अकोला

पुष्पराज गावंडे राज्य साहित्य संस्कृती मंडळाच्या सदस्यपदी

सकाळ वृत्तसेवा

अकोला ः अखिल भारतीय वऱ्हाडी साहित्य मंच अकोलाचे मार्गदर्शक अन् सल्लागार युवा कादंबरीकार पुष्पराज गावंडे यांची महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाच्या सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली आहे. (Pushparaj Gawande of Akola as a member of the State Literary Culture Board)


अकोला जिल्ह्यातील बहिरखेड (Bahirkhed in Akola district) येथील शेतकरी कुटुंबात जन्मलेले व सध्या गोकुळ कॉलनी अकोला येथील रहिवासी पुष्पराज गावंडे यांचे अनेक वऱ्हाडी साहित्य व कांदबरी, कवितासंग्रह प्रसिद्ध आहेत. अनेक वृत्तपत्रात त्यांनी स्तंभलेखन केले असून, अनेक सदरंही प्रसिद्ध झाले आहेत.

मराठा सेवा संघ प्रणित संत तुकोबाराया साहित्य परिषदेचे (Sant Tukobaraya Sahitya Parishad) अध्यक्षपदही त्यांनी भूषविले आहे. वऱ्हाडी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद सन २०१८ मध्ये त्यांना मिळाले होते. त्याचवर्षी यारिया साहित्य कला संमेलनाचे ते अध्यक्ष होते. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठाणच्या अकोला जिल्हा सांस्कृतिक सचिवपदी त्यांची निवड झाली होती.

त्यांना सृजन साहित्य संघाचा राजर्षी शाहू महाराज उत्कृष्ट कांदबरी पुरस्कार सन २०१० मध्ये मिळाला होता. त्यानंतर आता पुष्पराज गावंडे यांची महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाच्या सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली आहे. हा अकोल्यातील साहित्य क्षेत्राचा गौरव आहे. या नियुक्तीबद्दल त्यांचे साहित्य क्षेत्रातून अभिनंदन होत आहे.

संपादन - विवेक मेतकर

Pushparaj Gawande of Akola as a member of the State Literary Culture Board

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CAA Beneficiary: आधी सीएएची प्रमाणपत्रं वाटली आता तेच लाभार्थी थेट मोदींसोबत स्टेजवर!

IPL 2024 RCB vs CSK Live Score: आनंदाची बातमी! पावसाच्या व्यत्ययानंतर बेंगळुरू-चेन्नई सामन्याला पुन्हा सुरुवात

MI vs LSG: मुंबईच्या पराभवानंतर रोहितबरोबर नीता अंबानींची आधी गहन चर्चा अन् मग ड्रेसिंग रुममध्ये दिलं स्पेशल मेडल, Video व्हायरल

मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करा, सहा महिन्यात POK भारताचा भाग होईल; योगींची मोठी घोषणा

Latest Marathi News Live Update : हे मोदींचे युग आहे, आम्ही घरी घुसून मारतो- पंतप्रधान मोदी

SCROLL FOR NEXT