कवी अनिल कांबळे sakal
अकोला

राज्य पुरस्कारप्राप्त कवी अनिल कांबळेची एका घरकुलासाठी पायपीट

कवी अनिल कांबळे आपल्या झोपडीच्या डागडूजीला सरकारी कार्यालयाचे उंबरठे झिजवत आहेत मात्र पदरी निराशेशिवाय काहीच पडत नाही.

राम चौधरी ः सकाळ वृत्तसेवा

वाशीम : *मित्रा पोर्णिमेचा चंद्र, तुझा तुला लखलाभ असू दे.

माझ्या झोपडीच्या कोणड्यात, अमावश्या केव्हाचीच बसली रूसून

माझ्या मुलांनी अंधाराचा केला घोडा घोडा, तो ही थकून उपाशी झोपलाय घोड्याच्या पागेत

मग आता तुच सांग, उजेडाच दान मागण्यासाठी कोणापूढे हात करू*

या कवीतेने केलेला व्यवस्थेवरचा प्रहार आणी रोजच्या जगण्यातल जळजळीत वास्तव मांडलय कवी अनिल कांबळे यांनी. झोपडी नंबर 12 या कविता संग्रहाला दोन राज्यस्तरीय पुरस्कार जरी मिळाले असले तरी ती झोपडी आता जर्जर झाली आहे. कवी अनिल कांबळे आपल्या झोपडीच्या डागडूजीला सरकारी कार्यालयाचे उंबरठे झिजवत आहेत मात्र पदरी निराशेशिवाय काहीच पडत नाही. हे वास्तव आहे.

वाशीम तालुक्यातील पार्डीटकमोर येथील कवी अनिल कांबळे एक विद्रोहाच दुसर नाव आहे. नामांतराच्या मानवतावादी लढ्याच्या मुशीत अनिल कांबळेची जडणघडण झाली. घरावर तुळशीपत्र ठेवून चळवळी लढवल्या अनेकांचे इमले गदागदा हलवून सोडले. चळवळी राजकीय वळचणीच्या बटीक झाल्यानंतर मनातील अन्यायाविरोधातील विद्रोह कवीतेच्या रूपाने कागदावर लाव्हा रसागत पसरला. 1985 साली सरकारने आखलेल्या गावकुसाबाहेर 10बाय 10 ची कवेलूची झोपडी या विद्रोहाची साक्षीदार ठरली.

*रिकाम्या ताटवाटीसोबत ,चाळा करणारी कवीची बायको

चेहर्यावरील वेदनेची बट बाजूला सारून, कवीच करते स्वागत

सहेतूक स्मित वदनाने रिकाम्या पिठाच्या डब्याकडे,ओझरती फिरविते नजर*.

या चार ओळीतच आख्ख आयुष्य गेलेल्या कवी अनिल कांबळेच्या झोपडीनेही कधीचाच विद्रोह पुकारला आहे. ग्रंथसंपदा, पुरस्काराची रिळ,नियत अनियतकालीकाचे गठ्ठे दररोज ओलेचिंब होत आहेत. ही झोपडी दुरूस्त व्हावी किंवा विषेश घटक योजनेतून एखादे घरकुल तरी मंजूर व्हावे यासाठी कवी अनिल कांबळे दररोज सरकार दरबारी पायपीट करतात मात्र व्यवस्थेला पान्हा फुटतच नाही. व्यवस्था वांझ झाली की आपण निगरगट्ट झालो असा प्रश्न हा विद्रोही कवी दररोज स्व:तलाच विचारतोय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 News: MS Dhoni च्या चाहत्यांना झटका देणारी बातमी, CSK च्या वाढल्या अडचणी; सराव सत्रात जे घडलं, ते खूपच धक्कादायक...

Bhima Water Politics: भीमा नदीत पाणी सोडण्यावर श्रेयवादाची लढाई; राजकीय नेत्यांच्या वादात नदीकाठचा शेतकरी होरपळला

Gen Z Trend Deadzoning: मोबाइल बंद, लॅपटॉप बंद; Gen Z आणि Millennials मध्ये ‘डेडझोनिंग’ची क्रेझ; नेमकं 'हे' आहे तरी काय ?

Tembhapuri Dam Tragedy: टेंभापुरी धरणात १९ वर्षीय तरुणाचा बुडून मृत्यू; प्रशासनाच्या दुर्लक्षाचा आरोप

Pune Ragging : पुण्यातील आयएलएस लॉ कॉलेज वसतिगृहात रॅगिंग प्रकरण उघड

SCROLL FOR NEXT