Maratha Morcha Aandolan Sakal
अकोला

Maratha Morcha Aandolan: जालन्यातील उपोषणाचे तिव्र पडसाद, भाजपा प्रदेशाध्यक्ष बावनकुळेंना दाखविले काळे झेंडे

सर्व आंदोलनकर्त्यांना बाळापूर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

सकाळ डिजिटल टीम

बाळापूर - राष्ट्रीय महामार्गावरून अकोला येथे संवाद यात्रेसाठी जात असलेल्या भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंन ताफा शेळद फाट्यावर पोहचताच सकल मराठा समाजाच्या वतीने काळे झेंडे दाखवून जालना जिल्ह्यातील घटनेचा तिव्र निषेध व्यक्त करण्यात आला.यावेळी बाळापूर पोलिसांनी सहा जणांना अटक केली आहे.

जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील अंतरावली या गावात शांततेच्या मार्गाने मराठा आरक्षणासाठी उपोषण करणाऱ्या मराठा बांधवांवर पोलिसांनी अमानुष लाठी चार्ज करून अनेक मराठा तरुण व भगिनींना जखमी केले या घटनेच्या निषेधार्थ

अकोला ते खामगाव मार्गावरून भाजपाचे प्रदेशाध्यक्ष संवाद यात्रेसाठी अकोला येथे जात असताना त्यांना काळे झेंडे दाखवत समाजाच्या वतीने निषेध आंदोलन करण्यात आले. सदर आंदोलनात देवानंद साबळे गोपाल पोहरे, प्रशांत गायकवाड विष्णू अरबट ऋषिकेश साबळे, अंकित डीवरे,यांच्यासह अनेकांचा सहभाग होता यावेळी सर्व आंदोलनकर्त्यांना बाळापूर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्याची मागणी

दरम्यान यावेळी सर्व आंदोलकांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्याची मागणी केली तसेच राज्यातील महायुती सरकारच्या विरोधात घोषणा दिल्या. आंदोलनकर्त्यांना बाळापुर पोलिसांनी ताब्यात घेऊन बाळापूर पोलीस स्टेशन येथे दुपारी तीन वाजेपर्यंत बसून ठेवण्यात येणार आहे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: सोनं खरेदीचा विचार करताय? दरात रातोरात मोठा बदल; मुंबई-पुण्यात 10 ग्रॅमचा भाव कुठे पोहोचला?

MahaDBT Scheme: २९ नव्या योजना महाडीबीटीवर, घरबसल्या १०५ शासकीय योजनांचे लाभ मिळणार; मुख्यमंत्र्यांची घोषणा

Maharashtra Weather : महाराष्ट्रात आज पावसाचा जोर वाढणार; पुणे,साताऱ्यासह 'या' जिल्ह्यांना येलो अलर्ट, तुमच्या भागात कसे असेल हवामान?

Landowners Compensation Hike: जमीनमालकांसाठी नुकसानभरपाईत वाढ, ४० वर्षांनंतर उच्च न्यायालयाचा निर्णय

TB मुक्तीसाठी 'सरपंचां'ना साकडं! गावागावांत 'हँड हेल्ड एक्स-रे'द्वारे स्क्रीनिंग; लक्षणे नसलेल्या रुग्णांना शोधून मोफत उपचार

SCROLL FOR NEXT