अकोला

अकोल्यात कुंटणखान्यावर छापा; महिन्याभरात दुसरी कारवाई

सकाळ वृत्तसेवा

अकोला : शहरातील मलकापूर परिसरात एका अपार्टमेंमध्ये सुरू असलेल्या कुंटणखान्यावर पोलिस अधीक्षकांच्या विशेष पथकाने गुरुवारी छापा टाकून तीन महिलांसह पाच आरोपींना अटक केली. अकोला शहरात महिनाभरात दुसऱ्यांदा अशी कारवाई करण्यात आली आहे. यापूर्वी ता. २० मे रोजी जठारपेठ परिसरातील एका अपार्टमेंटमध्ये चालणारा देहव्यापार उघडकीस आला होता. यावरून अकोल्यात आंबटशौकिनांची संख्या वाढत असल्याचे दिसून येते. (Raid on a brothel in Akola; Second action within a month)


मलकापूर परिसरातील त्रस्त नागरिकांनी पोलिसांना परिसरात अवैध कुंटणखाना चालतो अशी तक्रार दिली. त्यावरून पोलिस अधीक्षक जी. श्रीधर यांच्या मार्गदर्शनाखालील विशेष पथकाचे पोलिस निरीक्षक विलास पाटील यांच्या पथकाने मलकापूर परिसराततिल तीन मजली इमारत साईं रेसिडेन्सीमधिल प्लॅट नं. २०४ मध्ये बनावट ग्राहक पाठवून खात्री केली. तेथे घरमालक व घरमालकिन यांनी दोन तरुण मुली यांना पैशाचे आमिष दाखवून देहविक्री करण्यासाठी ठेवले होते.

त्यात घरमालक महिला ही एका मुलीचे एका तासाचे एक हजार रुपये व एका रात्रीचे दोन हजार रुपये मोबदला घेवून त्यातील मुलींना काही रुपये देवून कुंटणखाना चालवित असल्याचे दिसून आले. त्यावरून विशेष पथकाने गुरुवारी सायंकाळी ५ वाजता छापा मारला. तेथे कुंटणखाना चालविणारे मालक व एक महिला मिळून आली.

देहविक्री करणाऱ्या इतर दोन मुली मिळून आल्यात. एक ग्राहक पळून जाण्यास यशस्वी झाला. कुंटणखाना चालविणारा उमेश दिनकर म्हस्के (रा. कॉलखेड), शुभम खांडेकर व तीन महिला यांच्ये विरुद्ध अनैतिक व्यापार प्रतिबंधक अधिनियम कलम तीन, चार, पाच, नऊ अनवये खदान पोलिस स्टेशन येथे गुन्हा नोंदविण्यात आला. या आरोपींना शनिवारी न्यायालयात हजर केले जाईल.

Raid on a brothel in Akola; Second action within a month

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran War Ceasefire Talks : मोठी बातमी ! इराण युद्धबंदीच्या चर्चेसाठी तयार पण... डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितला नेमका अडथळा काय?

Viral Video: आधी आई-वडील गेले, मग पतीही गेला… माझ्या मुलाची काळजी घ्या... ; आईने व्हिडिओत रडत सांगितलं अन् संपवलं जीवन

Ladki Bahin Yojana Update : लाडक्या बहि‍णींसाठी आनंदाची बातमी! फेब्रुवारी अन् मार्चचा हप्ता एकाच वेळी मिळणार, तारीखही आली समोर...

Hadapsar Station: हडपसर स्थानकात चौथ्या फलाटाला मंजुरी; प्रवाशांची सोय, विस्तार झाल्याने रेल्वे गाड्यांची संख्या वाढणार

Heart & Kidney Disease Detection Tool: मधुमेहामुळे हार्ट आणि किडनीवर येणारा ताण आता आधीच ओळखता येणार; डॉक्टरांसाठी नवीन स्मार्ट टूल लाँच!

SCROLL FOR NEXT