Akola
Akola Sakal
अकोला

मालेगाव ; चाकातीर्थ येथे दुहेरी हत्याकांडाने खळबळ

सकाळ वृत्तसेवा

जऊळका : मालेगाव (Malegaon) तालुक्यातील जऊळका रेल्वे पोलिस (Police) स्टेशन अंतर्गत येत असलेल्या चाकातीर्थ येथे गजानन निंबाळकर (Gajanan Nimbalkar) आणि निर्मला निंबाळकर (Nirmala Nimbalkar) (पती-पत्नी ) धारधार शस्त्राने हत्या (Murder) झाल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच जऊळका पोलिस (Police) स्टेशनचे ठाणेदार व सहकर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. मृतदेहाचा पंचनामा करून गुन्ह्याची माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक वसंत परदेशी (Vasant Paredeshi) यांना दिली.

घटनास्थळावर श्वानपथकाला पाचारण करण्यात आले. श्वान पथकाने मारेकऱ्यांच्या डव्हाच्या रस्त्याने शोध घेण्याचा प्रयत्न केला असता, पोलिसांना घटनास्थळावरून एक कुऱ्हाड व हेडफोन मिळाल्याचे उघडकीस आल्याने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. दुहेरी हत्याकांडातील आरोपीचा शोध घेण्याचे जऊळका पोलिसांसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे. विदर्भची पंढरी म्हणून ओळख असलेल्या डव्हा तीर्थक्षेत्रापासून जवळच असलेल्या चाकातीर्थ येथील विश्वनाथबाबाचे समाधीस्थळ असून, त्याची देखरेख डोगरकिन्ही येथील गजानन निबालकर व त्याच्या पत्नी निर्मला निबालकर हे दांपत्य गत वीस वर्षांपासून सेवा करत होते. सेवा देणाऱ्या ह्या दांपत्याचा शनिवार सायंकाळी साडेसहा वाजता ते रविवार ११ वाजताच्या दरम्यान गजानन निबालकर यांना अज्ञात इसमाने गळ्याला फाशी देऊन डोक्यामध्ये धारदार शस्त्राने मारहाण करून ठार केले व त्यांच्या पत्नी निर्मला निबालकर यांचा अज्ञात कारणाने मृत्यू झाला अशी, फिर्याद प्रमोद गजानन निबालकर (वय ३0) यांनी जऊळका पोलिस स्टेशनला दिली आहे. फिर्यादीच्या फिर्यादीवरून रविवारी रात्री उशिरा साडेसात वाजताच्या दरम्यान अज्ञात आरोपीविरुद्ध भादंविच्या कलम ३०२ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास जऊळका पोलिस स्टेशनचे ठाणेदार आदित्यनाथ मोरे करीत आहेत. घटनास्थळी जिल्हा पोलिस अधीक्षकांनी भेट दिली.

पुरूषाचा मृत्यू गळा आवळल्याने

दोनही मृतदेहाचे पंचनामे केल्यानंतर मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. शवविच्छेदन अहवालावर पुढील तपासासाची दिशा अवलंबून असताना या प्रकरणातील मृतक गजानन निंबाळकर यांची हत्या गळा आवळून झाली असल्याचे निष्पन्न झाले आहे. मृतकाची पत्नी निर्मला निंबाळकर यांच्या शरीरावर कोणतीही जखम आढळून आली नाही. तसेच, शवविच्छेदन अहवालात याबाबत ठोस कारण नमूद करण्यात आले नसल्याची माहिती समोर आली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ISL 2024: मुंबई सिटी ठरले चॅम्पियन! अंतिम सामन्यात मोहन बगानला चारली पराभवाची धूळ

Prajwal Revanna Case : एचडी रेवन्ना एसआयटीच्या ताब्यात; प्रज्ज्वल यांच्याविरोधात CBI कडून ब्लू कॉर्नर नोटीस निघण्याची शक्यता

IPL 2024 RCB vs GT Live Score: फाफ डू प्लेसिसची फिफ्टी, तर विराटने पुन्हा मिळवली ऑरेंज कॅप

Weather Update : पुण्यात उन्हाचा चटका कायम राहणार; राज्यात वादळी पावसाला पोषक वातावरण

Lok Sabha Election 2024 : ४०० पार घोषणा, पण भाजप अडीचशे जागांवर अडकणार

SCROLL FOR NEXT