private bus and msrtc bus accident one woman killed two injured police hospital Sakal
अकोला

Buldhana Accident News : भरधाव खाजगी बसची एसटी बसला धडक; एक महीला ठार, दोन जखमी

भरधाव खासगी बसने बुलडाणा ते अहमदपूर धावणाऱ्या या एसटी बसला जोरदार धडक दिल्याने एक महिला जागीच ठार झाली.

सकाळ वृत्तसेवा

मेहकर : भरधाव खासगी बसने बुलडाणा ते अहमदपूर धावणाऱ्या या एसटी बसला जोरदार धडक दिल्याने एक महिला जागीच ठार झाली. तर दोन जण जखमी झाले. ही घटना आज ४ मे रोजी सकाळ मेहकर चिखली मार्गावर नांद्रा धांडे फाट्याजवळ घडली. अंजली गोपाल शर्मा (वय २६, रा. चिखली) असे मृत महिलेचे नाव आहे.

अहमदपूर ते बुलडाणा बस क्रमांक एमएच २० बीएल २३७७ ही मेहकरकडे येत होती. दरम्यान, नांद्रा धांडे फाट्याजवळ पाठीमागून भरधाव येणाऱ्या खासगी बस क्रमांक एआर २०-९२०० ने एसटी बसला जोरदार धडक दिली.

या अपघातात अंजली गोपाल शर्मा यांचा जागीच मृत्यू झाला. तसेच एसटी बसमधील मुरलीधर नारायण इंगळे (वय ६७, रा. बुलडाणा) आणि खासगी बसमधील प्रवासी महादेव गोपाल उबाळे (रा. रिसोड, जिल्हा वाशिम) हे जखमी झाले आहेत. जखमींना मेहकर येथील ग्रामीण रुग्णालयात भरती करण्यात आले.मृतक महिला या परभणीला जात असल्याचे समजते.

घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ सहायक कार्यशाळा अधीक्षक राहुल देशमाने, एसटी निरीक्षक समाधान जुमडे, लिपिक प्रवीण तांगडे यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. अपघातातील मृतकांच्या नातेवाईकास दहा हजार तर,

जखमींना पाच हजार रुपयांची तातडीची मदत देण्यात आली. यावेळी मेहकर पोलिस ठाण्याचे सहायक फौजदार रमेश बाजड, हेड कॉन्स्टेबल शिवानंद केदार आणि पोलिस कर्मचारी यांनी घटनास्थळी येऊन मदत केली. वृत्त लिहिस्तोवर या प्रकरणी मेहकर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंची प्रकृती खालावली, संभाजीनगरच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरु

Mumbai Crime: हिंदी बोलली म्हणून ६ वर्षाच्या चिमुकलीला संपवलं; आईचं निर्दयी कृत्य, पण तपासात वेगळंच सत्य समोर आलं

Indian Railway: सण-उत्सवात रेल्वेचा मोठा हातभार; वर्षभरात ४३ हजारांहून अधिक विशेष गाड्या!

Loni Kalbhor Crime : सराईत गुन्हेगार सद्दाम अन्सारीवर कडक कारवाई; एमपीडीएअंतर्गत एक वर्षासाठी स्थानबद्ध!

Dhule Municipal Election : धुळ्यात निवडणुकीची चुरस वाढली; १२०० हून अधिक अर्ज नेले, पण दाखल एकही नाही!

SCROLL FOR NEXT