scrap scam in karanja sub centre of mahapareshan in akola eight officials suspended Sakal
अकोला

Akola News : भंगार विक्रीत अपहार; महापारेषणचे 8 अधिकारी निलंबित; अकोला, कारंजा येथील उपक्रेंदारातील घटना

महापारेषणच्या अकोला आणि कारंजा उपकेंद्रातील भंगार विक्रीत अपहार झाल्याच्या आरोपात कार्यकारी अभियंत्यासह आठ अधिकारी निलंबित

सकाळ वृत्तसेवा

अकोला : महापारेषणच्या अकोला आणि कारंजा उपकेंद्रातील भंगार विक्रीत अपहार झाल्याच्या आरोपात कार्यकारी अभियंत्यासह आठ अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. दोन्ही ठिकाणांवरील ८५ हजार २१० किलोपैकी चार हजार ७७५ किलो भंगाराची अफरातफर झाल्याचा आरोप आहे. निलंबितांमध्ये सहा अभियंते आणि दोन अधिकाऱ्यांचा समावेश आहे.

महापारेषणचे अमरावती विभागाचे मुख्य अभियंता जयंत विखे यांनी ही कारवाई केलीय. कारवाई झालेल्यांमध्ये कार्यकारी अभियंता रमेश कृष्णराव वानखडे यांच्यासह अतिरिक्त कार्यकारी अभियंता राहुल रामदास पाटील, अतिरिक्त कार्यकारी अभियंता दत्ता दिनकर शेजोळे, अतिरिक्त कार्यकारी अभियंता श्याम मेश्राम, उपकार्यकारी अभियंता गोपाल दिलीप लहाने, उपकार्यकारी अभियंता श्रीकांत टेहरे, उपव्यवस्थापक वित्त व लेखा सुरेश पेटकर, उपव्यवस्थापक संजीत मेश्राम आदींचा समावेश आहे.

चौकशीनंतर कारवाई

अकोल्यातील महापारेषणच्या वीज उपकेंद्र आणि कारंजा उपकेंद्रात २०१८ साली ८५ हजार २१० किलो वजनाचे भंगार होते. सन २०२२ साली भंगाराचे वजन केले असता, त्यात चार हजार ७७५ किलो भंगार कमी आढळून आले. त्यानंतर या प्रकरणाची चौकशी करण्यात आली. त्यात दोषी आढळून आलेल्या आठ जणांचे मुख्य अभियंत्यांनी निलंबनाची कारवाई केली आहे.

कुठेही नोंद नाही, पोलिस तक्रारही नाही

कारंजा येथील उपक्रेंद्रातून चार हजार ७७५ किलो भंगाराचा अपहार झाला. जवळपास पाच टनाचे भंगार नेण्यासाठी ट्रकची आवश्यकता असते. ते भरण्यासाठी किमान १० ते १२ मजुरांची आवश्यकता भासली असेल. किंवा टप्प्याने भंगार नेण्यात आले असेल असा संशय आहे. असे असतानाही यासंदर्भात कोठेच कोणतीच नोंद नाही. या प्रकरणात अभियंत्यांना निलंबित करण्यात आले, मात्र या प्रकरणाची पोलिस तक्रार करून चौकशी का करण्यात आली नाही, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Goa Highway Toll Collection : मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम अपूर्ण, टोल वसुली सुरू; नितीन गडकरींच्या आवाहनाला केराची टोपली

लाईव्ह सामन्यात रवी शास्त्रींची मोठी चूक! नाणेफेकीच्या वेळी शुभमन गिलला काय बोलले?

Child Rescue Operation: पंजाबमध्ये कूपनलिकेतून नऊ तासांनंतर मुलगा बाहेर; घराबाहेर खेळताना पडला होता खड्ड्यात, होशियारपूरमध्ये थरारक रेस्क्यू ऑपरेशन!

Rajdhani Express धावत्या राजधानी एक्सप्रेसमध्ये आगीचा भडका, एसी कोच जळून खाक

Amravati : अतिक्रमणातील चहाटपऱ्या काढल्याचा राग, पठ्ठ्या सिलिंडर घेऊन थेट पाण्याच्या टाकीवर चढला अन ....

SCROLL FOR NEXT