अकोला : अवैध बायोडिझेल साठ्यावर छापेमारी, मुद्देमाल जप्त sakal
अकोला

अकोला : अवैध बायोडिझेल साठ्यावर छापेमारी, मुद्देमाल जप्त

कारवाईत दोन हजार ३०० लिटर बायोडिझेलसह दोन लाख दहा १० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला

सकाळ वृत्तसेवा

अकोला : शहरातील रेणुका ट्रांस्फोर्ट रायली जिनमध्ये अवैध बायोडिझेल साठवण करून जास्त दराने विक्री केली जात असल्याच्या माहितीवरून जिल्हा पोलिस अधीक्षकांच्या विशेष पथकाने छापेमारी केली. या कारवाईत दोन हजार ३०० लिटर बायोडिझेलसह दोन लाख दहा १० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

रायली जीनमध्ये रेणुका ट्रांस्फोर्टला अवैध रित्या बिनापरवाना बायो डिझेल साठवून ते ट्रान्सपोर्टच्या ट्रक मधून जास्त दराने विक्री करीत असल्याची माहिती जिल्हा पोलिस अधीक्षकांच्या विशेष पथकाला मिळाली.

याठिकाणी पुरवठा निरीक्षक जॉकी डोंगरे यांच्या टीमसह विशेष पथकाने रेणुका ट्रांसपोर्ट येथे छापेमारी करून एका लाख ७० हजाराचे तीन हजार ३०० लिटर बायोडिझेल, ४० हजाराच्या प्लास्टिकच्या टाक्या असा एकूण दोन लाख दहा हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.

याप्रकरणी ट्रान्सपोर्ट चालक रविंद्र मोतीराम नरवाडे (५२ रा. बाळापूर नाका जुनेशहर), मालक सुभाष मोहनलाल भट्टड (रा. गोकुळ कॉलनी) यांच्या विरोधात रामदास पेठ पोलिस स्टेशन येथे जीवनावश्यक अधिनियम कलम तीन, सात कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले. ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक जी. श्रीधर अप्पर पोलिस अधीक्षक मोनिका राऊत यांच्या मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक विलास पाटील व त्यांच्या पथकाने, पुरवठा निरीक्षक डोंगरे यांनी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJI BR Gavai : "मी बौद्ध धर्माचे पालन करतो, पण..."; निवृत्तीपूर्वी बीआर गवई काय म्हणाले? बाबासाहेबांचे मानले आभार, सर्वजण स्तब्ध!

जिला कधी अपमानित केलं… तीच ठरली जगाची राणी! मेक्सिकोची फातिमा बॉश मिस यूनिव्हर्स विजेती; भारताची मनिका ‘या’ क्रमांकावर

MP Nilesh Lanke: गड, किल्ल्यांसाठी विशेष निधी द्यावा: खासदार नीलेश लंके; महाराष्ट्रातील ऐतिहासिक किल्ल्यांचे जतन, संवर्धन गरजेचं..

Australian Open Badminton 2025: लक्ष्य, आयुष उपांत्यपूर्व फेरीत; ऑस्ट्रेलियन ओपन बॅडमिंटन, सात्त्विक-चिराग जोडीचीही वाटचाल

Latest Marathi News Live Update : नगरपरिषद व नगरपंचायत निवडणुकीसाठी आज उमेदवारांना माघारीची अखेरची मुदत

SCROLL FOR NEXT