कोरोना प्रतिबंधक पहिला डोस sakal
अकोला

अकोला : पहिला डोस घेणाऱ्यांची संख्या १० लाखांवर

कोरोना विषाणू विरोधातील लढ्यात कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणाला विशेष महत्व

सकाळ वृत्तसेवा

अकोला : कोरोना लसीकरण अतिशय वेगाने करण्यात येत असल्याने मंगळवारी (ता. ३०) जिल्ह्यात २५ हजारांपेक्षा अधिक म्हणजेच आतापर्यंतचे सर्वाधिक लसीकरण करण्यात आले. त्यासोबतच पहिला डोस घेणाऱ्यांची संख्या सुद्धा दहा लाखांवर पोहचल्याने आरोग्य विभागासह इतर विभागांमार्फत करण्यात येत असलेले प्रयत्न यशस्वी होत असल्याचे दिसून येत आहेत.

कोरोना विषाणू विरोधातील लढ्यात कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणाला विशेष महत्व आहे. पहिल्या लाटेनंतर लसीकरण मोहीम सुरू झाल्यापासून आतापर्यंत आरोग्य विभागामार्फत नागरिकांच्या लसीकरणावर जोर देण्यात येत आहे. अधिकाधिक नागरिकांनी लस घ्यावी यासाठी नागरिकांना लस सुद्धा मोफत देण्यात येत आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये लस घेणाऱ्यांवर विषाणूचा हल्ला झाल्यानंतर सुद्धा लसवंताला फारसा प्रभाव न झाल्याचे तज्ज्ञांचे म्हणने आहे. त्यामुळे आरोग्य विभागामार्फत लसीकरणासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत.

दरम्यान कोरोनाची तिसरी लाट येणाऱ्या शक्यता सुद्धा आरोग्य विभागाने व्यक्त केली आहे. सदर लाट थोपवण्यासाठी लसीकरण हाच एकमात्र उपाय असल्याचे सांगितल्या जात आहे. त्यामुळे लसीकरणाची गती वाढवण्यासाठी व अधिकाधिक नागरिकांना लस मिळावी यासाठी राज्यासह जिल्ह्यात ८ ते १४ ऑक्टोबर या कालावधीत मिशन कवच कुंडल अभियान राबविण्यात आले. त्यामध्ये दररोज किमान २० हजार नागरिकांचे लसीकरण करण्याचे उद्दिष्ट समोर ठेवण्यात आले होते. याव्यतिरिक्त प्रत्येक शासकीय कर्मचाऱ्याचे योगदान अभियानात घेण्यात आले. त्यामुळे मंगळवारी (ता. ३०) जिल्ह्यातील पहिला डोस घेणाऱ्यांची संख्या दहा लाखांवर पोहचली. त्यासोबत मंगळवारीच २५ हजारांवर नागरिकांनी लस घेतल्याची नोंद पहिल्यांदाच करण्यात आली.

असे आहे आतापर्यंतचे सर्वाधिक लसीकरण

  • १३ नोव्हेंबर - १९ हजार ४९०

  • २९ नोव्हेंबर - २२ हजार १६०

  • ३० नोव्हेंबर - २५ हजार २२३

एकूण लसीकरण

  • पहिला डोस - १० लाख ७ हजार ५४६

  • दुसरा डोस - ४ लाख ६५ हजार ३०

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC Exam: तलाठी अन् गट 'क' पदांसाठी घेतली जाणारी परीक्षा आता थेट पुढच्या वर्षी! जाणून घ्या नवी तारीख

8th pay commission : १२ लाख कर्मचाऱ्यांना होणार मोठा फायदा ! १८ हजार रुपये बोनससह महागाई भत्ता अन् बरंच काही...

Gold Rate Today: सणाआधी सोन्याच्या भावात मोठा बदल! खरेदीआधी पाहा तुमच्या शहरातील 10 ग्रॅमचा ताजा भाव

Marathi News Live Updates : ओबीसी आंदोलकाच्या गाडीवर भररस्त्यात दगडफेक; हल्ल्याचा थरारक प्रकार कॅमेऱ्यात कैद

Success Story: जिल्हाधिकारी होण्याचं बालपणीचं स्वप्न... अपयश आलं, नोकरी सोडली, पण जिद्द सोडली नाही; ऐश्वर्यम UPSCत देशात १०वी

SCROLL FOR NEXT