Pohardevi Sakal
अकोला

पोहरादेवीच्या विकासासाठी शंभर कोटी मंजूर

कामे तातडीने पूर्ण करण्याचे पालकमंत्र्यांचे निर्देश

सकाळ वृत्तसेवा

वाशिम - देशातील कोट्यवधी बंजारा समाज बांधवांचे हे मुख्य तिर्थक्षेत्र पोहरादेवी आहे. संत सेवालाल महाराजांच्या समाधी मंदिर परिसरातील विविध विकास कामे करण्यासाठी राज्य शासनाने पोहरादेवी तिर्थक्षेत्र विकास आराखड्याअंतर्गत १०० कोटीच्या कामांना प्रशासकीय मान्यता दिली आहे. या आराखड्यातील कामे यंत्रणांनी तातडीने पूर्ण करावीत, असे निर्देश पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिले.

दूरदृश्यप्रणालीच्या माध्यमातून पालकमंत्री देसाई यांनी आज श्री. संत सेवालाल महाराज, पोहरादेवी तिर्थक्षेत्र विकास आराखड्याअंतर्गत करण्यात येत असलेल्या कामांचा आढावा घेतला. यावेळी ते बोलत होते. त्यांच्या समवेत आमदार संजय राठोड, सार्वजनिक बांधकाम विभाग, अकोल्याचे अधीक्षक दिनेश नंदनवार, कार्यकारी अभियंता व्यंकट मिठ्ठेवाड यांची उपस्थिती होती.

पालकमंत्री देसाई म्हणाले, पोहरादेवी तिर्थक्षेत्र विकास आराखड्यातील कामे एका वर्षाच्या आत पुर्ण करावी. ही कामे करण्यासाठी निधीची कमतरता पडणार नाही. सुधारित कामांना प्रशासकीय मान्यता मिळण्याबाबतचे प्रस्ताव पाठविण्यात यावे. या कामांना तातडीने प्रशासकीय मान्यता देण्यात येईल. मुख्य इमारतीचे बांधकाम पूर्ण झाले आहे. त्यामुळे आता इमारतीच्या अंतर्गत सजावटीची कामे त्वरीत पूर्ण करण्यात यावी. मंत्रालयस्तरावरुन पोहरादेवी तिर्थक्षेत्र विकास आराखड्यातील कामे पूर्ण करण्यासाठी कोणतीही अडचण जाणार नाही असे त्यांनी सांगितले.विकास आराखड्यातील १४ कोटी रुपयांची उर्वरित कामे त्वरीत सुरु करावी असे सांगून देसाई म्हणाले, संबंधित यंत्रणांनी सूक्ष्म नियोजन करुन ही कामे निर्धारित वेळेत पूर्ण करावी. सुधारीत प्रशासकीय मान्यतेचा प्रस्ताव तयार करताना त्यामध्ये कोणत्याही प्रकारच्या उणीवा राहणार नाहीत याबाबतची दक्षता घ्यावी. आराखड्यातील कामे करण्यासाठी मंजूर मर्यादीत रकमेच्या अंतर्गत विविध बाबींसाठी जिल्हास्तरीय समितीने निधी खर्च करण्याचा निर्णय घ्यावा.

निधी खर्च होताच उर्वरित निधीची मागणी केल्यास निधी उपलब्ध करुन देण्यात येईल असेही ते म्हणाले.आमदार राठोड म्हणाले, तिर्थक्षेत्र विकास आराखड्याअंतर्गत कार्य करताना यंत्रणांनी कालमर्यादा निश्चित करुन कामे पूर्ण करावी. या आराखड्यातील कामे पूर्ण करण्यासाठी पालकमंत्री आणि जिल्हाधिकारी यांच्या समितीला पूर्ण अधिकार देण्याबाबतचे प्रधान सचिव (वित्त विभाग) यांच्या स्वाक्षरीचे पत्र काढण्यात आल्याचे राठोड यांनी यावेळी सांगितले.जिल्हाधिकारी षण्मुगराजन यांनी पोहरादेवी तिर्थक्षेत्र विकास आराखड्याअंतर्गत करण्यात येत असलेल्या कामाची माहिती यावेळी दिली.

या सभेला जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वसुमना पंत, वनविभागाचे उपवनसंरक्षक शैलेश मीणा, जिल्हा नियोजन अधिकारी सुनीता आंबरे, वीज वितरण कंपनीचे अधीक्षक अभियंता मंगेश वैद्य, जि. प. ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता लक्ष्मण मापारी, सार्वजनिक बांधकाम (विद्युत)विभागाच्या कार्यकारी अभियंता नीता बोकडे व मानोरा तहसिलदार किर्दक यांची उपस्थिती होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

GST Price Cut: हॉर्लिक्स, विक्स, झंडू बामसह रोजच्या वापरतल्या वस्तू स्वस्त! कंपन्यांनी जाहीर केली नवी किंमत, वाचा एका क्लिकवर...

Uttrakhand : सलग दुसऱ्या दिवशी CM धामी ऍक्शन मोडवर; मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी केली आपत्तीग्रस्त भागाची पाहणी  

Bandu Andekar : बंडू आंदेकरचे कारनामे सुरुच, जेलमधूनच चालवत होता जुगार अड्डा, पोलिसांची धडक कारवाई

माेठी बातमी! लाखो जन्म-मृत्यू दाखले रद्द होणार; आरोग्य विभागाचे आदेश; दाखले पोलिसांकडून होणार जप्त, नेमकं काय कारण

Uruli Kanchan Crime : 'बेकायदेशीर जमाव जमवून मारहाण'; उरुळी कांचन पोलिस ठाण्यात एकमेकांविरोधात गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT