अकोला

केंद्र सरकार वर तर राज्य सरकार वधू; बुलडाण्यातील अनोखे लग्न

गजानन काळुसे

सिंदखेड राजा (जि. बुलडाणा) : राज्यातील शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. कधी कोरडा दुष्काळ तर कधी अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. काही दिवसांपूर्वी आलेल्या संततधार पावसामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. असे असतानाही शेतकऱ्यांना भरपाई काही मिळालेली नाही. शेतकऱ्यांना पीकविम्याचा लाभ मिळवून देण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे अनोखे आंदोलन करण्यात आले.

मागच्यावर्षी बोगस बियाणे व अतिवृष्टीमुळे राज्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागला. शेतात पीक उभे करण्यासाठी सावकाराचे दारही ठोकावे लागले. शेतकऱ्यांचे नुकसान झाल्यास सरकारकडून पंचनामा करून नुकसान भरपाई देण्यात येते. यासाठी प्रधानमंत्री पीकविमा योजना सुरू करण्यात आली आहे. या माध्यमातून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दिली जात असते. यामुळे त्यांना थोडा का होईना लाभ मिळतो.

मात्र, एवढ्या मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी होऊनही राज्यातील शेतकऱ्यांना पीकविमा देण्यास विमा कंपन्या टाळाटाळ करीत आहे. दुसरीकडे अतिवृष्टीची सुद्धा नुकसान भरपाई शेतकऱ्यांना मिळालेली नाही. यामुळे शेतकरी पार खचला आहे. चिंतातुर झालेल्या शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी सोमवारी दुपारी स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे अनोखे आंदोलन करण्यात आले. केंद्र व राज्य सरकारने एक विचार करून पीकविमा व मागील वर्षी झालेल्या अतिवृष्टीची नुकसानभरपाई देण्यासाठी हे आंदोलन करण्यात आले.

केंद्र व राज्य सरकारचे लावले लग्न

शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे केंद्र व राज्य सरकाराचे लग्न लावून दिले. या लग्नात केंद्र सरकारकडून वर तर राज्य सरकारकडून वधू उपस्थित होती. राजमाता जिजाऊ यांच्या जन्मस्थळावरून दोघांची वरात काढून सिंदखेड राजा तहसील कार्यालयात लग्न लावण्यात आले. यावेळी नवरदेव, नवरी व वराती यांचा आंदोलनामध्ये सहभाग होता.

तहसीलदारांना निवेदन

ज्याप्रमाणे लग्नामध्ये वरात निघाल्यानंतर वराती डान्स करून आनंद व्यक्त करतात. त्याचप्रमाणे मार्गावरून नवरदेव, नवरीच्या समोर डान्स करून तहसीलदारांना निवेदन देण्यात आले आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष सहदेव लाड यांच्या मार्गदर्शनाखाली हे आंदोलन करण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG, 2nd T20I: रवी बिश्नोईची 'ती' चूक महागात पडली! जेकब बेथलच्या आक्रमणामुळे भारताविरुद्ध इंग्लंडचा ऐतिहासिक विजय

IND vs ENG, 2nd T20I: अक्षर पटेलने इंग्लंडच्या कॅप्टनला आऊट करत घडवला इतिहास; यापूर्वी कोणत्याही भारतीय फिरकीपटूला जमलं नव्हतं!

जळगावमध्ये भीषण अपघात! टोलनाक्यावर उभ्या ट्रकला गॅस टँकरची धडक, बघता क्षणी घेतला पेट, आगीत होरपळून दोघांचा मृत्यू

Latest Marathi Update : राज्यासह देशविदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

Raigad Heavy Rain : रायगडला मुसळधार पावसाचा तडाखा; अंबा नदी धोक्यापलीकडे, भेरव पूल पाण्याखाली, पोलादपुरात दरड कोसळल्याने नागरिकांचे स्थलांतर

SCROLL FOR NEXT