Supreme Court granted bail to two accused in Hundiwale murder case akola esakal
अकोला

Akola Crime : हुंडीवाले हत्याकांडातील दोन आरोपींना सर्वोच्च न्यायालयातून जामीन

हुंडीवाले प्रकरणात केवळ दोन आरोपी कारागृहातमध्ये असून, इतर आरोपींना जामीन मिळाला

सकाळ वृत्तसेवा

अकोला : धर्मदाय आयुक्त कार्यालयामध्ये ता. ६ मे २०१९ रोजी दुपारी १२ वाजता समाजसेवक किसनराव हुंडीवाले यांची विक्रम श्रीराम गावंडे, श्रीराम कसदन गावंडे, रणजित श्रीराम गावंडे, प्रवीण श्रीराम गावंडे, धीरज प्रल्हाद गावंडे, सूरज प्रल्हाद गावंडे, सतीश सुखदेव तायडे, विशाल सुखदेव तायडे, मयूर गणेशलाल अहिरे, दिनेश ठाकूर, प्रतीक दत्तात्र तोंडे आणि साबीर यांनी निर्घृण हत्या केली होती.

या प्रकरणातील दोन आरोपी धीरज प्रल्हाद गावंडे आणि सूरज प्रल्हाद गावंडे यांना चार वर्षे चार महिने कारागृहामध्ये राहिल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी जामीन मंजूर केला. आता या प्रकरणात केवळ दोन आरोपी कारागृहातमध्ये असून, इतर आरोपींना जामीन मिळाला आहे.

महाराष्ट्रात अत्यंत गाजलेल्या या प्रकरणात कारागृहात असलेल्या आरोपींनी ता. ६ सप्टेंबर २०२३ रोजी जामिनासाठी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती.

या प्रकरणात न्यायालयाने, कोणताही व्यक्ती केवळ ट्रायलच्या वेळकाढूपणामुळे जर करागृहामध्ये असेल तर हे न्याय सांगत नसल्याचे म्हटले आहे. त्याच आधारावर दोन आरोपींना सोमवारी जामीन मंजूर करण्यात आला. याआधी मुख्य आरोपीलाही जमीन मंजूर झालाआहे, हे विशेष.

सर्वोच्च न्यायालयाने दिल्लीचे ॲड. मनोज गोरकेला यांनी आरोपींची बाजू सर्वोच्च न्यायालयात मांडली. या प्रकरणात विशेष सरकारी वकील ॲड. उज्ज्वल निकम प्रत्येक तारखेवर मुंबईहून अकोल्यात येत असून, हुंडीवाले हत्याकांडातील सरकारची बाजू ते न्यायालयात मांडत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

साहिल मोबाईल वापरून करत होता कॉपी, परीक्षेवेळचा CCTV VIDEO आला समोर

Mohol News : मोहोळ तालुक्यातील मंदिरातील वाढत्या चोऱ्या संदर्भात पोलीस सतर्क; व्यवस्थापक पुजारी व ट्रस्टी यांच्या तातडीच्या बैठकीचे आयोजन, अकरा सूचनांचे पालन करण्याची सूचना

Mangalwedha News : मनरेगा योजनेतील रोजगार सेवकासाठी नव्याने काढलेल्या शासन निर्णयावरून राज्यभरात संताप

IIT Bombay Student Death : आयआयटी बॉम्बे बाहेर 'जस्टिस फॉर साहिल' आंदोलन; प्रकाश आंबेडकरांचे पुत्र सुजात यांच्या नेतृत्वाखाली जोरदार निदर्शने, प्रशासनाला दिला कडक इशारा

IAS मेधा रूपम यांना दिलासा, हायकोर्टाच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयाकडून स्थगिती

SCROLL FOR NEXT