At Sangrampur, a farmer turned a tractor on a vertical crop of five acres.jpg 
अकोला

शेतकऱ्याने फिरविला पाच एकरांतील उभ्या पिकावर ट्रॅक्टर

पंजाबराव ठाकरे

संग्रामपूर (बुलडाणा/अकोला) : सोयाबीनच्या अर्ध्याधिक शेंगा पोकळ असल्याने खारपाण पट्ट्यातील सोयाबीन उत्पादकांवर मोठे आर्थिक संकट कोसळले आहे. यंदा सोयाबीन सोंगणी आणि काढणीचा खर्च डोईजड होत असल्याने शेतकरी हतबल झाले आहेत. तालुक्यातील निरोड येथील शेतकऱ्याने पाच एकरातील सोयाबीन पिकावर शुक्रवारी (ता.नऊ) ट्रॅक्टर फिरवला.

निरोड बाजार गावातील शेषराव भाऊराव अवचार यांनी आपल्या २८९ गट नंबर मधील पाच एकरातील सोयाबीन ट्रॅक्टरने मोडले. यंदा सोयाबीन पेरणीपासूनच या पिकाला निसर्गाची नजर लागली. पावसाने नको त्यावेळी केलेला कहर खारपाण पट्ट्यातील सर्वच पिकांना मारक ठरला आहे. सोयाबीनचे पीक चांगले येईल या आशेने जिवापाड मेहनत करून उसनवारी, उधारी करून सोयाबीनची मशागत केली. शेंगा भरणीच्या वेळी निसर्गाने दगा दिला व एकदम वातावरणात बदल झाला. यामुळे सोयाबीनची उभी झाडे करपली. 

सोयाबीनच्या शेंगामध्ये भरलेले दाणे ज्वारीच्या आकाराचे भरले आहेत. सद्यस्थितीत सोयाबीन सोंगणीला आले आहे. एकरी अडीच ते तीन क्विंटलचा उतारा लागत आहे. मशागतीचा एकंदरीत खर्च जवळपास एकरी १४ हजार रुपये लागलेला आहे. उतारा लागत नसल्याने मळणी यंत्रधारकांनी एकरी हजार रुपयांचे दर काढले आहेत. सोंगणी, काढणी आणि आतापर्यंत झालेला खर्च पाहता उत्पादनाच्या दृष्टीने सोयाबीन सोंगणी करावी की नाही, या द्विधा मनस्थितीत या भागातील शेतकरी अडकला आहे.

शासन आणि विमा कंपनीकडे नजरा

कोरोनामुळे हातघाईस आलेल्या शेतकऱ्याला सोयाबीन पिकाचा आधार होता. वाढती महागाई आणि दैनंदिन खर्च याचा उत्पन्नाच्या हिशोबात ताळमेळ लागत नाही. अशा परिस्थितीमध्ये वर्षभराचा आर्थिक गाडा चालवावा तरी कसा, याची चिंता परिसरातील शेतकऱ्यांना लागून आहे. नैसर्गिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्याला पीक विम्याच्या माध्यमातून विमा कंपनीकडून आणि शासनाकडून मदतीची मोठी आस लागून आहे. यासाठी विरोधी पक्षांकडून हा मुद्दा रेटून धरणे गरजेचे झालेले आहे.

संपादन - सुस्मिता वडतिले 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai: भाजप आमदाराने रिक्षाचालकाच्या कानशिलात लगावली; मुंबईतील धक्कादायक घटना, कारण काय?

Sonia Gandhi on VB-G-RAM-G: ''सरकारने ‘मनरेगा’वर बुलडोझर फिरवला'' ; नाव बदलावरून सोनिया गांधींची जोरादार टीका!

BMC Election: महापालिका निवडणुकीसाठी पोलीस सज्ज! मनाई आदेशांसह विशेष पथके तैनात; गुन्ह्यांवरही कडक नजर

Malaika Arora Fitness: 52 व्या वर्षीही मलायका अरोरा इतकी फिट कशी? हे आहे सिक्रेट; जेवणात भात...सकाळी तूप

Latest Marathi News Live Update : मालेगावमध्ये भीषण अपघात, वाहनाने दिली विद्यार्थिनीला धडक

SCROLL FOR NEXT