ST esakal
अकोला

ग्रामीण भागात शाळा सुरू, एसटीविना विद्यार्थी शिक्षणापासून वंचित

सकाळ वृत्तसेवा

घाटबोरी (जि. बुलडाणा) : मेहकर (mehkar buldana) तालुक्यामध्ये शालेय शिक्षण विभागाच्या आदेशानुसार १५ जुलैपासून जे गावे कोरोनामुक्त आहेत अशा ठिकाणी वर्ग ८ ते १२ वी पर्यंत नियमित शाळा (school start buldana) चालू करण्यात आली आहे. ग्रामीण भागात अनेक गावातून विद्यार्थ्यांना जवळपासच्या दुसर्‍या गावात शिक्षणासाठी दररोज जावे लागते. परंतु, शासन-प्रशासन यांच्या नियमानुसार एसटी महामंडळ विभागाने ज्या रस्त्यावर उत्पन्न जादा मिळते अशाच ठिकाणी एसटी बस (ST bus service) चालू केली आहे. त्यामुळे आजही ग्रामीण भागात हजारोच्यावर वर्ग ८ ते १२ चे विद्यार्थी शिक्षणापासून वंचितच आहेत. (student facing problems for up down due to st bus service closed in buldana)

ग्रामीण भागात राज्य परिवहन महामंडळाच्या एसटी बस बंद असल्याने विद्यार्थ्यांना शाळेत ये- जा करणे शक्य होत नाही. त्यामुळे ग्रामीण भागातील बस फेर्‍या लवकरात लवकर सुरू कराव्या अशी मागणी पालक व विद्यार्थ्यांमधून होत आहे. कोरोनाच्या संकटामध्ये गेल्या दीड वर्षापासून विद्यार्थ्यांचे नुकसान झाले आहे. अशात कोरोनाची रुग्णसंख्या थोडी कमी झाल्याने शासन-प्रशासन यांनी जेथे कोरोनामुक्त गावे आहेत व ग्रामपंचायतीने तसा ठराव दिला अशा ठिकाणी शाळा सुरू करण्यात आल्या आहेत. बससेवा बंद असल्याने विद्यार्थ्यांना शाळांमध्ये पाठविण्यास अडचण निर्माण होत आहे. काही पालक पाल्यांना शाळेत पाठवीत नाही, तर काही खासगी वाहनाने तर काही स्वतःच्या वाहनाने मुलांना शाळेत सोडतात. मात्र, गरीब विद्यार्थी लालपरीविना शालेय विद्यार्थी शिक्षणापासून वंचितच आहेत.

ग्रामीण भागात एसटी बस सुविधा उपलब्ध नसल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. परिणामी काही खासगी वाहनातून ग्रामीण भागातील विद्यार्थांना ५० ते १०० रुपये खर्च करून प्रवास करावा लागत असल्यामुळे विद्यार्थ्यांची हेळसांड होत आहे. ही गैरसोय दूर करून विद्यार्थांना एसटी बसची सुविधा मिळून द्यावी अशी मागणी पालक विद्यार्थी करत आहेत.
- सखाराम काळदाते, अध्यक्ष, विदर्भ भ्रष्टाचार निर्मूलन समिती, मेहकर
आदेशानुसार ज्या रस्त्यावर उत्पन्न जादा आहे अशा ठिकाणी वेळेनुसार एसटी बस चालू करण्यात आली आहे. जोपर्यंत शासनाचे आदेश आम्हाला येत नाहीत तोपर्यंत सर्व बससेवा सुरू करणे शक्य होणार नाही, तरी आदेश किंवा सूचना आल्यानंतर बससेवा चालू करण्यात येईल.
- रणवीर कोरपे, आगार प्रमुख, मेहकर.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shiv Sena Symbol Dispute : दोन्ही गटांना नवे नाव, चिन्हे का दिली नाहीत? शिवसेना पक्षाच्या सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाचा सवाल

India ODI Squad : भारताच्या वनडे संघात Rishabh Pant ला का मिळाली नाही संधी? ही असू शकतात ३ महत्त्वाची कारणं

Latest Marathi News Update : मनोज जरांगे यांनी उपोषण सोडल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पहिल्यांदाच म्हणाले...

Gokul Milk Union : गोकुळमधील अवसायनातील संस्थांना दिलासा, सर्वोच्च न्यायालयातील याचिका फेटाळली; ४९२ संस्थांचा मतदानाचा अधिकार कायम

‘देवमाणूस’नंतर किरण गायकवाडची नवी इनिंग; राजकारण अन् गुन्हा… ‘एफआयआर नं. ४६९’मध्ये नेमकं काय पाहायला मिळणार?

SCROLL FOR NEXT