Paras Thermal Power Station sakal
अकोला

अकोला : पारस औष्णिक विद्युत केंद्राबाबत आज मंत्रालयात बैठक

सौर ऊर्जा प्रकल्प न उभारण्याची प्रवीण भोटकर यांनी केली होती मागणी

सकाळ वृत्तसेवा

अकोला : महाराष्ट्र राज्य रुग्णसेवक व श्रमिक कामगार संघटनेचे अध्यक्ष प्रवीण भोटकर यांनी पारस येथे सौर ऊर्जा प्रकल्प न करता औष्णिक विद्युत प्रकल्पाचे विस्तारीकरण करण्याची मागणी ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांच्याकडे लावून धरली होती. ऊर्जा मंत्र्यांनी यासंदर्भात मंत्रालयात बैठकीचे आयोजन केल्याची माहिती भोटकर यांनी दिली आहे.

प्रवीण भोटकर यांनी बेरोजगारांना रोजगार देणाऱ्या पारस औष्णिक विद्युत प्रकल्पाचे विस्तारीकरण करावे यासाठी ऊर्जा मंत्र्यांना निवेदन दिले होते. पारस येथील औष्णिक विद्युत प्रकल्पाचे विस्तारीकरण करण्यासाठी प्रकल्पालगतची शेती शासनाने सात वर्षांपूर्वीच अधिग्रहित केली. परंतु, त्यावर औष्णिक विद्युत प्रकल्पाऐवजी सौर ऊर्जा प्रकल्प निर्मितीचा घाट घातला जात असल्याने शासन शेतकऱ्यांची फसवणूक करत असल्याची तक्रार भोटकर यांनी ऊर्जा मंत्र्यांकडे केली होती. त्याची दखल घेत ऊर्जामंत्र्यांनी एका महत्वपूर्ण बैठकीचे आयोजन १ फेब्रुवारी रोजी मंत्रालयात केल्याची माहिती भोटकर यांनी दिली.

या बैठकीला आमदार नितीन देशमुख व प्रवीण भोटकर यांना निमंत्रित करण्यात आले असून, प्रशासनातर्फे ऊर्जा विभागाचे प्रधान सचिव तथा व्यवस्थापकीय संचालक महापारेषण, मंत्रालयातील ऊर्जा विभागाचे संबंधित सहसचिव व उपसचिव, महानिर्मिती व महावितरणचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक, मुख्य कार्यकारी अधिकारी जि.प. अकोला यांना उपस्थित राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. महासंचालक महाऊर्जा पुणे, संचालक महानिर्मिती व महावितरण, प्रादेशिक संचालक नागपूर महावितरण, मुख्य अभियंता जलजीवन मिशन अमरावती, अधीक्षक अभियंता जलजीवन मिशन अकोला, मुख्य अभियंता औष्णिक विद्युत प्रकल्प पारस व अकोला हे व्हिडीओ काँफरन्सिंगद्वारे बैठकीला उपस्थित राहणार असल्याचेही महाराष्ट्र राज्य रुग्णसेवक व श्रमिक कामगार संघटनेद्वारे कळविण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Pune Expressway Accident : मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर रक्ताचा सडा! खोपोली बोगद्याजवळ 5 गाड्यांचा काळजाचा थरकाप उडवणारा अपघात; 3 जण जागीच ठार

LPG E-KYC Mandatory : सिलिंडर हवाय? मग आधी 'हे' काम करा; गॅस केवायसीसाठी सरकारने दिली नवीन सोय

Gudi Padwa 2026 Recipes: साखरेच्या गाठी बाजारातून विकत घेण्याऐवजी घरीच तयार करा; इतकी सोपी रेसिपी तुम्हाला कुठेच नाही मिळणार

Kagal MIDC Accident : दुबईहून सुट्टीला आलेल्या १३ वर्षीय मुलाचा अपघातात मृत्यू, कागल पंचतारांकित औद्योगिक वसाहतीत काळजाचा थरकाप उडवणारी घटना

Pune ZP President Election : पुणे जिल्हा परिषदेसाठी अखेर अध्यक्ष-उपाध्यक्षपदाचे उमेदवार ठरले; दोन्ही पदे राष्ट्रवादीकडेच राहणार

SCROLL FOR NEXT