अकोला : शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील (Government Medical College) पॅरामेडिकलचे विद्यार्थी (Paramedical students) आपल्या शैक्षणिक वर्षात अभ्यासाबरोबरच कोरोनाच्या (corona) काळात सेवा देत आहे. त्याकरिता त्यांना शिक्षणाचा एक भाग म्हणून बंधनकारक केले जाते. परंतु शासनाकडून त्यांना कोणत्याही प्रकारचे मानधन (Honorarium) किंवा व त्यापासून वंचित ठेवले जाते. There is also no honorarium for paramedical students serving during the Corona period
संपूर्ण महाराष्ट्रात पॅरामेडिकलच्या अभ्यासक्रमास विद्यार्थी शिक्षण घेत आहे. त्यातील अकोला शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात अंदाजे २५ विद्यार्थी शिक्षण घेत असल्याचे चौकशीत निदर्शनात आले. त्यांच्या शिक्षणाचा एक भाग म्हणून त्यांच्याकडून मानधन किंवा कुठलाही भत्ता न देता वरून वार्डात व यामध्ये यांचेकडून स्वॅब घेण्याचे काम करवून घेतल्या जाते आणि हे विद्यार्थी सुद्धा काही न बोलता मोफत सेवा देतात.
कोरोना काळात सर्वच वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांना वेतन तर देण्यात येते. त्यासोबतच त्यांना ५० लाखाचा जीवन विमा सुद्धा देण्यात येतो. पॅरामेडिकलचे विद्यार्थी अत्यावश्यक सेवेत मोडत नाहीत का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
संपादन - विवेक मेतकर
There is also no honorarium for paramedical students serving during the Corona period
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.