अकोला

RTE: प्रवेशाला पुन्हा लॉकडाउनचा फटका!

प्रवेश प्रक्रिया लांबली; पोर्टलवर मिळणार सूचना

सकाळ डिजिटल टीम

अकोला : शिक्षण हक्क अधिनियमांतर्गत (आरटीई) शाळा प्रवेशासाठीची प्रक्रिया सोमवार (ता. १९) पासून सुरू होणार होती. परंतु राज्यात कोरोनामुळे लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. त्यामुळे आरटीई प्रवेशासंदर्भात लॉकडाऊन संपल्यानंतर आरटीईच्या संकेतस्थळावर (पोर्टल) सूचना दिली जाईल.

परिणामी पालकांनी पडताळणी समितीकडे गर्दी करू नये, असे आवाहन शिक्षण विभागाच्या वतीने करण्यात आले आहे. त्यामुळे यावर्षीही आरटीई प्रवेशाला लॉकडाऊनचा फटका बसल्याचे दिसून येत आहे.



बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम (आरटीई) २०१९ मधील कलम १२ (१) (सी) नुसार समाजातील आर्थिक व सामाजिक दुर्बल घटकांसाठी खासगी शाळांमध्ये २५ टक्के जागा राखीव ठेवण्यात येतात.

गरीब व आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेले पालक जास्त प्रवेश शुल्क असलेल्या शाळांमधून आपल्या मुलांना शिकवू शकत नव्हते; मात्र आरटीईमुळे अशा पालकांचे त्यांच्या मुलांना खासगी शाळांमधून शिकवण्याचे स्वप्न साकार होत आहे.

यंदा आरटीई कोट्यातून प्रवेश मिळावा, यासाठी ४ हजार ७२७ ऑनलाईन अर्ज करण्यात आले. क्षमतेपेक्षा जास्त १ हजार ९६० अर्ज आले आहेत.

हे सर्व अर्ज छाननीमध्ये पात्र ठरल्यास तब्बल २ हजार ७६७ विद्यार्थ्यांना प्रवेशापासून वंचित राहावे लागणार आहे. दरम्यान प्रवेशासाठीची पहिली सोडत निघाल्यानंतर सोमवारपासून प्रवेशाची प्रक्रिया सुरू होणार होती, परंतु तिला लॉकडाउनचा फटका बसला आहे.

संपादन - विवेक मेतकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Russia Ukraine War : रशियाचा भारतीय कंपनीच्या औषध प्रकल्पावर ड्रोन हल्ला; एकाचा मृत्यू, मोठे नुकसान

माढ्यात आढळला दीडशे वर्षे 'लुप्त' मानल्या गेलेल्या प्रजातीतील जीव; ३६० अंशात पाहणारा 'इंद्रधनुष्य कोळी' शोधला!

Delhi News: जंतर-मंतरवर आंदोलनात खळबळजनक घटना! पोलिसांकडून महिला पत्रकाराचा लैंगिक छळ

Latest Marathi News Live Update : पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणेशी संपर्क असल्याच्या आरोपावरून गुवाहाटीत तरुणाला अटक

Stone Crusher: मलठणमध्ये स्टोन क्रशरच्या ब्लास्टिंगचा फटका; शेतजमिनींसह हजारो फळझाडांचे नुकसान

SCROLL FOR NEXT