buffalo rain 
अकोला

मृगाच वाहन म्हैस...म्हणे भाऊ पाऊस खूप पडेल

मनोज भिवगडे

अकोला : 21 व्या शतकात हवामान खात्याकडे अत्याधुनिक यंत्रणा, प्रत्यक्ष ढगांचे छायाचित्र देणारे  उपग्रह उपलब्ध असताना पारंपरिक पद्धतीने नक्षत्रांच्या आधारावर पावसाचा अंदाज बांधला जाण्याची पद्धत आजही भारतात हे. मृग नक्षत्रापासून मॉन्सूनच्या पावसाची सुरुवात होते. मृग नक्षत्राच्या पहिल्याच दिवशी एकतरी सर कोसळते, असा समज आहे. त्यातच नक्षत्राच्या वाहनावरून त्या नक्षत्रात किती पाऊस पडणार याचा अंदाज बांधला जातो. यावर्षी तर मृगाचे वाहनच भरपूर पाऊस देणारे म्हैस आहे, मग काय मृगात भरपूर पाऊस पडणार.... अर्थातच नक्षत्रांच्या आधारावर बांधल्या जाणाऱ्या या अंदाजावर किती विश्वास ठेवायचा हा जर-तरचा प्रश्न आहे. 

भारतीय खगोलशास्त्रानुसार एकूण सत्तावीस नक्षत्रांपैकी पावसाची नऊ नक्षत्रे आहेत. पृथ्वीभोवती फिरणाऱ्या संपूर्ण नभोमंडळाचे एकूण सत्तावीस भाग भारतीय शास्त्रात पाडले गेले आहेत. प्रत्येक भागाचा तारकासमूह निर्देशित केला गेला आहे. त्यांना भारतीय खगोलविज्ञानात नक्षत्रे असे म्हणतात. ती नक्षत्रे अश्विनी, भरणी, कृतिका, रोहिणी, मृग, आर्द्रा, पुनर्वसु, पुष्य, आश्लेषा, मघा, पूर्वा (फाल्गुनी), उत्तरा (फाल्गुनी), हस्त, चित्रा, स्वाती, विशाखा, अनुराधा, ज्येष्ठा, मूळा, पूर्वा (आषाढा), उत्तरा (आषाढा), श्रवण, घनिष्ठा,  शततारका, पूर्वा (भाद्रपदा), उत्तरा (भाद्रपदा), रेवती, अशा नावाने ओळखली जातात. ही सत्तावीस नक्षत्रे म्हणजे डोळ्यांना दिसणारे पूर्ण नभोमंडळ नव्हे. सूर्य, चंद्र हे पृथ्वीभोवती फिरताना (दृष्टिभ्रम!) त्यांच्या मागे जे-जे तारकासमूह येतात त्यांना नक्षत्रे समजली जातात. सत्तावीस नक्षत्रांव्यतिरिक्त नभोमंडळात अनेक तारकासमूह आहेत, पण त्यांना नक्षत्रे म्हणत नाहीत. यातील पर्जन्य नक्षत्रे म्हणून ओळखली जातात, ती नक्षत्रे म्हणजे मृग नक्षत्रापासून ते हस्त नक्षत्रापर्यंत. ती भारताची जीवनदायी नक्षत्रे म्हणूनही संबोधली जातात. वेदग्रंथात सत्तावीस नक्षत्रांचा सविस्तर उल्लेख आहे. एका राशीत अंदाजे अडीच नक्षत्रे येतात. नक्षत्रे किंवा राशी यांची नावे त्यांच्या विशिष्ट आकृतीवरून ठेवली गेली आहेत. 

पावसाची नक्षत्रे आणि वाहन
दिनदर्शिकेवर जून ते ऑक्टोबर या काळात काही तारखांना सूर्याचा नक्षत्र प्रवेश आणि त्याच्या वाहनांची नाव लिहिलेले आढळतात. यावर्षी सूर्याच्या मृग नक्षत्राला 7 जूनपासून सुरुवात होत असताना म्हैस हे वाहन दर्शविली आहे. पावसाची सहसा ९ नक्षत्रे मानली जातात. त्यावरूनच 27-9=0 ही कूटप्रश्नाची कथा प्रसिद्ध आहे. पण दिनदर्शिकेत मृग ते स्वाती अशी एकूण 11 नक्षत्रे दिली जातात. मॉन्सूनपूर्व पावसाचे रोहिणी हे देखील नक्षत्र धरले जाते. सूर्याच्या भासमान भ्रमणमार्गात वर्षातील ठराविक दिवशी एक-एक करीत 27 नक्षत्रे सूर्यापलिकडील आकाशात जात राहतात. हाच सूर्याचा नक्षत्र प्रवेश.

वाहन काढण्याची पद्धत
सूर्य ज्या नक्षत्रात प्रवेश करेल त्या नक्षत्रापासून प्रवेशकालीन चंद्र नक्षत्रापर्यंत नक्षत्रसंख्या मोजावी आणि येणाऱ्या संख्येस 9 ने भागावे. जी बाकी उरेल त्यानुसार प्रत्येक अंकास एक-एक प्राणी वाहन म्हणून दिला आहे.
बाकी      वाहन            
0         हत्ती               
1         घोडा              
2         कोल्हा            
3          बेडूक             
4         मेंढा
5          मोर
6          उंदीर 
7          म्हैस
8        गाढव


यंदा मृगात म्हैस वाहन, मग पाऊसही भरपूर पडणार 
नक्षत्राची वाहने व त्यानूसार पावसाचा अंदाज बांधण्याची पद्धत आहे. हत्ती, बेडूक आणि म्हैस या वाहनांना भरपूर पाऊस तर उंदीर, गाढव, मेंढा यांना कमी पाऊस अपेक्षित असतो. मोर, कोल्हा आणि घोडा आल्यास मध्यम पाऊस पडेल असे मानले जाते. यंदा मृगाचेच वाहन म्हैस असल्याने सुरुवातीलाच चांगला पाऊस येईल, असा अंदाज आहे. खरे-खोटे येणाऱ्या काळात सिद्ध होईलच.  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

माेठी बातमी! 'जुन्या थकीत कर्जदारांना दिलासा नाही'; जिल्हा बँकेचा शासनाकडे प्रस्ताव, माेठे अपडेट आले समाेर..

Rishabh Pant record: धडाकेबाज रिषभ पंतने लॉर्ड्सवर रचला इतिहास!, सर विव रिचर्ड्स यांचा 'हा' विक्रम मोडला

Latest Marathi News Updates : पन्हाळगडाचा जागतिक वारसा यादीत समावेश, कोल्हापूरसाठी गौरवाचा क्षण - पालकमंत्री प्रकाश आबिटकर

छत्रपती शिवरायांचा इतिहास जगभर पोहोचणार, UNESCO यादीत पन्हाळगडाचा समावेश; पालकमंत्र्यांनी 'या' घटनेची करुन दिली आठवण

Crime News : नाशिक रोडवरील चोरट्यांनी आर्मी नर्सिंग परीक्षेला आलेल्या उमेदवाराला लुटले; एक लाख पाच हजारांचा ऐवज जप्त

SCROLL FOR NEXT