No more zoning zones should be added, Health Minister Rajesh Tope told the administration akola marathi news 
अकोला

आता यापुढे एकही कंटेमेंट झोन वाढता कामा नये, आरोग्य मंत्री राजेश टोपे यांची प्रशासनाला तंबी

सकाळ वृत्तसेेवा

अकोला  ः अकोल्यात वाढत असलेली रुग्णसंख्या आणि राज्यापेक्षाही अधिक असलेला मृत्यूदर हा सरकारच्या मांनकांच्या विरुद्ध आहे. ही रुग्णसंख्या का वाढत आहे आणि मृत्यू होऊच नये यासाठी कोणतेही कारणे सांगू नका, शहरात ९४ झोनमधून रुग्णवाढ थांबली आहे तर ३४ झोनमधून रुग्ण आढळून येत आहेत. आता या ३४ झोनवर लक्ष केंद्रीत करा, आता यापुढेही अकोल्यात एकही प्रतिबंधित क्षेत्र वाढता कामा नये अशी तंबी आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी गुरुवारी (ता.४) येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तथा सर्वोपचार रुग्णालयात आयोजित पत्रकार परिषदेत दिली.


अकोल्याची रुग्णसंख्या ६५० पेक्षा अधिक झाली आहे तर मृत्यू ३४ झाले आहेत. जेथे राज्याचा डबलिंग रेट हा साडेसतरा दिवसांचा आहे तर अकोल्यात तो १३ दिवसांचा आहे. मृत्यू दर राज्याचा ३ टक्के आहे तर अकोल्यात तो साडेपाच टक्के आहे. या आणि इतर कारणांमुळे अकोल्याचा आढावा घेण्यासाठी आलो असल्याचे सांगत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आधी लोकप्रतिनिधींशी संवाद साधला तर नंतर पत्रकार परिषद घेतली. १२ वाजता सुरू झालेल्या या पत्रकार परिषदेत सर्वाधिक रुग्ण हे अकोला महानगरपालिका हद्दीतील असून, यामुळे पोलिस विभाग, जिल्हा प्रशासन आणि महानगरपालिका यांच्यामध्ये सन्मवय दिसून येत नसल्याचे त्यांनी सांगितले. आता काहीही करा, कोणतेही कारणे सांगू नका, हवी ती मदत देण्यास तयार आहे मात्र, यापुढे एकही प्रतिबंधित क्षेत्र वाढता कामा नये त्यासाठी एकजूटीने काम करा अशा सूचना त्यांनी यांनी उपस्थित प्रशासकीय अधिकाऱ्यांना दिल्या.

अकोला जिल्ह्यातील बातम्यांसाठी क्लिक करा

यावेळी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, महानगरपालिकेचे आयुक्त संजय कापडणीस, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. कुसुमाकर घोरपडे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. राजकुमार चव्हाण, जिल्हा पोलिस अधीक्षक अमोघ गावकर यांच्यासह आरोग्य विभागातील अधिकारी, कर्मचारी यांची उपस्थिती होती.

अकोल्यात रुग्णवाढीचे ही कारणे सांगितली आरोग्यमंत्र्यानीअकोल्याचा आढावा घेतल्यानंतर उपस्थितांनी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना अकोल्यात रुग्णसंख्या वाढण्या मागची कारणे विचारली असता आरोग्यमंत्री म्हणाले की, घेतलेल्या आढावा बैठकीत असे लक्षात आले की, अकोल्यात प्रॅक्टीस करणारे डॉक्टर, व्यापारी, दुकानदार, मरकजवरून परतलेले नागरिक आणि मधल्या काळात मुंबईवरून परतलेल्यांमुळे अकोल्यात रुग्णसंख्या वाढली असून, येत्या काळात ही रुग्णसंख्या कमी होणार आहे.

सूचना दिल्या पालन झाले पाहीजे
यावेळी उपस्थित प्रशासकीय अधिकाऱ्यांना सूचना दिल्यानंतर या सूचनांचे पालन करा, पालन झाले नाही तर कारवाईला सामोरे जावे लागेल यात कुणाचाही मुलाजा ठेवल्या जाणार नाही असाही इशारा त्यांनी यावेळी उपस्थित प्रशासकीय अधिकाऱ्यांना दिल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Modi AI video: पंतप्रधान मोदी अन् त्यांच्या आईंचा 'AI' व्हिडिओ प्रकरणी, आता काँग्रेस 'IT' सेलच्या नेत्यांविरुद्ध 'FIR' दाखल!

Umarga News : आरक्षण मिळावे या मागणीसाठी बंजारा समाजातील तरुणाने संपविले जीवन

Heavy Rain : शेलगाव (ज.) मध्ये ढगफुटी सदृश्य पावसाने धुमाकूळ; लोकांच्या घरात शिरले पाणी

Anurag Thakur : जेव्हा देशाला गरज असते तेव्हा गांधी दांड्या मारतात; अनुराग ठाकूर यांची टीका

Beed Crime: बीडच्या परळीमध्ये धक्कादायक घटना! पोट फाडून पत्नीचा खून; नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT