chandrshekhar pande sakal
अकोला

वंचितला पांडे गुरुजींची सोडचिठ्ठी; धरले कमळ

त्यांचेसह विविध पक्षातील कार्यकर्त्यांनी शनिवारी घेतला भाजपामध्ये प्रवेश

सकाळ वृत्तसेवा

अकोला : वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी तथा जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण बांधकाम समिती सभापती चंद्रशेखर पांडे गुरुजी यांनी वंचितला सोडचिट्टी देत शनिवारी (ता.२२) भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश घेतला. त्यांच्यासोबत लखन गावंडे व विविध पक्षातील कार्यकर्त्यांनी सुद्धा भाजपमध्ये प्रवेश घेतला.स्थानिक बाबासाहेब टोपले सभागृहात शनिवारी (ता.२२) माजी शिवसेना जिल्हा उपप्रमुख व वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी तथा जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण बांधकाम समिती सभापती चंद्रशेखर पांडे, लखन गावंडे, मंगेश ठाकरे, प्रशांत उमाळे, मंगेश भटकर, आशिष राऊत, आशिष घोगरे यांच्या नेतृत्वात विविध पक्षातील कार्यकर्त्यांनी भाजपात प्रवेश केला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महानगर भाजपा अध्यक्ष विजय अग्रवाल होते तर, आमदार गोवर्धन शर्मा, आमदार प्रकाश भारसाकळे, आमदार हरीश पिंपळे, आमदार वसंत खंडेलवाल, अनुप धोत्रे, किशोर पाटील, तेजराव थोरात, जयंत मसने, श्रावण इंगळे, प्रभाकर मानकर, माधव मानकर, वसंत बाछुका, डॉ. शंकरराव वाकोडे, राजु काकड, किशोर काकड, प्रवीण हगवणे पाटील, अंबादास उबाळे, अक्षय गंगाखेडकर आदी मंचावर विराजमान होते.

पक्षश्रेष्ठींचे विचार घरोघरी पोहोचवण्यासाठी, पक्षाला अजून बळकटी मिळवून देण्यासाठी कार्यरत राहू, असा विश्वास चंद्रशेखर पांडे गुरुजी यांनी यावेळी व्यक्त केला. यावेळी जिल्हा भाजपा अध्यक्ष आमदार रणधीर सावरकर यांनी त्यांना उपाध्यक्ष म्हणून जबाबदारी सोपवली. युवा नेता लखन गावंडे यांच्या प्रवेशाने अकोला, बार्शीटाकळी, बाळापूर तालुक्यात मोठ्या प्रमाणात युवाशक्तीचा प्रवेश होऊन त्यांच्या कार्यशैलीने समाजाला लाभ होईल तसेच अकोला महानगरात सुद्धा त्यांच्या कर्तृत्वाचा लाभ भारतीय जनता पक्ष घेईल, असा विश्वास महानगराध्यक्ष विजय अग्रवाल यांनी व्यक्त केला. कार्यक्रमाचे संचालन माधव मानकर, प्रास्तविक विजय अग्रवाल यांनी केले तर, आभार प्रशांत ठाकरे यांनी मानले.

सर्वसामान्यांना न्याय मिळवून देऊ

आज भारतीय जनता पक्षामध्ये वेगवेगळ्या विचारसरणीचे लोक भाजपाच्या विचाराला अंगीकार करून प्रवेश करीत आहेत. पांडे गुरुजी व लखन गावंडे यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांचा सन्मान करून त्यांच्या कर्तृत्वाचा पक्ष विस्तारासाठी लाभ घेऊ व सर्वसामान्यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करू, असे प्रतिपादन जिल्हा भाजपा अध्यक्ष आमदार रणधीर सावरकर यांनी पक्ष प्रवेश कार्यक्रमावेळी केले.

वंचितला दुसरा झटका

पांडे गुरुजी पूर्वी विधानसभा निवडणुकीनंतर वंचित बहुजन आघाडीमधून माजी आमदार हरिदास भदे आणि माजी आमदार बळीराम सिरस्कार सुद्धा बाहेर पडले होते. आता हे दोन्ही नेते हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आहेत. त्यानंतर पांडे गुरुजींनी आता वंचितला सोडचिठ्ठी दिल्याने त्याचा फटका पक्षाला बसणार असल्याची शक्यता राजकीय जाणकारांनी व्यक्त केली आहे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Solapur Crime:'पैशांवरून पत्नीचा खून; पतीस जन्मठेप'; गॅस टाकीसाठी ठेवलेले पैसे पतीने दारुत उडवले, नेमकं काय घडलं?

Latest Marathi News Live Update: डाळी उत्पादक शेतकऱ्यांनी नोंदणी केल्यास नाफेड मार्फत भारत सरकार ते खरेदी करणार-अमित शाह

आम्ही सगळे थोडे घाबरलोय कारण... वहिनी कतरिना कैफच्या प्रेग्नन्सीबद्दल काय म्हणाला विकी कौशलचा भाऊ सानी कौशल?

OBC Reservation : धनगर समाजाने सत्ता काबीज करुन ओबीसींचं आरक्षण वाढवावं; प्रकाश आंबेडकरांनी सांगितला नवा फॉर्म्युला

Solapur News: सोलापुरात पूर ओसरल्यानंतरही डेंगी-टायफॉईडचा प्रादुर्भाव; मनपाकडून घरोघरी तपासणी सुरू

SCROLL FOR NEXT