student sakal
अकोला

Akola News : आयडॉलमधून विद्यार्थ्यांच्या गायन प्रतिभेस चालना!

‘प्रभात’च्या संगीत विभागाचा उपक्रम : २१ बाल गायकांनी आणली रंगत

सकाळ वृत्तसेवा

अकोला : संगीत मानवी हृदयाची शुद्ध आणि उदात्त अभिव्यक्ती आहे. विद्यार्थ्यांमधील गायन क्षमता विकसित करण्यासह त्यांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या हेतूने प्रभात किड्स स्कूलमध्ये ''प्रभात आयडॉल'' गीतगायन स्पर्धा आयोजित करण्यात आली. या स्पर्धेचा ग्रँड फिनाले ता. २७ आणि २८ जुलै रोजी संपन्न झाला.

या स्पर्धेच्या अंतिम फेरीमध्ये प्राथमिक गटातील ११ व माध्यमिक गटातील १० असे एकूण २१ स्पर्धक सहभागी झाले होते. प्राथमिक गटाचा ग्रँड फिनाले गुरुवारी संपन्न झाला तर माध्यमिक गटाचा कार्यक्रम शुक्रवारी संपन्न झाला.

या संगीतमय कार्यक्रमात विद्यार्थांनी उत्कृष्ट गीत सादर केले तर प्रभातच्या तज्ज्ञ वाद्यवृदांनी संगीताची मूक्त उधळण केली. अ‍ॅड. वल्लभ नारे, आदित्य वाघमारे यांनी कीबोर्ड, शिवम भौरदकर (गिटार), सतीश रूद्रकार (ऑक्टोपॅड), अतुल डोंगरे (तबला), नंदकिशोर डंबाळे (ढोलक) आणि सिद्धार्थ कार्लेकर यांनी तत्सम वाद्यावर साथसंगत दिली तर संगीत संयोजन विजय वाहोकार, प्रज्योत देशमुख यांनी केले.

या स्पर्धेचे उद्‍घाटन माता सरस्वतीचे पूजन आणि दीप प्रज्वलनाने झाले. स्पर्धेला परीक्षक म्हणून प्रख्यात तबलावादक शरद पुंडकर आणि प्रा.शुभम नारे लाभले होते. त्यांचा हृद्य सत्कार ‘प्रभात’चे संचालक डॉ.गजानन नारे, सचिव निरज आवंडेकर यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी प्रभातच्या संचालिका सौ. वंदना नारे, शिल्पा आवंडेकर, प्राचार्य वृषाली वाघमारे, उपप्राचार्य अर्चना बेलसरे प्रामुख्याने उपस्थित होत्या.

''कला आपल्या जीवनाला अर्थ देते आणि आपल्या जाणिवा समृद्ध करते. बालवयातच संगीतासारख्या अभिजात कलेची गोडी विद्यार्थ्यांचा सर्वागीण विकास साधण्यास साह्यभूत ठरणार असून विद्यार्थ्यांनी अंगीभूत एक तरी कला जोपासण्याचे आवाहन शरद पुंडकर यांनी केले.

तत्पूर्वी प्रा. शुभम नारे यांनीदेखील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तसेच प्रभात आयडॉलच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या गायन प्रतिभेस चालना मिळणार असल्याचे ते म्हणाले. स्पर्धकांना उत्कृष्ट सादरीकरणासाठी त्यांनी प्रोत्साहित केले. कार्यक्रमाच्या शेवटी दोन्ही परीक्षकांनी सुंदर गीत सादर करून कार्यक्रमात रंगत आणली.

ग्रँड फिनालेच्या पहिल्या दिवशी, प्रभातच्या प्राथमिक वर्गाच्या विद्यार्थ्यांनी फॅन्सी ड्रेस स्पर्धेतही भाग घेतला आणि भारतातील समृद्ध सामाजिक-सांस्कृतिक विविधता सादर केली. दोन दिवसीय कार्यक्रमाचे सुंदर संचालन संजीवनी आठराळे यांनी केले तर सांस्कृतिक विभाग प्रमुख नंदकिशोर डंबाळे व संगीत विभागाचे विजय वाहोकार यांनी आभार मानले.

प्रभातच्या सांस्कृतिक विभागाच्या संयोजनात संगीत विभागाचे शिक्षक विजय वाहोकर, अतुल डोंगरे, प्रज्योत देशमुख, शिवम भौरदकर,श्रुती गोरे, सचिन मुरुमकार, श्रीकांत बुलबुले, दिनेश आगाशे तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मी मुंबईला एकटाच जाणार, २ गाड्या आणि १० लोक सोबत; जरांगेंचा निर्णय, मराठा बांधवांना केलं मोठं आवाहन

जरांगेंनी पुनर्विचार करावा, ऐन गणेशोत्सवात आंदोलन योग्य नाही; मुख्यमंत्री फडणवीस काय म्हणाले?

Pune Mumbai Expressway: पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर बस घसरली; कामशेत बोगद्याजवळ तिन्ही मार्गिका बंद, ७ ते ८ किमी वाहनांच्या रांगा

INDIA VS WEST INDIES: वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी टीम इंडियात मोठे बदल? पंत-जुरेलमध्ये यष्टिरक्षणासाठी रस्सीखेच, राहुल होणार उपकर्णधार?

Marathi News Live Updates : मराठ्यांनो, १५ तारखेला मी एकटाच मुंबईला जातोय, आता मला कोण आडवतोय ते बघतोच, मनोज जरांगे यांचा इशारा

SCROLL FOR NEXT