कोरोना लस
कोरोना लस  File photo
अकोला

तीन-चार दिवस पुरेल एवढीच लस उपलब्ध, शासनाकडून लसींचा अल्प पुरवठा

सकाळ वृत्तसेवा

अकोला ः कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणासाठी (Corona preventive vaccination) जिल्ह्याला कोव्हिशील्डचे (Supply of Covidshield vaccine to Akola district) ८ हजार ५०० आणि कोव्हॅक्सीनचे १ हजार ७४० डोस शुक्रवारी (ता. २८) मिळाले. सदर साठ्यातून केवळ तीन-चार दिवसच लसीकरण करता येणार असल्याने पुन्हा कोरोना लसीकरणाचा वेग मंदावेल. (The supply of Covidshield vaccine to Akola district is very low)

जिल्ह्यात कोरोना लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात कोरोना योद्धा व वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे लसीकरण करण्यात आले. त्यानंतर १ मार्चपासून शासनाने ६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक व दुर्धर आजारग्रस्तांचे लसीकरण करण्याच्या सूचना आरोग्य विभागाला दिल्या होत्या.

१ एप्रिलपासून ४५ ते ५९ वयोगटातील नागरिकांचे सुद्धा लसीकरण करण्याची मोहीम राबविण्यात येत आहे. या वयोगटातील लाभार्थ्यांची संख्या जिल्ह्यात ६ लाखांच्या जवळपास असून सदर वयोगटातील लाभार्थी मोठ्‍या संख्येने लस घेत आहे.

दरम्यान असे असले तरी जिल्ह्याला कोरोना लशींचा अल्प साठा मिळत असल्याने लसीकरण मोहिमेचा वेग मंदावत आहे. दरम्यान शुक्रवारी (ता. २८) कोरोना लशींचे एकूण १० हजार २४० डोज जिल्ह्यासाठी मिळाले. सदर साठा अल्प असल्याने जिल्ह्यात पुन्हा लसीकरणाचा वेग मंदावेल.

कोव्हॅक्सीनचा उपयोग दुसऱ्या डोससाठीच
केंद्र व राज्य शासनाकडून कोव्हॅक्सीन लसींचा अल्प साठा मिळत असल्याने जिल्ह्यासाठी शुक्रवारी मिळालेल्या १ हजार ७४० लसींचा उपयोग दुसऱ्या डोससाठीच करण्यात येणार आहे. त्यासोबतच कोव्हिशील्डच्या ८ हजार ५०० लसींचा उपयोग पहिल्या डोससाठी करण्यात येईल.

संपादन - विवेक मेतकर

The supply of Covidshield vaccine to Akola district is very low

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Baramati Lok Sabha Election : 'तुम्ही आमचा जीव, आत्मा आहात...' बारामतीमधील सभेत रोहित पवारांना अश्रू अनावर

LinkedIn Job Search : नोकरीची चिंता आता सोडा.! लिंक्डइनवर जॉब शोधण्याची ‘ही’ आहे सोपी पद्धत

IPL 2024 PBKS vs CSK Live Score : सीएसकेचाही पलटवार; पंजाबची गळती सुरू जवळपास निम्मा संघ गारद

Loksabha election 2024 : ''आम्ही खोक्यांच्या मागे गेलो नाहीत; कारण...'', 'सकाळ'च्या मुलाखतीत विनायक राऊत स्पष्टच बोलले

Akshaya Tritiya 2024 : अक्षय्य तृतीयेचा भगवान कुबेरांशी काय संबंध आहे? जाणून घ्या कारण

SCROLL FOR NEXT