Mhatodi gram panchayat fined for wasting court time sakal
अकोला

अकोला : न्यायालयाचा वेळ घालविल्याबद्दल म्हातोडी ग्रामपंचायतला दंड

याचिकाकर्त्यांची बाजू ॲड. संदीप मालपाणी यांनी मांडली

सकाळ वृत्तसेवा

अकोला : एकाच प्रकरणात ग्रामपंचायत म्हातोडीचे सचिव संजय खर्चान यांनी दाखल केलेला अर्ज रद्द करून न्यायालयाचा अमुल्य वेळ वाया घालविल्याबद्दल ग्रामपंचायतला पाच हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे.म्हातोडी येथील रहिवाशी रविंदर मा, भांडे, रामराव ग. भांडे, सुरेश ना. भांडे यांनी गावामध्ये विकास कामे चालू असताना ती विकासकामे रितसर आणि रस्ते नकाशानुसार व्हावी याकरिता विद्यमान ग्रामपंचाय सचिव व संबंधित विभागाला अर्ज केले.

परंतु त्यावेळेसचे सचिव व विद्यमान सचिव यांनी अर्जदारांची घरेच अतिक्रमणात दाखविली. वडिलोर्पाजित घरांच्या नोंदणीही गहाळ केल्यात.त्यामुळे संबंधितांनी न्याय मिळविण्यासाठी न्यायालयात धाव घेतली.ही याचिका खारीज करण्यासाठी सचिवांनी केलेला पहिला अर्ज न्यायालयाने फेटाळून लावला. त्यानंतरही न्ययालयात दुसरा अर्ज दाखल केला. हा अर्जही न्यायालयाने फेटाळून लावत व न्यायालयाचा वेळ घालविल्याबद्दल ग्रामपंचायत म्हातोडीला पाच हजार रुपायंचे दंड ठोठावला. याचिकाकर्त्यांची बाजू ॲड. संदीप मालपाणी यांनी मांडली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Modi Cabinet Reshuffle : १२ मंत्र्यांना हटवले होते; मोदी सरकारचा शेवटचा मंत्रिमंडळ फेरबदल कधी झाला होता? आता दिग्गजांची गच्छंती?

Latest Marathi News Live Update : पावसाने मुंबईकरांचे हाल, वेस्टर्न एक्सप्रेस वेवर प्रचंड वाहतूक कोंडी

'हेरा फेरी 3'ला मोठा धक्का? दिग्दर्शनाबाबत निर्मात्यांचा मोठा खुलासा

Fifa World Cup: किलियन एम्बापेचा जलवा... Golden Boot च्या शर्यतीत मेस्सीला मागे टाकले; फ्रान्स, नॉर्वे अन् मेक्सिको Round of 16 मध्ये

IND vs ENG 1st T20I: वैभव सूर्यवंशीची सोशल मीडियावर हवा! श्रेयस अय्यर म्हणतो, मला ती दिसत नाही, कारण...; विधानाची जोरदार चर्चा

SCROLL FOR NEXT