protesters lost patience vandalized office of crop insurance company farmers agriculture akola Sakal
अकोला

Akola News : आंदोलकांचा संयम सुटला, पीक विमा कंपनीच्या कार्यालयात तोडफोड

अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी मदत देण्यात यावी, जिल्हा दुष्काळ जाहीर करावा

सकाळ वृत्तसेवा

अकोला: शेतकऱ्यांच्या प्रश्नावर अन्नत्याग आंदोलन करीत असलेले शिवसेनेचे जिल्हाप्रमुख गोपाल दातकर यांच्या आंदोलनाची प्रशासन व शासनाकडून कोणतेही दखल घेण्यात आली नाही. त्यामुळे आंदोलक शिवसैनिकांचा संयम सुटला असून, गुरुवारी सकाळी शिवसैनिकांनी कौलखेड परिसरातील पीक विमा कंपनीच्या कार्यालयात धाव घेत कार्यालयातील साहित्याची तोडफोड केली.

विशेष म्हणजे, प्रशासनाने व शासनाने शेतकऱ्यांच्या प्रश्नांची दखल न घेतल्यास विमा कंपनीचे ऑफिस फोडू, असा इशारा शिवसेना जिल्हाप्रमुख गोपाल दातकर यांच्याकडून देण्यात आला होता.

अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी मदत देण्यात यावी, जिल्हा दुष्काळ जाहीर करावा, या मागणीसाठी शिवसेनेच्या ठाकरे गटाकडून जिल्हाधिकारी कार्यालयासमाेर उपाेषण सुरू आहे. जिल्ह्यातील ५२ महसूल मंडळांपैकी ३४ मंडळे अतिवृष्टीत बाधित झाली.

अन्य मंडळांमध्येही अतिवृष्टी आणि पुराच्या जबर तडाख्याने शेतकऱ्यांच्या शेतातील पीक जमीनदोस्त झाल्याने खरीप हंगामाच्या प्रारंभीच शेतकरी मोठ्या अडचणीत सापडला. १ लाख ६८ हजार ९३७.१ हेक्टरवरील शेतीचे नुकसान झाले हाेते. अतिवृष्टीमुळे झालेल्या पीक व शेत जमिनीच्या नुकसान भरपाईसाठी शासनाने १६४ काेटींची मदत मंजूर केली.

मात्र रब्बी हंगाम सुरू झाल्यानंतरही शेतकऱ्यांना खरीप हंगामातील नुकसानाचा मदत मिळालेली नाही. या नुकसान भरपाईसह शेतकऱ्यांच्या अन्य मागण्यांसाठी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख तथा जि.प. गटनेते गाेपाल दातकर यांनी सुरू केलेल्या उपाेषणाला महाविकास आघाडीतील काॅंग्रेस पक्षासह विविध संस्था संघटना कडून पाठिंबा मिळत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

VIDEO : अवघ्या 30 सेकंदात होत्याचं नव्हतं झालं! मुळशी तालुक्यात सिक्युरिटी गार्डचा Heart Attack ने दुर्दैवी मृत्यू; घटना CCTV कॅमेऱ्यात कैद

Butterfly Bridge: ‘बटरफ्लाय’ पुलाचे खुणावतेय सौंदर्य; महापालिकेतर्फे चिंचवडमध्ये उभारणी, रोषणाईचे आकर्षण

Inspirational Army Journey : गुगलवरही शोधता न येणाऱ्या गावातली पोरगी लेफ्टनंट बनली, ८ वेळा अपयशावर मात; सांगलीच्या 'स्वरुपा'ची जबरा कहाणी

Youth Mental Health Crisis: तरुणांमध्ये वाढतेय मानसिक आजारांचे प्रमाण; चिंताजनक अहवाल आला समोर

Viral Video: योगा करत होती महिला तितक्यात घडला निसर्गाचा चमत्कार, पाहा मंत्रमुग्ध करणारा व्हिडिओ

SCROLL FOR NEXT