court sakal
अकोला

अकोला : महापौरांसह सभापती, तत्कालीन आयुक्तांवर गुन्हे दाखल करण्यास स्थगिती

ही स्थगिती पुढील आदेशापर्यंत लागू राहणार असून, याचिकेवर पुढील सुनावणी १० जानेवारी २०२२ राेजी सुनावणी हाेणार आहे.

सकाळ वृत्तसेवा

अकोला : महापालिकेच्या (Akola Corporation) सर्वसाधारण सभा व स्थायी समितीच्या सभेतील ठरावप्रकरणी शासनाने दिलेल्या फाैजदारी कार्यवाहीला शनिवारी (ता. १८) मुंबई उच्च न्यायालयाच्या (Mumbai HighCourt) नागपूर खंडपीठाने स्थगिती दिली आहे. मंजूर केलेले ठराव महापालिका अधिनियमातील तरतुदींचे उल्लंघन करुन तसेच मनपाच्या हितास बाधा पोहाेचवणारे असल्याने आजी-माजी महापौर (Mayor), स्थायी समितीचे माजी सभापती, तत्कालीन आयुक्त आणि नगर सचिवांवर एफआयर दाखल करण्याचा आदेश नगर विकास विभागाने दिले हाेते. या आदेशाला भाजप नेत्यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. ही स्थगिती पुढील आदेशापर्यंत लागू राहणार असून, याचिकेवर पुढील सुनावणी १० जानेवारी २०२२ राेजी सुनावणी हाेणार आहे.

१ जानेवारी २०१८ ते ३१ डिसेंबर २०२० या कालावधीत मनपा सभांमध्ये १३९ ठराव वेळेवर येणाऱ्या विषयात मंजूर करण्यात आले हाेते. या १३९ ठरावांच्या अनुषंगाने शिवसेनेचे नेते गोपीकिशन बाजोरीया यांनी शासनाकडे तक्रार केली हाेती. याबाबत शासनाने विभागीय आयुक्तांना चौकशी अहवाल पाठवण्याचा आदेश दिला हाेता. ठराव वेळेवर मंजूर करणे हे, महाराष्ट्र अधिनियमातील तरतुदीचे उल्लंघन आहे, असा ठपका विभागीय आयुक्तांनी अहवाल ठेवला हाेता.

या अहवालावरुन वेळेवर मंजूर केलेले १३९ प्रस्ताव तात्पुरत्या स्वरुपात निलंबित करण्यात येत असल्याचा आदेश नगर विकास विभागाने १४ डिसेंबर राेजी जारी केला हाेता. दरम्यान मनपा ठराव निलंबन आदेश प्रकरणी माजी महापाैर तथा भाजपचे महानगराध्यक्ष नगरसेवक विजय अग्रवाल यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात धाव घेतली हाेती. या याचिकेवर न्या. ए.एस. चांदूरकर आणि न्या. जी.ए . सानप यांच्या खंडपीठावसमाेर सुनावणी झाली. अग्रवाल यांच्याकडून ॲड सुनील मनोहर, ॲड अक्षय नाईक, ॲड रोहन मालवीया यांनी बाजू मांडली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

What is the E20 Petrol Mandate 2026? पेट्रोलचे नियम बदलणार! तुमच्या गाडीत 'हे' इंधन भरण्यापूर्वी ही बातमी नक्की वाचा, अन्यथा...

श्रीदेवींच्या निधनामागे स्ट्रिक्ट डायट कारणीभूत? बोनी कपूरांचा खुलासा, म्हणाले...'ती मीठचं खात नव्हती'

HSC Exam Paper Leak : केमिस्ट्री, फिजीक्सनंतर बारावीचा गणिताचा पेपर फुटला; नागपुरात घडला प्रकार, सीलबंद लिफाफ्यातून प्रश्नपत्रिका गायब?

Medha Mankumre Point Accident : मेढ्यातील मानकुमरे पॉइंटजवळ उलटली कार; पाचवड-खेड हायवेवर नेमकं काय घडतंय? ठेकेदाराच्या 'या' चुकीमुळे प्रवाशांचा जीव धोक्यात!

Marathi Bhasha Gaurav Din: 27 फेब्रुवारीलाच का साजरा केला जातो मराठी भाषा गौरव दिन? जाणून घ्या महत्त्व आणि इतिहास

SCROLL FOR NEXT