summer heat wave eye allergy doctors advice to take these precautions Sakal
अकोला

Eye Allergies : सावधान! उन्हामुळे वाढले डोळ्यांच्या ॲलर्जीचे प्रमाण

रखरखत्या उन्हात बाहेर पडताना डोळ्यांची काळजी घेण्याचा नेत्रतज्ज्ञांचा सल्ला

सकाळ वृत्तसेवा

अकोट : उन्हाळ्याच्या दिवसांत डोळ्यांच्या अनेक समस्या निर्माण हाेत असतात. डाेळ्यांचीही काळजी घेणे अत्यंत गरजेचे असून, सूर्याच्या अतिनील किरणांपासून डोळ्यांचे संरक्षण करण्यासाठी आपण लेन्स असलेले गॉगल्स वा काळे गॉगल्स वापरले पाहिजेत.

तसेच डाेळे काेरडे हाेण्यासाठी काळजी घ्यावी, असा सल्ला महाराष्ट्र शासन (आरोग्य सेवा)चे माजी नेत्रचिकित्सक अधिकारी तथा दृष्टी संयोजक डॉ.सुहास कुलट यांनी दिला आहे. या ऋतूत सूर्याची किरणे अधिक प्रखर होत असल्याने अनेकांचे डोळे कोरडे पडतात.

अति उष्णतेमुळे शरीरातले पाणी शोषून घेतले जाते, ज्यामुळे डोळ्यांमधील पाणी देखील सुकते. अशावेळी डोळ्यांची योग्य काळजी घेतली नाही, तर कोरड्या डोळ्यांच्या समस्या उद्भवतात. म्हणून उन्हाळ्यात डोळ्यांची विशेष काळजी घेणे आवश्यक असल्याचे त्यांनी ‘सकाळ’शी बोलतांना सांगितले.

सूर्यापासून येणारे अल्ट्राव्हायलेट किरणे डोळ्यांकरिता हानिकारक असतात. ही अल्ट्राव्हायलेट किरणे प्रकाशाहून अधिक वेगाने येतात. त्यामुळे फक्त उन्हातच नाही तर सावलीत देखील डोळ्यांशी निगडीत आजार होण्याची शक्यता असते.

यावर उपाय म्हणून उन्हात फिरताना सनग्लासेस जरूर लावा जे तुमच्या डोळ्यांचे अल्ट्राव्हायलेट किरणांपासून संरक्षण करतील. केवळ उन्हात फिरतानाच नाही तर सावलीत देखील सनग्लासेस लावायला हवी.

एरव्ही फॅशनकरिता वापरल्या जाणाऱ्या हॅट्स देखील तुम्हाला या हानिकारक किरणांपासून सुरक्षित ठेवतात. जास्त पाणी पिल्याने शरीरातील पाण्याचे प्रमाण योग्य राहते आणि युव्ही किरणांच्या घातक परिणामांपासून आरोग्याचे संरक्षण होते. या ऋतूमध्ये डोळ्यांच्या अलर्जीचे प्रमाण वाढण्याची शक्यता असते. तापमानातील प्रदूषणातील झालेली वाढ लक्षात घेता हा त्रास हाेऊ शकताे असे डॉ. सुहास कुलट सांगतात.

उन्हाळ्यात शरीरात पाण्याच्या कमतरतेमुळे अनेक गंभीर समस्यांचा धोका असतो. यामुळे तुम्हाला डोळे कोरडे होण्याची समस्या देखील होऊ शकते. त्यामुळे डोळ्यांचे नुकसान होण्यापासून वाचवण्यासाठी दिवसभरात पुरेशा प्रमाणात पाणी पिणे आवश्यक आहे. डोळे कोरडे पडत असल्याची समस्या दिसल्यास अथाव तशी लक्षणे आढळल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

- डॉ. दर्शन कुलट, नेत्ररोग चिकित्सक, अकोट.

उन्हाळ्यात स्किन केअरसाठी बरेच लोक सनस्क्रीन वापरतात. परंतु, डोळ्यांजवळ आणि डोळ्यांच्या आजूबाजूला किंवा पापण्यांच्या भागात ते वापरताना सावधगिरी बाळगली पाहिजे. सनस्क्रीन, ज्यात एसपीएफ जास्त असते, ते चुकून आत गेल्यास डोळ्यांना त्रास होऊ शकते. जरी यामुळे डोळ्यांना कायमचे नुकसान होणार नाही परंतु, यामुळे डोळ्यांच्या भागावर जळजळ होऊ शकते.

- डॉ ऐश्वर्या द. कुलट, नेत्ररोग विशेष शल्य चिकित्सक, अकोट.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 3rd Test: तुमचा अभिमान! शुभमन गिल पराभवानंतर काय म्हणाला? सामना नेमका कुठे फिरला हे सांगितलं, जसप्रीतबाबत...

Video: सर्वच सीमा ओलांडल्या! फेमस होण्यासाठी बाईकवर जोडप्याचं नको ते कृत्य, लोकांनी व्हिडिओ बनवून व्हायरल केला

IND vs ENG 3rd Test: मोहम्मद सिराज दुर्दैवी पद्धतीने बाद झाला, रवींद्र जडेजा हतबल दिसला; इंग्लंड तिथेच जिंकला Video

Mhada Lottery: मुंबईकरांना म्हाडाकडून आनंदवार्ता! ५ हजारहून अधिक घरांची लॉटरी जाहीर; 'असा' करा अर्ज

ENG vs IND, 3rd Test: जडेजा लढला, पण इंग्लंडने लॉर्ड्स कसोटी जिंकली! १९३ धावा करतानाही भारताची उडाली भंबेरी

SCROLL FOR NEXT