corona vaccination Sakal
अकोला

‘कवच कुंडल’मध्ये लसीकरणाकडे पाठ!

कोरोना विषाणूची संभाव्य तिसरी लाट थोपवण्यासाठी जिल्ह्यात ८ ते १४ ऑक्टोबरपर्यंत मिशन कवच कुंडल अभियान राबविण्यात आले.

सकाळ वृत्तसेवा

अकोला - कोरोना विषाणूची संभाव्य तिसरी लाट थोपवण्यासाठी जिल्ह्यात ८ ते १४ ऑक्टोबरपर्यंत मिशन कवच कुंडल अभियान राबविण्यात आले. त्यामध्ये दररोज २० हजारांहून अधिक या प्रमाणे सात दिवसांत १ लाख ४० हजार नागरिकांचे लसीकरण करण्याचे उद्दिष्ट प्रशासनाने समोर ठेवले होते. परंतु या काळात केवळ ५३ हजार ४० नागरिकांनीच लस घेतली. आरोग्य विभागाने प्रयत्न केल्यानंतर सुद्धा नागरिकांनी लसीकरणाकडे पाठ फिरवल्याने निश्चित उद्दिष्ट गाठता आले नाही.

कोरोना विषाणू विरोधातील लढ्यात कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणाला विशेष महत्व आहे. पहिल्या लाटेनंतर लसीकरण मोहीम सुरू झाल्यापासून आतापर्यंत आरोग्य विभागामार्फत नागरिकांच्या लसीकरणावर जोर देण्यात येत आहे. अधिकाधिक नागरिकांनी लस घ्यावी यासाठी नागरिकांना लस सुद्धा मोफत देण्यात येत आहे.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये लस घेणाऱ्यांवर विषाणूचा हल्ला झाल्यानंतर सुद्धा लसवंताला फारसा प्रभाव न झाल्याचे तज्ज्ञांचे म्हणने आहे. त्यामुळे आरोग्य विभागामार्फत लसीकरणासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. दरम्यान कोरोनाची तिसरी लाट येणाऱ्या शक्यता सुद्धा आरोग्य विभागाने व्यक्त केली आहे. सदर लाट थोपवण्यासाठी लसीकरण हाच एकमात्र उपाय असल्याचे सांगितल्या जात आहे.

लसीकरणाची गती वाढवण्यासाठी व अधिकाधिक नागरिकांना लस मिळावी यासाठी राज्यासह जिल्ह्यात ८ ते १४ ऑक्टोबर या कालावधीत मिशन कवच कुंडल अभियान राबविण्यात आले. त्यामध्ये दररोज किमान २० हजार नागरिकांचे लसीकरण करण्याचे उद्दिष्ट समोर ठेवण्यात आले होते. परंतु या अभियानाच्या सात दिवसांत एकही दिवस ९ हजारावर लसीकरण होऊ शकले नाही, तर सात दिवस केवळ ५३ हजार ४० नागरिकांनी लस घेतली. त्यामुळे अभियानाच्या यशस्वीतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

पहिला डोस घेण्यास प्राधान्य

कवच कुंडल अभियानादरम्यान जिल्ह्यातील ३३ हजार ४५८ नागरिकांनी कोरोनाचा पहिला तर १९ हजार ५८६ नागरिकांनी कोरोनाचा दुसरा डोस घेतला. त्यामुळे अद्याप कोरोनाची लस न घेणाऱ्यांना लस घेण्यास प्रोत्साहित करण्याचा उद्देश्य मात्र अभियानामुळे काही प्रमाणात साध्य झाल्याचे दिसून येत आहे.

अभियानादरम्यान असे झाले लसीकरण

तारीख लसीकरण

८ ऑक्टोबर ७९६०

९ ऑक्टोबर ७८५७

१० ऑक्टोबर ६२८५

११ ऑक्टोबर ७७३७

१२ ऑक्टोबर ७९३१

१३ ऑक्टोबर ८८४६

१४ ऑक्टोबर ६४२८

------------------------

एकूण ५३०४०

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dattatreya Hosabale : 'भारताने पाकिस्तानशी संवादाची दारे पूर्णपणे बंद करू नयेत'; RSS सरचिटणीसांचं मोठं विधान, हिंदूराष्ट्राबाबतही केलं भाष्य

SSC HSC Supplementary Exam : दहावी-बारावीची पुरवणी परीक्षा १६ जूनपासून; राज्य मंडळातर्फे परीक्षेचे वेळापत्रक जाहीर

Latest Marathi News Live Update : CBI चं पथक नाशिकमध्ये दाखल; नीट प्रकरणातील संशयित आरोपी शुभम खैरनारचा घेणार ताबा

पंतप्रधानांच्या इंधन बचतीच्या आवाहनचे पडसाद! जितेंद्र आव्हाडांचा घोड्यावरून प्रवास; मोर्चा काढत केंद्र सरकारवर टीका

Sangli Wall Collapse : मरगुबाई देवीच्या धार्मिक कार्यक्रमाला गालबोट; वादळी वाऱ्यामुळे अंगावर चिरा-विटांची भिंत कोसळून 5 ते 6 भाविक ठार, 12 जण जखमी

SCROLL FOR NEXT