथील हॉटेलमालकाचा खून सख्ख्या भावानेच जमिनीच्या वादातून केल्याचे निष्पन्न; आरोपी भावासह दोन जण जेरबंद

SCROLL FOR NEXT