neelam gorhe says there is need of buddy cop scheme in every school akola
neelam gorhe says there is need of buddy cop scheme in every school akola Sakal
अकोला

Neelam Gorhe : प्रत्येक शाळेत ‘बडीकॉप’ योजना राबविण्याची गरज - नीलम गोऱ्हे

सकाळ वृत्तसेवा

Akola News : मुलींची सुरक्षितता महत्त्वाची असून, विविध कायद्याबाबतची महिती त्यांच्यापर्यंत पोहोचवणे, शाळांमधे तक्रारपेटी उपलब्ध असणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांत जाणीव-जागृती करून प्रत्येक शाळा व महाविद्यालयामध्ये ‘एक विद्यार्थिनी,

एक विद्यार्थी’ याप्रमाणे पोलिस कॅडेट म्हणून समाविष्ट असणारी ‘बडी कॉप’ योजना राबवावी, अशी सूचना विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी येथे केली. उपसभापती श्रीमती गोऱ्हे यांनी आज अकोला दौऱ्यात शासकीय विश्रामगृहात पोलिस प्रशासनाची बैठक घेऊन विविध विषयांचा आढावा घेतला.

महिला अत्याचाराच्या घटनेमध्ये १५ दिवसात चार्ज शिट, विशेष सरकारी वकिलांची नेमणूक करीत या केसेस फास्टट्रॅक कोर्टात चालवणे आवश्यक आहे. अशा घटनेतील आरोपीची हिस्ट्री नोंद करून अशा आरोपींविरुद्ध कठोर कारवाई होणे गरजेचे आहे, असेही श्रीमती गोऱ्हे यांनी सांगितले.

शक्ती सुधारणा विधेयक विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात संमत झाल्यानंतर केंद्राकडे पाठवण्यात आले असून, याबाबत केंद्राने काही दुरुस्त्या सुचवलेल्या आहेत. त्यामुळे शक्ती सुधारणा विधेयकाची जनजागृती व केंद्राच्या मंजुरीनंतर प्रभावी अंमलबजावणी होणे गरजेचे आहे, असे त्यांनी सांगितले. बैठकीला पोलिस अधीक्षक संदीप घुगे व इतर पोलिस अधिकारी उपस्थित होते.

विधान परिषदेला शंभर वर्ष, राष्ट्रपतींची उपस्थिती

विधान परिषदेला शंभर वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त फेब्रुवारी २०२४ मध्ये राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या उपस्थितीत मुंबई येथे शतकोत्तर महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून, यावेळी राज्यातील आजी-माजी आमदारांना निमंत्रित करण्यात येणार असल्याची माहिती उपसभापती श्रीमती गोऱ्हे यांनी दिली.

शताब्दी महोत्सवाच्या निमित्ताने आजवरच्या विविध १०० प्रस्तावावरील चर्चा याबाबत ग्रंथ ही प्रकाशित करण्यात येणार आहे तसेच दीर्घकाळ विधिमंडळाचे वार्तांकन करणाऱ्या पत्रकारांचा स्नेह मेळावा आयोजित करण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Aditya Thackeray: मतदानाचा टक्का का कमी होतोय?, आदित्य ठाकरेंनी सांगितलं कारण! निवडणूक आयोगाला दाखवला आरसा

Aadesh Bandekar: पवईतील मतदान केंद्रातील EVM मशीन बंद; आदेश बांदेकर 3 तास रांगेत उभे, मतदार संतापले

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: अमिर खान, किरण राय यांनी बजावला मतदानाचा हक्क

CM Eknath Shinde : मुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघात मतदानाचा टक्का जास्त; दुपारी 1 पर्यंत झाले 29.88 टक्के मतदान

Latest Marathi Live News Update: मुख्यमंत्री शिंदे यांचा अचानक मीरा-भाईंदर शहरात दौरा, कार्यकर्त्यांच्या घेतल्या धावत्या भेटी

SCROLL FOR NEXT