धार्मिक स्‍थळांना मार्गदर्शक सूचनांची प्रतीक्षा sakal
अकोला

खामगाव : धार्मिक स्‍थळांना मार्गदर्शक सूचनांची प्रतीक्षा

नवरात्रौत्‍सवाच्‍या तयारीला अद्याप सुरुवात नाही ः जिल्‍हा प्रशासनाकडे लक्ष

निखिल देशमुख

खामगाव : धार्मिक स्‍थळे कधी उघडणार याबाबत सर्वच भाविकांना उत्‍सुकता होती. अखेर नवरात्रोत्‍सवाच्‍या पहिल्‍या दिवसाचा मुहूर्त साधत सर्व धार्मिक स्‍थळे खुली करण्याचा निर्णय घेत शासनाने भाविकांची इच्‍छापूर्ती केली. परंतु, धार्मिक स्‍थळांचे स्‍वरूप बघून किती भक्‍तांना एकावेळी आत प्रवेश द्यायचा, याबाबत निर्णय घेण्यात यावा असे स्‍पष्ट केले आहे. तर जिल्‍हा स्‍तरावरून याबाबत काय मार्गदर्शक सूचना येतात, याकडे सर्व संस्थानच्या व्यवस्थापनाचे लक्ष लागले आहे.

कोरोनाच्‍या प्रादुर्भावामुळे गतवर्षी तब्‍बल ९ महिने सर्व धार्मिक स्‍थळे कुलूपबंद होती. त्‍यामुळे गतवर्षी गणपती, नवरात्रोत्‍सव इतर सर्व उत्‍सव सार्वजनिकरीत्‍या होणाऱ्या धार्मिक कार्यक्रमांवर निर्बंध होते. त्‍यानंतर नोव्‍हेंबर २०२० मध्ये धार्मिक स्‍थळे खुली करण्यात आली. फेब्रुवारीमध्ये कोरोनाने घेतलेल्‍या युटर्नने पुन्‍हा शासनाला मंदिरे बंद करण्याचा निर्णय घ्यावा लागला. परंतु, सध्या सर्व स्‍तरातून मंदिरे उघडण्याच्‍या मागणीची राज्‍य शासनाने दखल घेतली. येत्‍या ७ ऑक्‍टोबर म्‍हणजेच घटस्‍थापनेच्‍या मुहूर्तावर राज्‍यातील मंदिरे भाविकांना दर्शनासाठी खुली करून करण्यात येणार आहेत.

घटस्‍थापनेच्‍या मुहूर्तावर मंदिर खुली होणार असल्‍याने जिल्‍ह्यात विविध ठिकाणी नवत्रोत्‍सवानिमित्त धार्मिक कार्यक्रम होतील, अशी अपेक्षा भाविकांना आहे. खामगाव तालुक्‍यातील घाटपुरी येथील जगदंबा संस्‍थानमध्ये नवरात्रोत्‍सवानिमित्त नऊ दिवस यात्रा भरत असते. तसेच सार्वजनिकरीत्‍या धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. परंतु, गत दोन वर्षांपासून या पंरपरेत खंड पडला होता. मात्र, ऐन नवरात्रोत्‍सवाच्‍या १२ दिवस आधी राज्‍य शासनाने धार्मिक स्‍थळे खुली करण्याच्‍या आदेशाने यंदा घाटपुरी येथे नवरात्रोत्‍सव मोठ्या उत्‍साहात साजरा होऊ शकतो. परंतु, जिल्‍हा प्रशासनाने इतर मार्गदर्शन सूचना जारी न केल्‍याने मंदिर व्‍यवस्‍थापनाच्‍या वतीने पूर्व तयारीसाठी नियोजन केलेले नाही. त्‍यामुळे जिल्‍हा स्‍तरावरून याबाबत कोणत्‍या मार्गदर्शक सूचना देण्यात येतात हे पाहावे लागेल.

तसेच शासनाने जास्‍त जाचक निर्बंध ठेवले तर मंदिर व्‍यवस्‍थापनाला देखील मोठ्या संख्येने येणाऱ्या भाविकांचे योग्‍य नियोजन करणे कसरतीचे राहणार आहे.सोशल डिस्‍टनिंग, मास्‍क, सॅनिटायझर या इतर उपाय योजनात्‍मक साहित्‍याची तरतूद कशा प्रकारे करायची हा देखील प्रश्न संस्‍थान व्‍यवस्‍थापनासमोर राहणार आहे. त्‍यामुळे जिल्‍हा प्रशासन याबाबत काय सुचना देते यावर पुढील नियोजन अवलंबून राहील.

पुढचे नियोजन

नवरात्रोत्‍सव दहा दिवसावर येऊन ठेपला आहे परंतु, ऐन वेळेवर शासनाने मंदिरे खुली करण्याचा निर्णय घेतला असला तरी मंदिरामध्ये कशा प्रकारे नियोजन व उपाययोजना हव्‍या हे जिल्‍हा प्रशासनाकडून जाहीर होणार असून, याबाबत मार्गदर्शक सुचना आल्‍यानंतरच पुढेचे नियोजन ठरले अशी माहिती जगदंबा व्‍यवस्‍थापनाच्‍या वतीने देण्यात आली आहे.

मंदिर आवारातील दुकानांबाबत संभ्रम

नवरात्रोत्‍सवानिमित्‍त मंदिर परिसरात विविध वस्‍तुंंची दुकाने थाटली जातात परंतु, मंदिर आवारात भाविकांची होणारी गर्दी व त्‍याठिकाणी दुकाने लागल्‍यास कोरोना नियमांचे पालन होईल किंवा नाही. हे सांगणे कठीण असल्‍याने यावर्षी व्‍यावसायिकांना मंदिर परिसरात दुकाने थाटण्यात परवानगी दिली जाऊ शकते किंवा नाही याबाबत संभ्रम आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Weather Alert : राज्यात वादळी पावसाचा इशारा; आज 'या' जिल्ह्यांत गारपीट होण्याची शक्यता

Gadchiroli News: रेकाॅर्डवरील शेवटच्या माओवाद्याला परतीची साद; लोकशाही मार्ग स्वीकारण्याचे आवाहन; डाव्या पक्षांच्या नेत्यांनी घेतली कुटुंबाची भेट

Donald Trump Speech: आता तुम्ही तुमचं बघा... ट्रम्पने केले हात वर, होर्मुझवरुन इतर देशांना दिला सल्ला! तेलाचा प्रश्न पेटणार

Kolhapur fire news : कोल्हापुरातील फुलेवाडी रिंगरोडवरील सुपर बाजारला भीषण आग; मोठे नुकसान

Akola News: दहा हजार रुपये देतो, तुझी मुलगी पाठव; लॉकअपमधील महिला आरोपीला मागणी, एएसआय निलंबीत

SCROLL FOR NEXT