akola crime sakal
अकोला

Akola Crime News : माझं काय चुकलं, मला न्याय मिळेल का?

गावगुंडांचा बळी ठरलेल्या विशालसाठी शिवसेनेसह विद्यार्थ्यांची पोलिस अधीक्षक कार्यालयावर धडक

सकाळ वृत्तसेवा

Akola News : शिकवणी वर्ग परिसरात विशाल झाटे या विद्यार्थ्यांचा गावगुंडानी नाहक बळी घेतला. त्यामुळे दहशतीत असलेल्या विद्यार्थ्यांच्या मनातील भीती दूर करीत व पुन्हा अशी घटना अकोल्यात घडू नये यासाठी पोलिसांनी उपाययोजना करण्याच्या मागणीसाठी हजारो विद्यार्थ्यांसह शिवसेनेच्या ठाकरे गटाने पोलिस अधीक्षक कार्यालयावर धडक दिली.

विद्यार्थी व शिवसेनेच्या वतीने पोलिस अधीक्षकांना निवेदनही देण्यात आले. बुलढाणा जिल्ह्यातून अकोलामध्ये शिक्षण घेण्यासाठी आलेला विद्यार्थी विशाल झाटे याचा कृषिनगर भागातील गावगुंडांनी धारदार शस्त्राने काहीही कारण नसताना खून केला.

मित्राने वाढदिवसाचे गिफ्ट मागितले म्हणून निष्पाप विशाल झाटे या विद्यार्थ्याचा बळी घेण्यात आला. नशेखोर समाजकंटकांच्या हातून घडलेल्या अत्यंत भयावह घटनेने शिकवणी वर्ग परिसरातील विद्यार्थी व त्यांचे पालक दहशतीत आहेत.

अशा घटनांमुळे सामाजिक स्वास्थ्यासह शैक्षणिक स्वास्थ्य बिघडत आहे. या घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा व्हावी आणि पुन्हा अशी घटना घडू नये म्हणून पोलिसांनी उपाययोजना कराव्यात या मागणीसाठी पाच हजारांवर विद्यार्थ्यांचा सहभाग असलेला शिवसेनेचा मोर्चा आमदार नितीन देशमुख यांच्या नेतृत्वात पोलिस अधीक्षक कार्यालयावर धडकला.

जवाहरनगर चौकातून दुपारी १ वाजता मोर्चाला सुरुवात झाली. सिव्हिल लाईन्स चौक, नेहरू पार्क मार्गे पोलिस अधीक्षक कार्यालयावर मोर्चा पोहोचल्यानंतर तेथे शिवसेना पदाधिकाऱ्यांनी विद्यार्थ्‍यांना संबोधित केले.

या मोर्चात अकोला शहरातील शास्त्री नगर, रणपिसे नगर, राऊतवाडी, जवाहर नगर, हनुमान नगर, रामनगर, जठारपेठ, लहान उमरी, शासकिय दूध डेअरी परिसर, गौरक्षण रोड त्याचप्रमाणे जुने शहरातील डाबकी रोड या परिसरात अनेक कोचिंग क्लासचे विद्यार्थी सहभागी झाले होते.

यांना घेतला सहभागी

आमदार नितिन देशमुख यांच्या नेतृत्वात निघालेल्या मोर्चात शिवसेना जिल्हा प्रमुख गोपाल दातकर, सेवकराम ताथोड, गजानन दाळू गुरूजी, संजय गावंडे, हरिदासजी भदे, शहर प्रमुख राजू मिश्रा, राहुल कराळे, अभय खुमकर दीपक बोचरे, अतुल पवनीकर आदी या मोर्चात सहभागी झाले होते.

विशालच्या वडिलांच्या डोळ्यातून आले अश्रू

विशाल झाडेचे वडील बुलडाणा जिल्ह्यातून खास या मोर्चात सहभागी झाले होते. माझ्या मुलासोबत जे घडले ते इतर कुणाच्याही मुलासोबत घडू नये यासाठी मुलाच्या जाण्याचे दुखः बाजूला सारून विशालचे वडील मोर्चात सहभागी झाले होते.

विद्यार्थ्यांना संबोधित करताना मुलाच्या आठवणीने त्याच्या डोळ्यातून अश्रु आले. विशालच्या वडिलांसोबतच वर्षभरापूर्वी एका विद्यार्थ्याला फाशी देवून मारल्याचा संशय व्यक्त करीत त्या विद्यार्थ्याचे पालकही उपस्थित होते.

