Tehsildar Sunil Sawant has said that the vehicle transporting sand should be transported with royalty  
अकोला

सिंदखेडराजा तालुक्यातील वाळू घाटाची तपासणी; वाहनाने रॉयल्टी घेऊन वाहतूक करावी

सकाळ वृत्तसेवा

सिंदखेडराजा (बुलडाणा) : तालुक्यातील वाळू घाटाचा लिलाव झाला असून त्याठिकाणाहून वाळू वाहतूक सुरू आहे. तालुक्यातील साठेगांव, हिवरखेड पूर्णा, तढेगांव येथील वाळू घाट सुरू करण्यात आला आहे. वाळू घाटातून वाळू वाहतूक करणार्‍या वाहनाने नियमांनी रॉयल्टी घेऊनच वाहतूक करावी. अन्यथा दंड वसूल करण्यात येईन अशी माहिती तहसीलदार सुनील सावंत यांनी दैनिक सकाळ सोबत बोलताना सांगितले आहे.

ग्रामीण भागात घरोघरी पेटल्या पुन्हा मातीच्या चुली ! वाढत्या महागाईचा फटका, गोरगरीब जनतेच्या आर्थिक अडचणीत भर
 
उपविभागीय अधिकारी सुभाष दळवी, तहसीलदार सुनील सावंत यांनी तालुक्यातील हिवरखेड पूर्णा वाळू घाटावर पाहणी केली. हिवरखेड पूर्णा येथील वाळू घाटावर जाऊन शासनाने दिलेल्या नियमांचे पालन करून वाळू वाहतूक करावी, अशा सूचना वाहतूक करणार्‍या चालकांना दिल्या. त्याचप्रमाणे वाळूची वाहतूक करताना वाहनचालकांकडे रॉयल्टी असणे आवश्यक आहे. वाळू घाटावर नियंत्रण ठेवण्यासाठी तलाठी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नियुक्ती केलेले तलाठी हे वाळू घाटावरून वाहतूक करणार्‍या वाहनांची पूर्ण वेळ थांबून नियमित तपासणी करीत आहे. वाळू घाटावर नियंत्रण ठेवण्यासाठी विविध पथक तयार करण्यात आले असून त्यामध्ये नायब तहसीलदार, मंडळ अधिकारी व तलाठी यांचा समावेश आहे. वाळू घाट चालकांकडून प्रशासनाने दिलेल्या नियमांचे पालन करूनच वाळूची वाहतूक सुरळीत सुरू आहे.

यावेळी तलाठी राहुल देशमुख, प्रवीण झिने, गजानन टेकाळे, एस. जी पांडव, जी. के. केवट, बी.बी गिरी, व्ही. यु. कटारे, दादाराव खार्डे, शिवाजी डोईफोडे, प्रभाकर घुगे, डॉ. मानवतकर, कैलास दहेकर, उपसरपंच प्रमोद वाघमारे, बाबासाहेब कुटे, नंदकिशोर नागरे, चंदू कुटे, विलास दहेकर, सर्जेराव गायकवाड, किशोर कुटे आदी जण उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar: 'जरांगे-पाटील यांच्याशी आमचा कवडीचा संबंध नाही'; शरद पवारांनी नाशिकमध्ये दिले स्पष्टीकरण

IND vs PAK : सूर्यकुमार यादव भाजपा प्रवक्ता... Asia Cup मध्ये लाज निघाल्यावर टीम इंडियाच्या कॅप्टनवर पाकिस्तानकडून नको ते आरोप; कोण म्हणतंय असं?

अरे हे चाललंय तरी काय! पुन्हा बदलली झी मराठीच्या लोकप्रिय मालिकेची वेळ? नेटकऱ्यांनीच दाखवला फोटो

Sharad Pawar : ‘महाराष्ट्राची सामाजिक वीण विस्कटली’, आरक्षणावरुन शरद पवारांनी व्यक्त केली चिंता

Hug My Younger Self स्टाईलचा फोटो बनवा एका क्लिकवर..

SCROLL FOR NEXT