on occasion of Akshaya tritiya movie Manonmani released in Maharashtra starring Pranjali Kanzarkar Sakal
अकोला

अक्षयतृतीयेच्या पर्वावर “मनोमनी” हा चित्रपट महाराष्ट्रात प्रकाशित,संतनगरी शेगांवची प्रांजली कंझारकरची मुख्य अभिनेत्रीची भुमिका

अक्षय तृतीयेच्या शुभपर्वावर मनोमनी हा मराठी चित्रपट सांगली येथुन प्रर्दशित करण्यात आला आहे.

सकाळ वृत्तसेवा

शेगाव(बुलढाणा)- अक्षय तृतीयेच्या शुभपर्वावर मनोमनी हा मराठी चित्रपट सांगली येथुन प्रर्दशित करण्यात आला आहे.हा चित्रपट महाराष्ट्रातील विविध चित्रपट गृहामध्ये पर्दशित होत आहे. या चित्रपटामध्ये शेगांवची प्रांजली कंझारकर ही या चित्रपटामध्ये मुख्य अभिनेत्रीची भुमिका बजावित आहे.जिल्ह्यासाठी ही बाब गौरवास्पद म्हणावी लागेल.

या चित्रपटामध्ये कलाकार – प्राजंली कंझारकर, रोहित परशुराम ( appi amchi collector -झी मराठी सिरीयल फेम) सुप्रिती शिवळकर, मिलींद जाधव, संजय देवकर, चैत्राली जाधव आदी प्रमुख भुमिकेत असणार आहेत.

मराठी चित्रपट सृष्टीमध्ये शेगांव येथे वास्तव्यास असलेल्या प्राजंली कंझारकर ची अभिनय हा नक्कीच शेगंावकरांकरीता अभिमानास्पद बाब आहे.शेगांव शहर परिसरात लहानाची मोठी झालेली प्रांजल हिला सुरुवातीपासून सिने क्षेत्रात काम करण्याची आवड होती. त्या अनुषंगाने शालेय शिक्षणासोबतच तिचे ओढ ही सिनेमा जगताकडे होती.

तिचा मनोमनी हा चित्रपट दि. 10 मे रोजी अक्षय तृतीयेच्या दिवशी प्रर्दशित करण्यात आला आहे. या चित्रपटाचे चित्रीकरण हे सांगली येथे करण्यात आले आहे.के.ए.फिल्म अँड एंटरटेनमेंट च्या वतीने या मनोमनी चित्रपटाची निर्मीती करण्यात आली असुन मुख्य निर्माते अविनाश कोगनोळे,

सहनिर्माते वर्धन चौगुले, तर दिग्दर्शकः संजय देवकर, छायांकन- जयसिंग राजपुरोहित यांनी प्रमुख कार्यभार पार पाडला आहे. या चित्रपटाची कथा आणि पटकथा निर्माते अविनाश कोगनाळे यांची असून या चित्रपटाचे संगीतकार राहुल घाेरपडे व वेशभूषेकरीता सतीश संाडभोर यांनी काम पाहिले आहे.

प्राजंली कंझारकर हीने वेगवेगळ्या चित्रपटामध्ये अभिनयाची भुमिका पार पाडली आहेत. त्यामध्ये बबन, एकदम कडक तसेच डॉली या तेलगु चित्रपटामध्ये ही तिने काम केलेले आहे .

शेगांव येथील प्रांजली कंझारकर हिचा हा मनोमनी चित्रपट महाराष्ट्रात प्रर्दशित झाला असल्याने याबद्दल शेगांवकरांना स्वार्थ अभिमान आहे. तिने तिच्या सिनेसृष्टीतील करिअरमध्ये उत्त्ुंग भरारी घ्यावी अशी मनोकामना शेगांव करांकडून व्यक्त होत आहे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shubman Gill: 'किंग' कोहलीकडून 'प्रिन्स'चं भरभरून कौतुक! म्हणाला, 'स्टार बॉय, तू इतिहास...'

Latest Maharashtra News Live Updates: पाण्यात अडकलेल्या तरुणाची रेस्क्यू टीमने केली सुटका

Weekly Horoscope: या आठवड्यात गुरु-आदित्य योगामुळे 'या' 5 राशींवर धनवर्षा, बँक खात्यात होईल मोठी भर, जाणून घ्या तुमचं करिअर राशीभविष्य

Maharashtra Rain News: राज्यात पुढचे ४ दिवस मुसळधार, पहा कुठे -कोणता अलर्ट? | Weather Alert

Video : “...अन् साक्षात पांडुरंगाचं दर्शन झालं”, पंढरपूरला निघालेल्या दिव्यांग आजोबांचा वारीतला व्हिडिओ पाहून शॉक व्हाल..

SCROLL FOR NEXT