Jai Bhavani Gymnasium shivapur
Jai Bhavani Gymnasium shivapur sakal
अकोला

Akola News : युवाशक्तीचे ऊर्जास्रोत ‘शिवापूरची जयभवानी व्यायामशाळा’; तीन जिल्ह्यात १७० हून अधिक शाखा

अनुप ताले

अकोला - देशाला मजबुती व विकासाची दिशा देण्याची जबाबदारी युवा पिढीकडे असते आणि गेले ५० वर्षांपासून ही जबाबदारी सांघिकतेने पार पाडण्याचा आदर्श समोर ठेवला आहे. अकोला तालुक्यातील ‘जयभवानी व्यायाम शाळा शिवापूर’च्या युवाशक्तीने. या संस्थेच्या प्रेरणेतून अकोला, बुलडाणा, अमरावती जिल्ह्यात १७० हून अधिक व्यायामशाळा उभारल्या जाऊन, ही संस्था युवाशक्तीचा उर्जास्त्रोत बनली. याच उर्जेतून १५०० युवकांच्या ताफा श्री गणेश विसर्जन मिरवणुकीतून चित्तथरारक कलेचे सादरीकरण करताना पाहायला मिळतो, हे विशेष!

अकोला जिल्ह्यातील ‘शिवापूर’ येथे जात, पात, धर्म, रंग, भेद विसरून फक्त भारतीय आणि समाजबांधव असल्याचा गौरवांकित इतिहास पाहायला मिळतो. या शिवापूरात १९७८ साली वस्ताद जानराव दुधंबे व ज्ञानदेव बगे यांच्या लाठीकाठी, लांब उडी, उंच उडीने पुरुषोत्तम पातोंड यांच्या गोठ्यासमोर व्यायाम शाळेची नीव रोवली.

सुरुवातीला केशवराव पातोंड, रावसाहेब वानखडे, गजानन डोईफोडे, निळोबा ढोरे, प्रल्हाद ढोरे, मोहन ढोरे, गजानन ढोरे, साहेबराव पातोंड, वासुदेव ढोरे, प्रदीप गडेकर व इतर मंडळी अशा एकूण ४० विद्यार्थ्यांनी सर्व विद्या आत्मसात केल्यात.

त्यानंतर श्रीकृष्ण ढोरे यांच्या पुढाकाराने हनुमान मंदिराजवळ २० ते २५ फूट उंच गढी खोदून बंडूभाऊ ढोरे यांच्या नेतृत्वात लक्ष्मणराव काळे, विश्वनाथ गावंडे, पुरुषोत्तम पातोंड, वासुदेवराव ढोरे, वामणराव सिरसाट, मधुकर पवार, मारोती मोरे, मारोती दुधंबे, एकनाथ धानोरकार, सहदेव वर्गे व इतर मंडळीने व्यायामासाठी जागेचे सपाटीकरण केले.

सर्वप्रथम शिवापूरच्या ६० युवकांनी प्रात्यक्षिकासह अकोला येथे सार्वजनिक गणेश विसर्जन मिरवणुकीत सहभाग घेतला व प्रथम क्रमांकाचे बक्षिस मिळाले. मात्र, सर्व समाजाचे लोक एकत्र आले ते कबड्डीच्या टिममुळे. या टिमचे नेतृत्‍व करत होते श्रीकृष्ण दौलतराव ढोरे. डिगांबर पातोंड, गोपाळराव पातोंड आणि सहकाऱ्यांवर आर्थिक जबाबदारी होती.

किसनराव सिरसाट, पुरुषोत्तम ढोरे, शांताराम ढोरे, सखाराम वानखडे, रामदास वानखडे, जानकीराम डोंगरे, भीमराव वानखडे, पांडूरंग वसू त्यांच्या पाठीशी उभे होते. महादेवराव ढोरे व आनंदा गावंडे यांच्यामुळे १९६५ ते १९७५ पर्यंत शिवापूरातील सर्व समाज खेळापासून धार्मिक कार्यासाठी एकत्रित काम करत होते. ही परंपरा पुढेही सुरू राहिली.

सन १९६२ साली भारतात आयोजित आशियाई क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राच्या वाट्याला लेझिम आला. त्या पथकामध्ये निळोबा ढोरे यांची निवड झाली. याच प्रेरणेतून १९८३ साली बंडूभाऊ ढोरे यांनी प्रशिक्षण शिबिराचे नियोजन केले. त्यामध्ये बाहेर गावचे ६० युवक सहभागी झाले. ४० दिवसाच्या या शिबिरात लाठीकाठी, मल्लखांब, कुस्तीचे प्रशिक्षण केशवराव पातोंड, विश्वनाथ गावंडे व गजानन डोईफोडे यांनी दिले.

निळोबा ढोरे यांच्या सांगण्यावरून प्रल्हाद ढोरे यांनी एका हलगीवर दोघंमिळून विविध प्रात्यक्षिकासह सर्व प्रथम आशियाई लेझिम प्रदर्शित केला. प्रशिक्षणाचा समारोप क्रीडामंत्री अरुण दिवेकर यांच्या हस्ते झाला. त्यानंतर शिबिरार्थी त्या ६० युवकांनी जय भवानी व्यायाम शाळेच्या शाखा आपापल्या गावी सुरू केल्यात. त्यानंतर पिंजर, कानशिवणी, पुनोती, आगीखेड, तळेगाव या गावी प्रशिक्षण शिबिर घेण्यात आली. त्यामध्ये बुलडाण्यातील माटरगाव व अमरावतीमधील शिवरसह तिन्ही जिल्ह्यात १७० गावात व्यायाम शाळा सुरू झाल्यात.

देशाच्या संरक्षणार्थ शिवापूरचे युवक कटिबद्ध

शिवापूरातील केशवराव पातोंड ‘पोलिस उपनिरीक्षक ते पोलित उपअधीक्षक’ या पदापर्यंत पोहचले. यांचा आदर्श घेऊन शिवापूरातील ५५ युवक पोलिस विभागात कार्यरत असून, केंद्र राखीव पोलिस दल, राज्य राखीव दल, भारतीय सेना व अनेक विभागात घरातील एक युवक सेवा देत आहेत.

शपथ घेतो की!

युवक व्यवसनाधीन होऊ नयेत म्हणून आई भवानी समोर दसऱ्याला सार्वजनिक शपथ शिवापूरच्या युवकांकडून अर्पण केली जाते तसेच रंगपंचमीच्या दिवशी रंग व व्यसन विरहित रंगपंचमी दरवर्षी साजरी करण्यात येत आहे.

१५०० युवकांच्या कलाबाजीने वेधले लक्ष

संस्थेचे नवे विश्वस्त व पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून यावर्षी अकोल्यात भव्य गणपती विसर्जन मिरवणूक काढण्यात आली. त्यामध्ये १००० युवक व त्यांच्या देखभालीसाठी ५०० स्वयंसेवक, असे एकूण एक हजार पाचशे युवकांसह लेझिम, लाठीकाठी, ढाल तलवार व चित्तथरारक दृष्याने अकोला वासियांचे लक्ष वेधले.

नव्या जोमाने पुन्हा बांधणी

मध्यंतरी काही विश्वस्तांचे निधन झाले. सचिव बंडूभाऊ ढोरे यांचा ६ मे २०२२ रोजी अकस्मात मृत्यू झाला. पुन्हा जुने आणि नव्याने विविध क्षेत्रात प्रख्यात असलेल्या व्यक्तींना विश्वस्त म्हणून त्यामध्ये केशवराव पातोंड, अध्यक्ष लक्ष्मणराव काळे व प्रवीण हावरे, उपाध्यक्ष वासुदेवराव ढोरे, कोषाध्यक्ष प्रल्हाद ढोरे, सचिव निळोबा ढोरे, सहसचिव गजानन डोईफोडे, विलासराव ढोरे, गजानन ढोरे, ॲड. नरेंद्र धुत, वासुदेव ढोरे, मुरलीधर ढोरे, नैनकुमार जैस्वाल, गणेश सारसे, गजानन मनतकार, बाबु आळे, आशुतोष चव्हाण, सुनील जानोरकार, प्रदिप गुरुखुद्दे यांना घेण्यात आले.

संस्थेची पहिली कार्यकारिणी

जयभवानी व्यायाम शाळेच्या (नों.क्र.८५६) पहिल्या कार्यकारिणीत अध्यक्ष महादेवराव ढोरे, उपाध्यक्ष डिगांबर पातोंड व लक्ष्मणराव काळे, सचिव बंडूभाऊ ढोरे, सहसचिव केशवराव पातोंड, कोषाध्यक्ष श्रीकृष्ण दौ. ढोरे, सदस्य वासुदेवराव ढोरे, देविदासजी गडेकर, साहेबराव ढोरे, गजानन डोईफोडे, गजानन ढोरे, हे संस्थापक सदस्य होते तर, याच जय भवानी युवक मंडळाचे (नों.क्र.१३५६) अध्यक्ष वामणराव सिरसाट, उपाध्यक्ष मारोती मोरे, सचिव निळोबा ढोरे व इतर १० युवक होते. यावर आज निपाणा या गावी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय सुरू आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News : 'म्हाडा'च्या इमारतीचं छत कोसळलं; विक्रोळीत दोन वृद्धांचा मृत्यू

LinkedIn Jobs Alerts : फ्रेशर आहात आणि चांगली नोकरी हवीय तर हे करायलाच हवं; LinkedIn नेच दिलाय लाखमोलाचा सल्ला

PM Modi : ध्यानमुद्रेत बसले पीएम मोदी; पुढचे ४५ तास अन्नाचा कणही घेणार नाहीत

Bhagwan Pawar: पुणे महापालिकेच्या आरोग्य प्रमुखांवर निलंबनाची कारवाई! काय घडलं नेमकं? जाणून घ्या

Heatstroke : बिहारमध्ये उष्माघाताने ३८ जणांचा मृत्यू तर मध्य प्रदेशात दोन चिमुकले दगावले

SCROLL FOR NEXT