अकोला

वाढीव पाणीपुरवठा योजनेत गैरप्रकार, शिवसेनेची मंत्र्यांकडे तक्रार

सकाळ वृत्तसेवा

अकोट ः अकोट शहरातील वाढीव पाणीपुरवठा योजनेसाठी नवीन जलवाहिनी टाकली जात आहे. त्यत प्रचंड अनियमितता होत असल्याचा आरोप शिवसेनेच्या वतीने करण्यात आला आहे. यासंदर्भात शिवसेनेतर्फे राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे. (ShivSena complains to minister about irregularities in augmented water supply scheme)

गेल्या काही महिन्यांपासून आकोट शहरात नवीन जलवाहिनी टाकली जात आहे. त्यामध्ये ठिकठिकाणी गळती लागली आहे. शहरात ठिकठिकाणी जीवघेणे खड्डे खोदून अर्धवट काम सोडलेले आहे. सबंधित ठेकेदाराला नगरसेवक तथा शिवसेनेचे गटनेते मनीष रामाभाऊ कराळे यांनी वारवांर सूचना केली. परंतु त्यावर कोणत्याही प्रकारची कार्यवाही झाली नाही. जहवाहिनीचे काम थातुरमातुर केले जात असल्याच आरोपही कराळे यांनी केला आहे. जलवाहिनी टाकण्याचे काम मुदती पूर्ण झाले नाही. त्याला आधाच खूप उशीर झाला आहे. त्यातही बऱ्याच ठिकाणी गळती आहे. या कामाची चौकशी व्हावी, काम नियमानुसार झाले नसल्यास सबंधित ठेकेदाराकडून नुकसान भरपाई वसुल करण्यात यावी, सबंधित ठेकेदाराला काळ्या यादीत टाकावे, ठेकेदाराचे कामाचे देयके दिले असेल आणि कामात दोष आढळल्यास सबंधित अधिकाऱ्यावर सुद्धा कारवाई करण्यात यावी, अशी मागणी कराळे यांनी तक्रारीतून केली आहे.

मुख्याधिकाऱ्यांकडून दुर्लक्ष
नवीन जलवाहिनीच्या कामाची चौकशी करून ठेकेदाराला कामाचे देयके व झालेले काम याचे मोजमाप अंदाजपत्रक तपासून करावे. अदांजपत्राकानुसार हे काम झाले नसेल तर ठेकेदाराकडून पूर्ण नुकसान भरपाई वसुल करावी. यापुढील सर्व काम दिलेल्या मुदतीत पुर्ण करावे व त्यासाठी कोणतीही मुदतवाढ देण्यात येवू नये, या आशयाचे निवेदन ता.२०डिसेंबर २०२० रोजी न.पा.मुख्याधिकारी यांना दिले होते. त्यांनी कोणतीही कार्यवाही केली नसल्याचे मनिष कराळे यांचे म्हणणे आहे.

योजना पांढरा हत्ती ठरू नये
अकोट शहरासाठी वाढीव पाणीपुरवठा योजनेंतर्गत नवीन जलवाहिनी टाकण्याचे काम कोट्यवधी रुपयांचा निधी देवून केले जात आहे. ही योजना कागदावरचा पांढरा हत्ती ठरू नये. त्यामुळे काम दर्जेदार होण्याच्या उद्देशाने तातडीने चौकशी लावून शहरातील जनतेच्या पाण्याची व्यवस्था करावी, असे तक्रार वजा निवेदन कराळे यांनी माजी केंद्रीय मंत्री अरविंद सावंत, शिवसेना जिल्हा संपर्कप्रमुख प्रकाशजी शिरवाडकर, जिल्हाप्रमुख नितीन देशमुख, आमदार गोपीकिशन बाजोरीया, मा.आ.संजय गावंडे यांच्या मार्गदर्शनात दिले आहे.

संपादन - विवेक मेतकर

ShivSena complains to minister about irregularities in augmented water supply scheme

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CNG Supply: मुंबईतील सीएनजी पुरवठा कधी सुरळीत होणार? एमजीएलने तारीख अन् वेळच सांगितली, वाहनचालकांना मोठा दिलासा

IPL मध्ये कॅप्टनला जाब विचारला जातो...केएल राहुलचा LSG चे मालक गोयंकांवर अप्रत्यक्ष निशाणा?

Horoscope Marathi : कुणाला होणार धनलाभ तर कुणाला मोठा तोटा! कसा असेल तुमचा उद्याचा दिवस? पाहा मेष ते मीन सर्व राशींचे राशीभविष्य

Kolhapur News: कोल्हापूरमध्ये कुष्ठरोगाविरुद्ध मोठी मोहीम सुरू; ३५ लाखांहून अधिक लोकांची घरोगरी तपासणी, प्रशासनाचा सर्वांना सहकार्याचा आग्रह

IND vs SA : 'तुमचा बँक बॅलन्स वाढवत राहा...' कोलकाता कसोटीनंतर पीटरसन संतापला; खेळाडूंसह क्रिकेट बोर्डालाही झापलं

SCROLL FOR NEXT