अकोला

यंदाही कावड यात्रा नाही; भाविकांच्या मागणीला प्रतिसाद नाही

सकाळ वृत्तसेवा

अकोला : शहरातील राजेश्वर मंदिरातील प्रसिद्ध कावड पालखी यात्रा यंदाही कोरोनामुळे रद्द करण्याचा आदेश सोमवारी जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी काढला. त्यामुळे यंदाही अकोलेकरांना कावड यात्रेपासून मुकावे लागणार आहे. भाविकांच्या मागणी झुगारून श्रावणातील शेवटच्या रविवारी, सोमवारी राजेश्वर मंदिर मिरवणूक मार्गावर संचारबंदी लागू करण्यात आली आहे.

अकोला जिल्ह्याचे आराध्य दैवत राजराजेश्वर महादेव मंदिरामध्ये परंपरागत कावड-पालखी यात्रा आयोजित केली जाते. श्रावण महिन्याच्या दर सोमवारी अकोला जिल्ह्यातील तसेच आजूबाजूच्या जिल्ह्यातून व ग्रामीण भागातून भाविक पायी चालत येऊन १२ किमी अंतरावरील गांधीग्राम येथून वाहणाऱ्या पूर्णा नदीचे पाणी कावडद्वारे आणून राजराजेश्वर मंदिरातील महादेवाच्या पिंडीवर जलाभिषेक करतात.

श्रावण महिन्याच्या शेवटच्या सोमवारला अकोला शहरात शिवभक्तांच्या वतीने कावड व पालखीचे आयोजन करण्यात येते. कावड पालखी मिरवणुकीमध्ये अंदाजे ४०-५० पालख्या व शिवभक्तांच्या १५० ते १७५ कावड पालखीसह २५ ते ३९ हजार भाविक सहभागी होतात. त्यामुळे होणारी गर्दी लक्षात घेता कावड पालखी यात्रा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

राज्य सरकारच्या ११ ऑगस्टच्या निर्देशानुसार अकोला जिल्ह्यामध्ये कोविड नियंत्रणासाठी निर्गमित करण्यात आलेले आदेशानुसार १३ ऑगस्टपासून जिल्ह्यातील धार्मिक स्थळे बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. उत्सव व यात्रा सुध्दा बंद आहेत. जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी निमा अरोरा यांनी प्राप्त अधिकारानुसार श्रावण महिन्याच्या शेवटच्या सोमवारी उत्सव साजरा करण्यासंदर्भात नियमावली जाहीर केली आहे.

मानाच्या पालखीलाच परवानगी

उपविभागीय दंडाधिकारी व संबंधित उपविभागीय पोलिस अधिकारी तसेच मंदिराचे विश्वस्त, कावड पालखीचे पदाधिकारी यांच्याशी सल्लामसलत करून मंदिराचे विश्वस्त यांच्याकडून मानाच्या एका कावड पालखीसाठी २५ व्यक्तींच्या नावाची यादी प्राप्त करून घ्यावी व त्याच व्यक्तींना परवानगी देण्यात यावी, असे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. गांधीग्राम येथून राजेश्वर मंदिरापर्यंत पायदळ कावड पालखी न आणता ठरावीक वाहनातून आणण्याची परवानगी दिली आहे.

शेवटच्या सोमवारी संचारबंदी

कावड पालखी यात्रेच्या दिवशी कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी व गर्दीवर नियंत्रण राहावे व विनाकारण लोकांनी गर्दी करू नये यासाठी गांधीग्राम ते राजराजेश्वर मंदिर मिरवणूक मार्गावर सोमवारी (६ सप्टेंबर) पहाटे ४ वाजतापासून रात्री १२ वाजेपर्यंत संचारबंदी लागू करण्यात येणार आहे.

अशी आहे नियमावली

  • अकोला महानगरपालिका क्षेत्रातील मिरवणूक मार्गावर कलम १४४ लागू राहील.

  • कावड पालखीसाठी कोणत्याही प्रकारच्या ध्वनिक्षेपक साहित्याचा वापर अनुज्ञेय राहणार नाही.

  • प्रतिबंध केलेल्या कालावधीमध्ये राजराजेश्वर मंदिरामध्ये भाविकांना प्रवेश अनुज्ञेय राहणार नाही.

  • मंदिरातील विश्वस्त, पुजारी यांना मंदिरातील आतील पूजा अर्चा करण्याची मुभा राहील.

  • कावड पालखीकरिता ज्या भाविकांना परवानगी देण्यात आलेली आहे त्यांनी मास्कचा वापर तसेच सोशल डिस्टेनसींगचे नियम पाळणे बंधनकारक आहे.

  • त्यांनी कोरोना प्रतिबंधात्मक लसीचे दोन्ही डोस घेतल्याचे प्रमाणपत्र सोबत बाळगणे आवश्यक राहील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Agricultural News : सरकारी धोरणानं कांदा उत्पादकांना रडवलं, भारताच्या निर्यात महसुलात ११०० कोटींची घट; बांगलादेश-पाकिस्तानने साधली संधी

T20 World Cup: झिम्बाब्वेविरुद्धच्या पराभवानंतर ऑस्ट्रेलियाने केला मोठा बदल; मॅच विनर खेळाडू संघात सामील

T20 WC, IND vs PAK: जावई असला म्हणून काय झालं? भारताविरुद्धच्या पराभवानंतर आफ्रिदी चिडला, थेट तिघांच्या हकालपट्टीची मागणी

Latest Marathi News Update : महाशिवरात्रीला बोकड कापल्याने ग्रामस्थ आक्रमक, जालना महामार्गावर ठिय्या आंदोलन; २ तास वाहतुकीचा खोंळबा

Satara : गुरुजी हे वागणं बरं नव्हं! 'व्हॅलेंटाइन डे'ला विद्यार्थीनीलाच प्रपोज; वर्गातून बाहेर बोलवत पकडला हात

SCROLL FOR NEXT