Seven quintals of cannabis have been seized at Malkapur  
अकोला

सात क्विंटल गांजा पकडला; कारसह १ कोटी १० लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त, एक ताब्यात तर तीन आरोपी फरार

सकाळ वृत्तसेवा

मलकापूर (बुलडाणा) : ग्रामीण पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक अनिल बेहरानी आपल्या पथकासह रात्रीच्या दरम्यान ग्रामीण भागात पेट्रोलिंग करीत असताना मलकापूर ते जांबुळधाबा रोडवर हॉटेल टी पॉईंट जवळ पहाटे तीन वाजे दरम्यान ग्रामीण पोलिसांनी नाकाबंदी दरम्यान मलकापुरहुन बोदवडकडे भरधाव वेगाने येणाऱ्या दोन गाड्यांना थांबविले. पोलिसांनी गाड्या थांबविताच या दोन्ही गाड्यांमधील चार जणांनी पळ काढला असता पोलिसांनी त्यांचा पाठलाग केला व एकाला पकडले.

यावेळी त्याच्या ताब्यातील अर्टीका क्रमांक टीएस २७ सी ०९५६, ईनोव्हा क्रमांक एपी २८ टीसी ६२५५ या दोन्ही गाड्यातून अंदाजे ७० लाख रुपये किंमतीचा सात क्विंटल गांजा व ईनोव्हा, अर्टिका गाड्या किंमत अंदाजे चाळीस लाख रुपये असा एकूण एक कोटी दहा लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

ही कारवाई जिल्हा पोलिस अधीक्षक अरविंदकुमार चावरीया, अप्पर पोलिस अधीक्षक हेमराजसिंह राजपूत, प्रभारी उपविभागीय पोलिस अधिकारी अमोल कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामीण पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक अनिल बेहरानी, पोलिस उपनिरीक्षक नामदेव तायडे, पो. हे. कॉ. सचिन दासर, पो.ना.दिलीप तडवी, राहुल बटूकार, रविकांत बावस्कर, सहाय्यक फौजदार बाळू टाकरखेडे, पो.कॉ.दिपक नाफडे आदींनी केली आहे. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत पोलिस कारवाई सुरू होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Devendra Fadnavis : महाराष्ट्रातील एक कोटी महिलांना लखपती बनविणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन

Raj Thackeray : पुराणमतवाद्यांना शिंगावर घेणारे आजोबा! राज ठाकरेंनी शेअर केला प्रबोधनकरांसोबतचा लहानपणीचा फोटो; जयंतीनिमित्त सांगितली आठवण

IND vs PAK: सूर्यकुमारचा अपमान करणाऱ्या पाकिस्तानी खेळाडूच झाला ट्रोल; आता म्हणतोय, आफ्रिदीला कुत्रा म्हणणाऱ्या इरफान पठाणला...

दीड वर्षही झालं नाही आणि झी मराठीची आणखी एक मालिका घेणार निरोप? अभिनेत्रीच्या भावुक पोस्टमुळे चर्चेला उधाण

6G India : भारतात लवकरच सुरू होणार 6G इंटरनेट; IIT हैदराबादच्या विद्यार्थ्यांनी बनवला प्रोटोटाइप, हे नेमकं आहे तरी काय? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT