अकोला

विदर्भातील पहिला जिजामाता सहकारी साखर कारखाना सुरू होणार?

गजानन काळुसे

सिंदखेड राजा (जि. बुलडाणा) : विदर्भातील पहिला सहकारी साखर कारखाना म्हणजे सिंदखेड राजा तालुक्यातील जिजामाता सहकारी साखर कारखाना १९७२ मध्ये उभारला होता. परंतु, तांत्रिक अडचणीमुळे अनेक वर्षांपासून कारखाना बंद अवस्थेत आहे. पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी साखर कारखाना सुरू करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे व वर्क मॅनेजर यांनी कारखान्याची प्राथमिक पाहणी करून माहिती घेतली.

२० वर्षांत जिजामाता सहकारी साखर कारखाना दोन वर्षे सुरू होता. दोन वर्षांत दुष्काळी परिस्थिती असल्यामुळे कारखाना कमी प्रमाणात सुरू राहिला. साखर उद्योगांमध्ये अनेक अडचणी असतात. साखर उद्योगावर अवलंबून न राहता त्याचबरोबर इथेनॉल, वीजसह सहवीज प्रकल्प सुरू ठेवावे लागतात. तेव्हा साखर कारखाना सुरळीत चालू शकतो, असे राजेश टोपे यांनी सांगितले.

खडकपूर्णाचा प्रकल्प असल्यामुळे व परिसरात सिंचनाची चांगली व्यवस्था असल्यामुळे पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी जिजामाता सहकारी साखर कारखाना सुरू होण्यासाठी अनेकवेळा चर्चा केली. त्यामुळे आम्ही जिजामाता सहकारी साखर कारखान्याची प्राथमिक पाहणी करण्यासाठी आलो. साखर कारखाना सुरू झाला तर परिसरामध्ये लक्ष्मी नांदू शकते. कारखाना सुरू करण्यासाठी मोठी गुंतवणूक करावी लागणार आहे. त्यासाठीच प्राथमिक पाहणी करण्यासाठी आम्ही आलो आहोत, असे राजेश टोपे यांनी सांगितले.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. नाझेर काझी, टेक्निकल मॅनेजर सुरवसे, प्रदेश सरचिटणीस इरफान अली, माजी सभापती विलासराव देशमुख, सरपंच प्रकाश सांगळे, गजानन देशमुख, रामा राठोड यांच्यासह अनेक जण उपस्थित होते.

मोठ्या प्रमाणावर रोजगार मिळेल

जिजामाता सहकारी साखर कारखाना हा शेतकऱ्यांसाठी व परिसरातील नागरिकांसाठी वरदान आहे. कारखाना सुरू करण्यासाठी प्रयत्न सुरू आहे. महाविकासआघाडी स्थापन झाल्यापासून मतदारसंघातील बंद असलेले प्रकल्प सुरू होण्यासाठी पाठपुरावा करण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्याचाच भाग म्हणून साखर कारखान्याची पाहणी करण्यासाठी आरोग्य मंत्री राजेश टोपे व सहकारी आले आहे. कारखाना भाडेतत्त्वावर किंवा विक्री घेऊन ताब्यात घेतल्यास परिसरातील ऊस उत्पादक व शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर रोजगार मिळेल, असे पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs MI Live: ना तुला, ना मला... दीपक चहर अन् रॉबिन मिंझ यांची 'पाकड्यां'सारखी फिल्डींग; हार्दिक पांड्यावर तोंड लपवण्याची वेळ Video

KKR vs MI Live: दीपक चहरने कोलकाताच्या फॅन्सना डिवचले; Finn Allen ची विकेट, सूर्याला थांब म्हणाला अन् पुढे काय केले ते पाहाच Video

Tamil Nadu Politics: तमिळनाडू सरकार अडचणीत? राष्ट्रपती राजवटीची मागणी; सुप्रीम कोर्टात याचिका दाखल, प्रकरण काय?

Konkan Tourism : तारकर्लीत ‘आयएनएस गुलदार’चे पाण्याखालील संग्रहालय; नियंत्रित जलसमाधीमुळे कोकण पर्यटनाला नवी ओळख

NEET Paper Leak : नीट पेपरफुटी प्रकरणानंतर पुण्यातील आरसीसी मोटेगावकर क्लासला महापालिकेची टाळेबंदी

SCROLL FOR NEXT