

Weather Update
ESakal
मुंबई : राज्यात मागील तीन दिवस पावसाने मुसळधार हजेरी लावल्यानंतर आता पावसाचा जोर कमी झाल्याचे दिसून येत आहे. मुंबईतही दोन दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतल्यामुळे मुंबईकरांना उन्हाच्या झळांचा सामना करावा लागत आहे. यामुळे पुन्हा पाऊस कधी पडणार याकडे नागरिकांचे लक्ष लागले असता हवामान विभागाकडून (IMD) नवा अंदाज जारी करण्यात आला आहे. ज्यानुसार मुंबईसह महाराष्ट्रात पावसाचा अलर्ट जारी करण्यात आला आहे.