Gun Crime
अकोला

सेवानिवृत्त सैनिकाने ताणली एलआयसी अधिकाऱ्यावर बंदूक

फिर्यादी विशाल माऊलीकर हे एलआयसीमध्ये अधिकारी असून त्यांचे व पत्नीचे गत अनेक दिवसांपासून वाद होते.

सकाळ वृत्तसेवा

अकोला - पती-पत्नीच्या वादामध्ये फिर्यादीला सेवानिवृत्त जवानाने बंदुकीच्या धाकावर धमकी देत मारहाण करून एकास जखमी केल्याची घटना शनिवारी (ता.९) सायंकाळच्या सुमारास स्थानिक अशोक वाटिका चौकात घडली. या प्रकरणी सिटी कोतवाली पोलिसांनी पिस्तलसह तीन आरोपींना ताब्यात घेत गुन्हा दाखल केला आहे.

फिर्यादी विशाल माऊलीकर हे एलआयसीमध्ये अधिकारी असून त्यांचे व पत्नीचे गत अनेक दिवसांपासून वाद होते. हे वाद सोडवता यावेत यासाठी त्यांनी बोरगाव हद्दीतील मांत्रिक राठोड महाराज यांची मदत घेतली. याकरिता राठोड महाराज यांनी त्यांच्याकडून २ लाख रुपये घेत काही दिवसाचा कालावधी देऊन वाद सोडविण्याचे आश्वासन दिले. मात्र वर्षे उलटूनही वाद होत असल्याने विशाल माऊलीकर यांनी दिलेले पैसे परत मागितले. त्यामुळे मांत्रिक राठोड महाराज यांने १ लाख ५० हजार रुपये परत करत ५० हजार रुपये बाकी ठेवले.

उर्वरित पैसे परत न मिळाल्याने माऊलीकर यांनी पैशासाठी तगादा लावला. यादरम्यान मांत्रिक राठोड महाराज यांचे परिचित असलेले आरोपी गणेश उत्तम गवई सेवानिवृत्त जवान यांनी महाराजाला त्रास का देतो ? तुमच्या पती-पत्नीचे वाद सार्वजनिक करतो म्हणून अशोक वाटिका चौक येथे बोलावून घेतले. या ठिकाणी त्यांच्यामध्ये शाब्दिक वाद होऊन पिस्तल दाखवून धमकी देत मारहाण करण्यात आली. या प्रकरणी सिटी कोतवाली पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत आरोपी गणेश उत्तम गवई सेवानिवृत्त जवान, राहुल जाधव, वैभव वर यांना पिस्टलसह ताब्यात घेतले. या प्रकरणी वृत्त लिहेपर्यंत सिटी कोतवाली पोलिस स्टेशन येथे गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

iphoneच्या इतिहासात पहिल्यांदाच! Appleने लॉन्च केला पहिला फोल्डेबल iPhone Duo; मिळणार iPadसारखा अनुभव

iPhone 18 Pro अन् Pro Max मध्ये Apple ने केला मोठा धमाका! 2nm चिप, जबरदस्त कॅमेरा अन् AI फीचर्सने वेधलं लक्ष; किंमत किती?

Joe Root Record: सचिन तेंडुलकर - जेम्स अँडरसननंतर फक्त रुटनेच केला तो पराक्रम! पाँटिंग-स्टीव्ह वॉ यांचा मोडला विक्रम

Vastu Tips: घरात-बाल्कनीत पक्ष्यांचे घरटे असावे की नाही? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या घरटे हटवणे योग्य की अयोग्य?

Pune News : सत्ता असूनही प्रशासनावर अंकुशच नाही! भाजप नगरसेवकांचा घरचा आहेर; पदाधिकाऱ्यांवरही व्यक्त केली नाराजी

SCROLL FOR NEXT