अकोला

Ramdas Athwale: आठवले यांच्या दौऱ्यापूर्वीच 'RPI'मधील वाद चौहाट्यावर! पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्ते राजीनामा देण्याच्या तयारीत

आठवलेंच्या दौऱ्यापूर्वीच अकोला जिल्ह्यात आरपीआयमधील मतभेद उफाळून आले आहे. जिल्हा महासचिवासह शेकडो कार्यकर्ते दौरा कार्यक्रमाच्या तयारीवरून नाराजी व्यक्त करीत राजीनामा देणार आहेत.

सकाळ डिजिटल टीम

Ramdas Athwale RPI: रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) या पक्षाचे सर्वेसर्वा केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले १५ जानेवारीला अकोला जिल्हा दौऱ्यावर येत आहे. त्यांच्या दौऱ्यापूर्वीच अकोला जिल्ह्यात आरपीआयमधील मतभेद उफाळून आले आहे. जिल्हा महासचिवासह शेकडो कार्यकर्ते दौरा कार्यक्रमाच्या तयारीवरून नाराजी व्यक्त करीत राजीनामा देणार आहेत.


आरपीआयचे जिल्हाध्यक्ष सुनील अवचार हे पक्षात मनमानी करीत असून, पक्षाचे कार्यक्रम घेताना जिल्ह्यातील सर्व कार्यकर्त्यांना विश्वासात घेतले जात नसल्याचा आरोप जिल्हा महासचिव पद्‍माकर वासनिक यांनी केले आहे. मागील दोन महिन्यात जिल्ह्यात तीन महासचिव पदांच्या नियुक्ती करण्यात आल्या आहेत.

नियुक्तीनंतर तीन वर्षे पदावरून काढता येत नाही, असे पक्षाच्या घटनेत नमुद असल्याचे महासचिव वासनिक यांनी दिलेल्या पत्रात म्हटले आहे. रामदास आठवले यांच्या दौऱ्या कार्यक्रमात महानगराध्यक्ष गजानन कांबळे यांचा कुठेही उल्लेख करण्यात आला नसल्याचा आरोपही वासनिक यांनी केला आहे. त्यामुळे कार्यकर्ते संभ्रमात असून, राजीनामा देण्याच्या तयारीत असल्यची माहिती वासनिक यांनी दिली. (Latest marathi News)

वासनिक यांना दोन महिन्यापूर्वीच पदमुक्त केले - अवचार
जिल्हा महासचिव पद्‍माकर वासनिक यांच्यासह शेकडो कार्यकर्ते राजीनामा देण्याच्या तयारी असल्याबाबात आरपीआयचे अकोला जिल्हाध्याक्ष सुनील अवचार यांच्याकडे विचारणा केली असता पद्‍माकर वानसिक यांना दोन महिन्यापूर्वीच पदमुक्त केले असल्याचे त्यांनी सांगितले. वासनिक हे पक्ष विरोधी कारवायात सहभागी होते. त्यांनी मूर्तिजापूर तालुक्यात पक्षाचे कार्यक्रम राबविण्यात अडचणी आणल्याने त्यांना पदमुक्त केले असल्याचे अवचार म्हणाले

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BMC Mayor : यापूर्वी मुंबईमध्ये होऊन गेले आहेत भाजपचे महापौर! कोण होते प्रभाकर पै?

लेकी बनणार 'ग्लोबल शेफ'! हे सरकार मुलींना हॉटेल मॅनेजमेंटसाठी देणार स्कॉलरशिप; परदेशात प्रशिक्षणाचीही संधी

Ajit Pawar: ''बिर्याणीत गुळवणी कसं चालेल? अजित पवारांना सोबत यायचं असेल तर...'', शरद पवारांच्या मोठ्या नेत्याने सांगितल्या अटी

Kolhapur ZP : दोन आमदारांची ताकद दाखवत भाजपचा मोठा दावा; जि.प. निवडणुकीत ४० जागांची मागणी

ब्रेन स्ट्रोकशी झुंज अपयशी, प्रसिद्ध दिग्दर्शकांचं निधन, मराठी मनोरंजनसृष्टी हळहळली

SCROLL FOR NEXT