लसींचा पुरवठा अल्पच; पुन्हा २ हजार ४०० डोसची बोळवण! Media Gallery
अकोला

लसींचा पुरवठा अल्पच; पुन्हा २ हजार ४०० डोसची बोळवण!

लसींचा पुरवठा अल्पच; पुन्हा २ हजार ४०० डोसची बोळवण!

सकाळ वृत्तसेवा

अकोला ः कोरोना (Corona) प्रतिबंधात्मक लसीकरणासाठी जिल्ह्याला दोन हजार ४०० कोव्हॅक्सीन लसींचे डोस शनिवारी (ता. १५) मिळाले. लसींच्या अल्प पुरवठ्यामुळे कोरोना लसीकरण सुरू राहणार असले तरी त्यांचा वेग मात्र मंदावेल. The supply of vaccines is limited; 2,400 doses again!

जिल्ह्यात कोरोना लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात कोरोना योद्धा व वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे लसीकरण करण्यात आले. त्यानंतर १ मार्चपासून शासनाने ६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक व दुर्धर आजारग्रस्तांचे लसीकरण करण्याच्या सूचना आरोग्य विभागाला दिल्या होत्या. १ एप्रिलपासून ४५ ते ५९ वयोगटातील नागरिकांचे सुद्धा लसीकरण करण्याची मोहीम राबविण्यात येत आहे.

या वयोगटातील लाभार्थ्यांची संख्या जिल्ह्यात ६ लाखांच्या जवळपास असून सदर वयोगटातील लाभार्थी मोठ्‍या संख्येने लस घेत आहे. दरम्यान असे असले तरी जिल्ह्याला कोरोना लशींचा अल्प साठा मिळत असल्याने लसीकरण मोहिमेचा वेग मंदावत आहे. शनिवारी (ता. १५) कोरोना लशींचे २ हजार ४०० डोस जिल्ह्यासाठी मिळाल्याने लसीकरण तर चालेल परंतु त्याची गती मात्र मंदावेल.

संख्या वाढली वेग घटला
जिल्ह्यात कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणाचा वेग वाढला आहे. दररोज किमान ६ ते ७ हजार लाभार्थी लस घेत आहेत. परंतु लसींचा अल्प साठा केंद्र व राज्य सरकारकडून करण्यात येत आहे. त्यामुळे लसीकरण मोहिमेचा वेग मात्र मंदावत आहे.

संपादन - विवेक मेतकर

The supply of vaccines is limited; 2,400 doses again!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uttar Pradesh: परदेशात नोकरीला जाण्यापूर्वी युपीचे तरुण शिकणार तिथली भाषा! योगी सरकारचा मोठा निर्णय

Ayodhya Ram Mandir: इस्रोच्या मदतीने रामललाचा अलौकिक 'सूर्याभिषेक'! ४ मिनिटे कपाळावर चमकली सूर्याची किरणे

Meta Brain : माणसाचा मेंदू कॉपी करत आहे Meta! बनवला 'डिजिटल ब्रेन'; जो पाहू अन् ऐकू शकतो, आता मशीन समजून घेणार तुमच्या भावना

Ashok Kharat Nashik : अशोक खरातसोबत नाशिकचा बडा नेता, अनिसकडून गंभीर आरोप

Latest Marathi News Live Update : दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर विमानाचे इमर्जन्सी लँडिंग

SCROLL FOR NEXT