Polio vaccine sakal
अकोला

अकोला : एक लाख ३४ हजार बालकांना मिळणार पोलिओचा डोस!

लसीकरणासाठी यंत्रणा सज्ज; २३ जानेवारी रोजी मोहीम

सकाळ वृत्तसेवा

अकोला : शून्य ते पाच वर्षे या वयोगटातील बालकांचे पल्स पोलिओ लसीकरण(Polio vaccine) रविवार २३ जानेवारी रोजी होणार आहे. त्यासाठी जिल्हा आरोग्य यंत्रणा सज्ज झाली आहे. पोलिओ डोस देताना लसीकरण बुथवरही कोविड नियमांचे पालन काटेकोरपणे करावे, असे निर्देश अपर जिल्हाधिकारी अनिल खंडागळे यांनी आरोग्य यंत्रणांना दिले.

यासंदर्भात अपर जिल्हाधिकारी अनिल खंडागळे यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी (ता. ७) जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा घेण्यात आला. यावेळी जागतिक आरोग्य संघटनेचे क्षेत्रीय अधिकारी डॉ. एस. आर. ठोसर, माता बाल संगोपन अधिकारी डॉ. मनीष शर्मा, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. चिमणकर, जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. आदित्य महानकर तसेच अन्य संबंधित अधिकारी उपस्थित होते. यावेळी आरोग्य यंत्रणांकडून पोलिओ लसीकरणासाठी असलेल्या तयारीची माहिती देण्यात आली. त्यानुसार, जिल्ह्यात (मनपा क्षेत्र वगळून) शून्य ते पाच वर्षे वयोगटातील एक लाख ३४ हजार ४५९ बालकांना पोलिओचा डोस द्यावयाचा आहे. त्यासाठी तीन सदस्य असलेले ५६१ तर दोन सदस्य असलेले ५६२ असे एकूण ११२३ बुथची रचना करण्यात आली आहे.

मोहीमेसाठी एकूण २८०७ आरोग्य कर्मचारी तैनात असतील. या शिवाय पर्यवेक्षक, गृहभेटीसाठी असे ही कर्मचारी सज्ज आहेत, अशी माहिती देण्यात आली. लसीकरणासाठी कर्मचाऱ्यांचे आवश्यक प्रशिक्षणवर्ग सुरु असून त्याचे वेळापत्रकही निश्चित आहे. अनुषंगिक साहित्य हे १५ जानेवारी पर्यंत लसीकरण अधिकाऱ्यांनी वाटप करावयाचे आहे. तसेच २० जानेवारीपर्यंत लस वाटप करावयाची असून लसीची शितसाखळी नियमित ठेवण्यासाठी आवश्यक साठवण यंत्रेही देण्यात आले आहेत, अशीही माहिती यावेळी देण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Point Table: दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाचा Mumbai Indians ला फटका; सर्व सघांची झाली एक लढत, मोठी उलथापालथ

Supreme Court : अनावश्यक खटले टाळा! अधिकाऱ्याच्या बडतर्फीला आव्हान देणाऱ्या केंद्र सरकारला सुप्रीम कोर्टानं फटकारलं, ठोठावला दंड

Pune BJP News: पुणे महापालिका स्वीकृत नगरसेवकांना थेट पाच वर्षांची मुदत; अडीच वर्षांच्या आशेवर पाणी, अनेक कार्यकर्त्यांचा पत्ता कट

Countries with most uranium: अणुऊर्जेसाठी लागणारं युरेनियम कोणत्या देशाकडे सर्वाधिक आहे? भारत, पाकिस्तान कितव्या क्रमांकावर?

Kidney Transplant : मूत्रपिंड प्रत्यारोपणासाठी १९७० रुग्ण प्रतीक्षेत; पुणे विभागातील १४०० पुरुषांसह ५७० महिलांचाही समावेश

SCROLL FOR NEXT