पोलिसांप्रमाणे काम करणार शिवसेनेची हेल्पलाईन

पोलिस अधीक्षक कार्यालयावर काढण्यात आलेल्या मोर्चानंतर विद्यार्थ्यांना संबोधित करताना आमदार नितीन देशमुख, माजी आमदार गजानन दाळू गुरुजी, प्रा. प्रकाश डवले, बुलडाणा येथे आलेले शिवसेना पदाधिकारी नरेंद्र खेडेकर आदींनी विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी शिवसेना सदैव्य तत्पर राहील, असे आश्वासन दिले. त्यासाठी शिवसेनेची हेल्पलाईन तयार करण्यात येत आहे, असे आमदार देशमुख यांनी सांगितले.

या मागण्यांचे दिले निवेदन

  • टवाळखोर मुलांचा बंदोबस्त पोलिसांनी करावा. त्यासाठी ताबडतोब खास पथकाची नेमणूक करावी. सिव्हिल ड्रेससह पोलिसांची गस्त वाढवून मुलींवरील होणारे अत्याचार थांबवावे.

  • कोचिंग क्लासेसच्या परिसरात अनेक कॅफे सेंटर आहेत. या कॅफे सेंटरच्या माध्यमातून अल्पवयीन मुलांसह मुली तसेच वयात आलेली मुलेही अश्लील चाळे करतात. अशा कॅफे सेंटरवर धाडी टाकून ते कायमस्वरूपी बंद करण्यात यावे.

  • अकोला शहरात तथा जिल्हयात अनेक ठिकाणी रस्त्यावर राजरोसपणे जुगार, अवैधरित्या दारू विक्रीसारखे धंदे सुरू आहेत. ते बंद करण्यात यावे.

  • जिल्ह्यामध्ये महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये प्रचंड वाढ झालेली आहे. अशा अपराध्यांवर वचक राहील व त्यामुळे समाजातील अशा प्रवृत्तीच्या लोकांवर पोलिसांची दहशत निर्माण होईल यासाठी उपाययोजना करण्यात याव्यात.

  • महिला मुलींच्या सुरक्षेसाठी दामिनी पथकांमध्ये वाढ करण्यात यावी.

  • शिकवणी वर्गाच्या मुख्य मार्गावर पोलिस चौकी लावून शिकवणी वर्गाच्या परिसरात महिला व पोलिस कर्मचारी यांची शिकवणी वर्ग चालू असेपर्यंत गस्त ठेवण्यात यावी.

  • संपूर्ण शहरात सीसीटीव्ही कॅमेरे लावून वॉर रूम स्थापन करून गुन्हेगारांवर नियंत्रण ठेवण्यात यावे.

  • विशाल झाटे खून प्रकरणात विशेष सरकारी वकील म्हणून ॲड. उज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात यावी.

  • अकोला शहरात गुन्हेगारी लोकांसोबत अनेक पोलीस कर्मचारी यांचे लागेबांधे आहेत तसेच हे लोक अवैध व्यवसायात भागीदार आहेत. जे कर्मचारी शहरात अनेक वर्षापासून ठाण मांडून आहेत त्यांची तत्काळ शहराबाहेर बदली करण्यात यावी.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: उद्धव ठाकरे आणि शिवसेनेपासून राज ठाकरे दूर का होत गेले? वाद ते मनोमिलन timeline

IND vs ENG 2nd Test: शुभमन गिलच्या ३००+ धावा! मोडला विराट कोहलीचा ११ वर्षांपूर्वीचा विक्रम, रिषभ पंतचीही फिफ्टी

Sushil Kedia: माज उतरला, पण गुर्मी कायम; माफीनंतरही नवं ट्विट करत सुशील केडिया पुन्हा बरळले, शहांची स्तुती तर ठाकरेंना...

Divyang Students Demand : दिव्यांग विद्यार्थ्यांची होतेय कुचंबना! ३० जुलैपर्यंत वसतिगृहाचा प्रश्न मार्गी लावा अन्यथा...; विद्यार्थ्यांचा सरकारला इशारा

Raigad News: अलिबाग मार्गावरील कोंडी सुटणार, प्रवाशांचा आरामदायी प्रवास होणार; सरकारचा प्लॅन सत्यात उतरणार

SCROLL FOR NEXT